IRDA Full Form In Marathi भारत सरकार कडून स्थापन केली गेलेली विमा विषयक सर्व बाबी नियंत्रणात ठेवणारी संस्था म्हणजे IRDA होय. आज आपण IRDA म्हणजे काय, IRDA चा फुल फॉर्म, IRDA विषयी माहिती, IRDA चा इतिहास, IRDA ची रचना, IRDA ची उद्दिष्ठ्ये, IRDA ची कार्ये आणि IRDA पोर्टल विषयी थोडक्यात मात्र महत्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत.
IRDA फुल फॉर्म IRDA Full Form In Marathi
IRDA Full Form in Marathi । IRDA Long Form in Marathi
IRDA शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Insurance Regulatory And Development Authority (इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट औथोरिटी) असा आहे. IRDA शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण असा आहे.
IRDA म्हणजे काय? – What is IRDA?
भारतातील IRDA म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण होय. IRDA ही एक स्वायत्त संस्था आहे. IRDA ची स्थापना ही वैधानिक आहे. विमा विषयक नियमावली बनविणे आणि प्रोत्साहन देणे हे कार्य IRDA चे आहे.
IRDA कायदा 1999 अनुसार विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. IRDA ची स्थापना ही सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी आणि हित जोपासण्यासाठी करण्यात आली आहे.
भारतातील विमा व्यवसाय नियंत्रित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी एकमेव संस्था म्हणजे IRDA होय. IRDA च्या रचनेत आपण या संस्थेविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत मात्र IRDA च्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती ही भारत केंद्र सरकार द्वारे केली जाते हु गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
IRDA चे सध्याचे मुख्यालय हे 2001 साल पासून हैद्राबाद येथे आहे. हैद्राबाद येथे 2001 मध्ये आलेले मुख्यालय हे आधीच्या काळात दिल्ली येथे होते. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 अनुसार झालेल्या बदलानंतर हे कार्यालय किंवा मुख्यालय हैद्राबाद येथे हलविण्यात आले.
IRDA विषयी थोडक्यात माहिती – Short Information about IRDA
नाव – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
इंग्रजी नाव – Insurance Regulatory And Development Authority of India
संक्षिप्त नाव – IRDA (आयआरडीए)
अध्यक्ष – सुभाष चंद्र खुंटीया
तक्रार संपर्क क्रमांक- 1800 4254 732
ई-मेल – [email protected]
मुख्य कार्यालय – हैद्राबाद
IRDA चा इतिहास – History of IRDA
1818 मध्ये कोलकाता येथे ओरिएंटल स्थापनेपासून भारतात विमा ही संकल्पना सुरू झाली. तेव्हा जीवन विमा ही संकल्पना तर रुजू झाली मात्र त्यावर नियंत्रण ठेवणारा तसा कोणताही कायदा नव्हता. पुढे 1912 मध्ये भारतीय जीवन विमा कंपनी कायदा बनविण्यात आला. या कायद्याच्या चौकटीत राहूनच जीवन विमा नियंत्रित केला जाऊ लागला.
स्वातंत्र्योत्तर काळात 1956 मध्ये या जीवन विम्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यानंतर ही संस्था एलआयसी म्हणून ओळखली जाऊ लागली. जवळपास 1990 पर्यंत एलआयसी ही एकमेव विमा संस्था जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचली होती. मात्र त्यानंतर खाजगी विमा कंपन्या आणि बँकांनी देखील विमा क्षेत्रात प्रवेश केला.
आता विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे गरजेचे बनले होते. 1991 मध्ये याविषयी विचार विनिमय करण्यात आले आणि पुढे 1993 मध्ये विमा क्षेत्रात सुधारणा व्हाव्यात यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली. विमा सुधारणा समिती 1993 चे अध्यक्ष हे आर इन मल्होत्रा हे होते. त्यामुळे या समितीला मल्होत्रा समिती म्हणून देखील ओळखले जाते.
