NPA फुल फॉर्म NPA Full Form In Marathi

NPA Full Form In Marathi भारतात आपल्याला अनेक दिवसांपासून NPA हा शब्द बऱ्याचदा ऐकायला मिळत आला आहे यांच्यासाठी सर्वात जास्त कारणीभूत हे कर्ज घेऊन पळून जाणारे मोठे व्यावसायिक आहेत. आता ही कर्ज घेऊन पळून जाणारी मंडळी म्हणजेच विजय मल्ल्या, ललित मोदी, निरव मोदी यांचा आणि NPA चा संबंध काय? असा तुम्हाला देखील प्रश्न पडलेला असेल तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून NPA म्हणजे काय, NPA Full Form in Marathi, NPA आणि कर्ज खाते, NPA मुळे होणारे नुकसान, NPA मध्ये कोणत्या घटकांचे योगदान असते, NPA टाळण्यासाठी सरकार कडून केल्या गेलेल्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

NPA Full Form In Marathi

NPA फुल फॉर्म NPA Full Form In Marathi

NPA Full Form in Marathi – NPA Long Form in Marathi

NPA या शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Non Performing Asset (नॉन परफॉरमिंग असेट्स) असा होतो.
NPA म्हणजे ज्यावेळी एखादा कर्ज घेतलेला व्यक्ती त्याचे कर्ज परत करू शकत नाही, त्याचे हफ्ते थकतात त्यावेळी त्या व्यक्तीचे कर्ज खाते हे NPA बनते.

NPA म्हणजे काय? – What is NPA in Marathi?

NPA म्हणजे नॉन परफॉरमिंग असेट्स होय. असेट्स म्हणजे मालमत्ता होय. NPA शब्दाचा पूर्ण अर्थ घ्यायचा ठरल्यास अशी मालमत्ता जी कोणत्याही प्रकारे चलनात नाहीये.

आता याचा सरळ संबंध हा तुमच्या कर्ज खात्याशी आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असेल आणि त्याला त्या कर्जाचे हफ्ते परत करता येत नसतील तर मग त्याचे कर्ज खाते हे NPA खाते बनते.

त्याला दिलेले कर्ज हे त्या व्यक्तीने इतर कुठेही वापरलेले जरी असले तरी देखील आता बँकेकडून त्याच्यावर ते ऋण च असते. म्हणजे बँकेचा तो पैसा आता जवळपास डुबलेला असतो. बँकेला आता ते परत मिळेल की नाही यात शंका असते.

म्हणजे बँकेला आता ती रक्कम जवळपास सोडावी लागते कारण त्यांना ती परत मिळू शकते पण पुढील कारवाई झाल्यानंतरच… तोपर्यंत हे कर्ज खाते बँकेला NPA मध्ये टाकावे लागते.

बँकांकडून अनेकदा शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, सोने तारण कर्ज, वयक्तिक कर्ज, कार लोण, बाईक लोण, व्यावसायिक वाहन कर्ज, कृषी कर्ज आणि याप्रकारे अनेक वेगवेगळे कर्ज दिले जातात तेव्हा ते परत घेण्यासाठी एक कालावधी ठरविला जातो. NPA च्या कायद्यानुसार 90 दिवसांपेक्षा जास्त काळ जर कर्जाचा हफ्ता आणि व्याज भरले गेले नसेल तर त्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला तुमचे खाते NPA घोषित करावे लागते.

NPA झालेल्या खात्यातील रक्कम ही देशाच्या चलनात नसते आणि त्यामुळे बँका हे कर्ज परत मिळावे यासाठी प्रयत्न करतात. मात्र ही प्रक्रिया थोडीशी मोठी असल्याने कर्ज घेणाऱ्याला इतका कालावधी मिळून जातो की ते विजय मल्ल्या आणि निरव व ललित मोदी यांसारखे देश सोडून निघून जातात.

NPA आणि कर्ज खाते

कर्ज देण्याचे सर्वात महत्वाचे कारण हे एखाद्याची मदत करणे हे जरी असले तरी देखील त्या दिलेल्या रक्कमेतून अधिकाधिक नफा मिळविणे हे देखील त्या वित्तीय संस्थेचे काम असते. हा नफा व्याजातून निघत असतो.

