NABARD फुल फॉर्म NABARD Full Form In Marathi

NABARD Full Form In Marathi : NABARD ही एक भारतातील शिखर बँक आहे हे देखील फार कमी लोकांना माहिती असेल. आज आपण NABARD म्हणजे काय, NABARD चा फुल फॉर्म, NABARD चा इतिहास, NABARD ची मुख्य कार्ये, NABARD ग्रामीण कर्ज योजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

NABARD Full Form In Marathi

NABARD फुल फॉर्म NABARD Full Form In Marathi

NABARD Full Form in Marathi । NABARD Long Form in Marathi

NABARD शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा National Bank for Agricultural and Rural Development (नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट) होय.

NABARD शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक / ग्रामीण आणि कृषी विकासासाठी राष्ट्रीय बँक असा होतो.

NABARD म्हणजे काय? – What is NABARD?

ग्रामीण विकासाचा उद्देश्य पुढे ठेवून सरकारने ग्रामीण विकासासाठी स्थापन केलेली एक शिखर बँक म्हणजे नाबार्ड होय. नाबार्डच्या मदतीने आज आपल्याला ग्रामीण भागात देखील विकास झालेला बघायला मिळतो आहे.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी आणि ग्रामीण विकासात उद्योगांना आणि शेतीला कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरविण्याचे कार्य हे नाबार्ड बँकेमार्फत केले जाते.

आज व्यवस्थापकीय संचालक नाबार्डची कार्ये बघतात. केंद्र सरकारकडून नाबार्ड साठी अर्थसंकल्प सादर केले जातात. याशिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकार देखील नाबार्ड साठी अर्थसंकल्पात जागा देते.

NABARD चा इतिहास – History of NABARD

1981 रोजी शिवरामन समितीची शिफारस समोर आली आणि त्यानुसार त्यांनी देशातील ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी एक संस्था असावी असे सांगितले. समितीच्या शिफारशी अनुसार कायदेशीर रित्या 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट ची स्थापना करण्यात आली.

नाबार्डच्या स्थापनेच्या आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया मध्ये कृषी पत विभाग आणि ग्रामीण नियोजन आणि पत विभाग होता. नाबार्ड स्थापनेनंतर त्याची जागा देखील नाबार्ड ने घेतली.

ग्रामीण भागात सुरू असलेले व्यवसाय म्हणजे कृषी, लघुउद्योग, ग्रामोद्योग आणि हस्तकला यांना विकास आणि ग्रामीण विकास यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी देशातील सर्वात शिखर बँक म्हणून नाबार्ड असावी असा आदेश भारत सरकारने काढला होता.

NABARD ची कार्ये – Functions of NABARD

  • ग्रामीण विकासासाठी मदत करणे.
  • पुनर्वसन कार्यात मदत करून त्यावर देखरेख ठेवणे.
  • ग्रामीण विकासासाठी जिथे संस्थेला कर्जाची गरज आहे ती पुरविणे.
  • ग्रामीण विकासात एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज असेल तर ती पुरविणे.
  • IRDP म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा नाबार्डच्या अंतर्गत चालतो.
  • त्यामुळे IRDP साठी वेगळा निधी आणि मुख्य लक्ष केंद्रित करणे.
  • दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रमात मोलाचा वाटा हा नाबार्डचा असतो.
  • सहकारी आणि प्रादेशिक बँकावर काही प्रमाणात नाबार्डचे लक्ष असते. कारण अनेकदा या बँका ग्रामीण विकास आणि शेती संबंधीत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मदत आणि काही कारणास्तव मार्गदर्शक सूचना देखील नाबार्ड करते.
  • ग्रामीण भागातील लघु आणि कुटिरोद्योगांसाठी कर्ज पुरविण्याचे कार्य नाबार्ड मार्फत केले जाते.
  • कृषी कर्जासाठी नाबार्ड कडून पाठपुरावा केला जातो.

NABARD ग्रामीण कर्ज – NABARD Rural Loan / Credit

नाबार्ड द्वारे देशभरात कार्य सुरू आहे. त्यांच्याकडून देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी अशी योजना बनविलेली असते. नाबार्ड मार्फत प्रत्येक वर्षाला अशी वार्षिक पत योजना जिल्हा निहाय बनविली जाते.

वार्षिक पत योजनांमध्ये ग्रामीण क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ग्रामीण सहकारी आणि प्रादेशिक बँकांमध्ये किती पत असावी यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करत असते. ग्रामीण विकास कार्यांना चालना कशी देता येईल याकडे NABARD चे सदैव लक्ष असते. विकास कार्यक्रम राबवून त्यांची अंमलबजावणी करत असताना गुंतवणूक आणि उत्पादक क्रेडिट देण्याचे कार्य नाबार्ड चे आहे.

NABARD आणि RBI – NABARD and RBI

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे असे आपण सहज बोलून जातो तर नाबार्ड चा RBI च्या अंतर्गत समावेश केलेला आपल्याला आढळतो. RBI ही बँकांसाठी एक नियमावली बनवत असते. बँकिंग कायदा 1949 अनुसार RBI ही संस्था संपूर्ण देशातील बँकांवर नियंत्रण ठेवणारी एक महत्वाची वित्तीय संस्था आहे.

नाबार्ड चे संचालक मंडळ देखील RBI अंतर्गत बनविलेले असते. कारण नाबार्ड संचालक मंडळावर रिझर्व्ह बँकेचे एकूण 3 संचालक असतात. हे तीन संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड मधील दुवा असतात.

नाबार्ड अंतर्गत ग्रामीण भागातील विकासासाठी लागणाऱ्या सर्व योजना आणि प्रादेशिक किंवा सहकारी बँकांच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठी शिफारशी या RBI कडे जात असतात. त्यामुळे नाबार्ड सोबत RBI ला देखील ग्रामीण भागाच्या विकासाचे श्रेय प्राप्त होते.

FAQ

नाबार्डची स्थापना कधी झाली?

12 जुलै 1982 रोजी नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड ची स्थापना करण्यात आली.

नाबार्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण आहेत?

डॉ जी आर चिंताताल हे 27 मे 2020 पासून नाबार्डचे म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे अध्यक्ष (CEO) आहेत.

नाबार्डच्या परिक्षांमार्फत कोणत्या पदांची भरती होते?

नाबार्डच्या परिक्षांमार्फत ग्रेड ए आणि ग्रेड बी मध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या दोन पदांसाठी भरती केली जाते.

नाबार्ड काय आहे? थोडक्यात सांगा.

नाबार्ड ही भारतातील ग्रामीण आणि कृषी विकासासाठी असलेली एक शिखर बँक आहे. नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक होय

Leave a Comment