MRI फुल फॉर्म MRI Full Form In Marathi

MRI Full Form In Marathi वय जास्त झाल्यानंतर अनेकदा आपल्याला अशा समस्या जाणवतात ज्यांचे निदान हे MRI सारख्या यंत्राच्या माध्यमातून समोर येऊ शकते. अनेकदा अनेक आजारांचे कारण हे आपल्याला सापडत नाही तेव्हा शरीरातील एखाद्या विशिष्ट भागाचा MRI स्कॅन केला जातो. आज आपण MRI म्हणजे काय, MRI शब्दाचा फुल फॉर्म काय आहे, MRI टेस्ट का केल्या जातात, MRI तपासणी कशी करतात, MRI तपासणीचे काही दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MRI Full Form In Marathi

MRI फुल फॉर्म MRI Full Form In Marathi

MRI Full Form in Marathi | MRI Long Form in Marathi

MRI हा शब्द मेडिकल क्षेत्रातील एक महत्वाचा स्कॅन आहे. अनेकदा आपल्याला MRI केला गेला हे वाक्य मेंदूच्या आजाराबाबत ऐकायला मिळते. MRI शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Magnetic Resonance Imaging (मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग) असा आहे. MRI शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा चुंबकीय प्रतिध्वनी इमेजिंग असा होतो.

MRI म्हणजे काय? What is MRI in Marathi?

MRI ही वैद्यकीय क्षेत्रातील एक तपासणी आहे. MRI ला मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग म्हणून ओळखले जाते. वैद्यकीय क्षेत्रात शरीरातील सॉफ्ट टिश्यू असणाऱ्या भागातील आजारांचे निदान व्हावे यासाठी MRI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. सॉफ्ट टिश्यू असलेले भाग म्हणजे नर्व्ह सिस्टम, मेंदू, स्नायू, मणका, लिव्हर आणि कॅन्सर सारख्या समस्यांचे निदान होण्यासाठी MRI तंत्रज्ञानाचा वापर सध्या केला जातो आहे.

MRI हे तंत्र विकसित झालेले असून त्याचा शरीराला त्रास होत नाही मात्र यातून काही दुष्परिणाम मात्र नक्की होतात. मॅग्नेटिक फिल्ड चा आणि त्यासोबत रेडिओ लहरींचा वापर करून आपल्या शरीरातील एखाद्या भागाची इमेज याद्वारे मिळविली जाते.

MRI हे काहीसे एक्स रे मशीन सारखेच काम करते मात्र एक्सरे मशीन द्वारे हाडांवर जाऊन ते क्ष किरण मागे येतात तर MRI मध्ये शरीरातील नर्व्हस आणि सॉफ्ट टिश्यू वरून हे मॅग्नेटिक किरण परावर्तित होतात. संगणकावर आपल्याला आपल्या शरीराच्या त्या भागाचे अगदी सखोल माहिती दर्शविणारे चित्र बघायला मिळते.

MRI चा वापर का करतात? । Why use MRI Scan?

शरीरात कुठेही रक्ताच्या गाठी झालेल्या असतील तर त्या शोधण्यासाठी MRI या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शरीरातील कोणत्याही भागाची तपासणी करण्यासाठी MRI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

मुख्यतः यामध्ये महिलांमधील स्तनांची तपासणी, डोक्यातील आणि पाठीवरील हाडांची तपासणी, हृदय आणि रक्तवाहिन्यांची तपासणी, हाडे आणि जॉईंट यांची तपासणी, यकृत आणि गर्भाशयाची तपासणी व पुरुषांमधील काही ग्रंथींच्या तपासणी साठी MRI हे तंत्रज्ञान वापरले जाते.

MRI स्कॅन कसा केला जातो? | How MRI Scan Works?

MRI तपासणी करण्यासाठी एक मशीन असते त्याला आपण MRI मशीन म्हणून ओळखतो. MRI हे तंत्र कार्य सोपे करणारे जरी असले तरी त्यातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक फिल्डचा शरीराला वाईट परिणाम होतो. त्यामुळे हे मशीन एका खोलीत ठेवलेले असते त्या खोलीला MRI रूम असे म्हणतात. MRI करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरावरील जे शक्य आहे ते सर्व धातूचे पदार्थ बाहेर काढून ठेवावे लागतात.