मात्र नियमानुसार जर एखादा कर्ज घेतलेला व्यक्ती जर घेतलेले कर्ज सलग 3 महिने म्हणजे 90 दिवस कर्जाचा हफ्ता आणि व्याज परतावा देऊ शकत नसेल तर बँकांना किंवा वित्तीय संस्थांना त्याचे हे कर्ज खाते NPA मध्ये टाकावे लागते.

खाते NPA झाल्यानंतर मात्र आता त्या व्यक्तीला बँकांकडून आणि नंतर काही कालावधीने सरकारकडून नोटीस जाते. त्यानुसार त्यांनी जर कर्ज परत केले नाही तर त्यांची गहाण ठेवलेली मालमत्ता देखील जप्त केली जाते. या गहाण मालमत्तेला विकून एक रक्कम काढून घेतली जाते आणि याच रक्कमेतून मग बँका त्यांचे कर्ज परत फेडण्यासाठी वापरतात.

NPA मध्ये योगदान देणारे घटक

1. कधी कधी बँका एखाद्या व्यक्तीला त्याच्या पत अनुसार किंवा एखाद्या महापालिका सारख्या संस्थेला कोणतेही मॉर्टेज न ठेवता कर्ज देते, यातून सर्वाधिक जोखीम घेतलेली असते.
2. अनेकदा मोठा व्यक्ती किंवा व्यावसायिक आहे असे म्हणून बँका त्यांच्या अव्यवहार्य कामांसाठी कर्ज देते.
3. ज्या बँका किंवा संस्था व्यवसायांसाठी कर्ज देतात त्यांच्याकडे माणसाचा पत ठरविणारा निकष आहे मात्र व्यवसायाचा तसा पत निकष अजून उपलब्ध नाही.
4. कर्ज वसुली करण्यात बँका कमी पडतात.
5. बँका कर्ज आणि तोटा यांना समजून न घेता त्याचा वापर त्यांच्या भांडवलात घेऊन खरी क्षमता जाणून घेत नाहीत.

NPA मुळे होणारे नुकसान

  •  NPA आणि वित्तीय संस्था याचा इतका जास्त संबंध आहे की जास्त NPA वाढला की त्या संस्थेची दिवाळखोरी निघते.
  •  NPA वाढला की बँकांना होणार फायदा हा व्याज परत मिळत नसल्याने कमी होतो आणि परिणामतः सरकारला मिळणारे उत्पन्न कमी होते.
  •  सरकार कडे पैसे नसल्याने गुंतवणूक कशात होत नाही. रोजगार आणि मंदी या महत्त्वाच्या समस्या देखील या NPA वर अवलंबून आहेत.
  •  ठेवींवर मिळणारा व्याजदर कमी होतो आणि कर्जावरील व्याजदर हा वाढत जातो.
  •  देशाची आर्थिक स्थिती ढासळते. मंदी ही समस्या जाणवली की देश पुन्हा अधोगतीच्या दिशेने वाटचाल करतो.

FAQ

NPA संबंधित केस या कोर्ट मध्ये कोणत्या कायद्या अंतर्गत येतात?

NPA सोबत संबंध असणारे सर्व खटले हे रिकव्हरी ट्रिब्युनल या आयोगाच्या अंतर्गत येतात. कोर्टामध्ये या खटल्याची वर्णी ही DEBT RECOVERY TRIBUNALS अंतर्गत येते.

NPA संबंधीत असणारा SARFAESI ACT म्हणजे काय?

2002 मध्ये सराकरने हा SARFAESI ACT लागू केला. SARFAESI ACT म्हणजे Securitisation and Reconstruction Of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 होय. NPA आणि कर्ज खाते यांचे संबंध या कायद्यात दिलेले असून सध्या NPA आणि कर्ज वसुली या कायद्याच्या अंतर्गत कार्य करते.

NPA चे प्रकार कोणते आहेत?

सबस्टॅंडर्ड NPA, संशयास्पद NPA आणि तोटा संपत्ती हे NPA चे मुख्य 3 प्रकार आहेत.

RBI अनुसार NPA म्हणजे काय?

RBI च्या नियमानुसार NPA म्हणजे अशी मालमत्ता जीचा मागील 90 दिवसांमध्ये कर्जाचा एक हफ्ता किंवा व्याजाची काहीही रक्कम वित्तीय संस्थेला परत मिळाली नाही.

Leave a Comment