मल्होत्रा समितीने अनेक शिफारशी मांडल्या त्यामध्ये खाजगी कंपन्यांना विमा क्षेत्रात परवानगी द्यावी किंवा नाही, परदेशी विमा कंपन्यांना देशात विमा सेवा देऊ द्यावी किंवा नाही आणि सरकारने एक स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन करावे अशा अनेक तरतुदी केलेल्या होत्या.
त्यानुसार पुढील काळात 1996 मध्ये विमा नियामक प्राधिकरण नावाने एक संस्था सरकारने सुरू केली. 1999 मध्ये IRDA कायदा मंजूर करण्यात आला. 19 एप्रिल 2000 रोजी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ची स्वायत्त संस्था म्हणून स्थापना झाली.
IRDA चे उद्दिष्टये – Missions of IRDA
विमा घेतलेल्या लोकांचे हित जोपासण्याचे आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे उद्दिष्ट्य IRDA चे असते. विमा उद्योगात प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी, त्यामध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी IRDA कार्यरत असते.
IRDA ची कार्ये – Functions of IRDA
IRDA कायदा 1999 अनुसार ,IRDA संस्थेला काही कामे वाटून देण्यात आलेली आहे. IRDA ची सर्व कामे ही IRDA कायदा 1999 अनुसार चालतात.
- विमा कंपन्यांची नोंदणी करून त्यांना मान्यता असणारे प्रमाणपत्र देणे.
- विमा कंपन्यांचे नियमन करणे.
- विमा धारकांच्या हिताचे रक्षण करणे.
- विमा एजंट साठी काही नियमावली बनवून त्यातून ते पात्र झाले असतील तर त्यांना विमा एजंट म्हणून मान्यता देणे.
- विकासासाठी विमा आणि विमा कंपन्यांना प्रोत्साहन देणे.
- विमा पॉलिसी मधील प्रीमियम आणि इतर गोष्टींचे दर आणि अटी संदर्भात नियमावली बनविणे.
- विमा कंपन्यांचे आर्थिक अहवाल घेणे आणि तपासून बघणे.
- दावे आल्यानंतर त्याबाबतीत न्याय करणे. विमा धारक आणि विमा कंपनी दोघांचे हित जोपासण्याचे पारदर्शक कार्य IRDA करते.
- बीसी फुल फॉर्म
IRDA पोर्टल विषयी माहिती – IRDA Portal Information
IRDA ने विमा धारक ग्राहक आणि विमा कंपन्यांसोबत विमा एजंट साठी एक पोर्टल बनविलेले आहे. या पोर्टलचे माध्यमातून विमा विषयक नियम, IRDA च्या काही परीक्षा असतील तर त्याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाते.
पोर्टल लिंक – www.irda.gov.in
पोर्टलवर तुम्हाला सर्वात आधी एक माहिती मिळेल की IRDA ही फक्त विमा नियामक आणि विकास प्राधिकरण संस्था आहे. म्हणजेच ही एक नियामक संस्था आहे. IRDA संस्थेद्वारे कोणत्याही प्रकारे विमा दिला जात नाही.
IRDA पोर्टलवर तुम्हाला IRDA विषयी संपूर्ण माहिती मिळेल. त्यांच्याशी संपर्क करण्याचा पर्याय देखील इथे आहे. IRDA कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विषयी संपूर्ण माहिती आणि नोंदणी याच पोर्टलचे माध्यमातून होते.
FAQ
IRDA चा तक्रार नोंदणी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक?
IRDA कडे जर तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर 1800 4254 732 किंवा 155255 हे दोन टोल फ्री क्रमांक आहेत.
IRDA ची रचना कशी असते?
IRDA मध्ये एकूण 10 सदस्य असतात. यामध्ये 1 अध्यक्ष, 5 पूर्णवेळ सदस्य आणि 4 अर्धवेळ सदस्य असतात.
IRDA चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
श्री सुभाष चंद्र खुंटीया हे सध्याचे IRDA चे अध्यक्ष आहेत.
IRDA मधील सदस्य नियुक्ती कोण करते? सदस्य कालावधी किती असतो?
IRDA चे सदस्य हे भारत सरकार कडून निवडले जातात. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 60 वर्षे इतका असतो.