ज्या धातूच्या पदार्थाना बाहेर ठेवता येत नाही त्यांवर आवरण चढविले जाते. MRI रूम मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला MRI मशिनच्या टेबलवर झोपविले जाते. हा टेबल आपोआप तुम्हाला त्या मॅग्नेटिक फिल्ड मध्ये घेऊन जातो. MRI करण्यासाठी जो रेडिओलॉजिस्ट बसलेला असतो तो तुमच्या शरीराच्या भागाचा विविध बाजुंनी फोटोग्राफ घेतो. त्यानंतर त्या इमेजेस तपासून मग त्याचा रिपोर्ट तयार केला जातो.

MRI तपासणी आधी घ्यावयाची काळजी । Precaution Before MRI Scan

  •  MRI स्कॅन करायला जाताना वर सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरावर कुठेही धातू असू नये. कान, दात आणि हाडे यांमध्ये धातू असतात तर त्याबद्दल डॉक्टरांना आधीच माहिती द्यावी.
  • शरीरावर जिथे टैट्यु असतील त्याविषयी डॉक्टरांना माहिती द्यावी कारण यामधून मॅग्नेटिक रेसोनान्स बदलू शकतो.
  •  MRI स्कॅन करताना आवाज हा खूप जास्त होतो. त्यामुळे तुम्हाला MRI करताना कानात बडस वापरता येतात.
  •  MRI स्कॅन करत असताना व्यक्ती अगदी शांत झोपला हवा. त्याचे शरीर स्थिर असावे.
  •  शरीर स्थिर राहत नसेल तर अशा व्यक्तीला फिजिशियन सोबत संपर्क करून त्याला भूल देता येते.

MRI आणि मृत्यू । MRI and Death

MRI स्कॅन करत असताना मृत्यू झाल्याची बातमी अनेकदा आपण ऐकत असतो तर आपल्या मनात या शंका नक्की येतील की MRI करणे योग्य आहे का? याचे उत्तर तुम्हाला वैज्ञानिक दृष्टया देण्याचा प्रयत्न करूयात. MRI म्हणजे मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग हे तर प्रत्येकाला आता समजले असेल.

MRI करण्यासाठी साधारणतः 15 ते 90 मिनिटांचा कालावधी लागतो. या कालावधी मध्ये बदल यासाठी आहेत कारण एखाद्या व्यक्तीचा जास्त भाग स्कॅन करावा लागत असेल किंवा वेगवेगळ्या बाजुंनी फोटो घ्यायचे असतील तर त्याला जास्त वेळ लागतो. इथे एक्स रे किंवा सिटी स्कॅन सारखे रेडिएशन वापरले जात नाहीत. MRI हे पूर्णपणे मॅग्नेटिक फिल्ड वर काम करते.

डॉक्टरांच्या माहिती अनुसार शरीरात ज्या ठिकानी हायड्रोजन आहे तिथे त्याच्या फिरण्याने एक इमेज बनत असते. मनुष्याच्या शरीरात 70% पाणी आहे आणि त्यामुळे जिथे हे हायड्रोजन स्पिन होत नाही तिथे काहीतरी अडचण आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येते.

धातूच्या न निघणाऱ्या वस्तूंवर डॉक्टर कडून कसले तरी पॅच लावले जातात. ते लावणे गरजेचे असते. अन्यथा शरीरात असलेले धातूचे पदार्थ या मॅग्नेटिक फिल्डने आकर्षित होऊन वेगाने तुमच्या शरीराला नुकसान करू शकतात. यामुळे आरोग्याला आणि जीविताला धोका होण्याच्या शक्यता असतात.

FAQ

MRI स्कॅन साठी किती खर्च येतो?

MRI स्कॅन साठी येणारा खर्च हा साधारणतः 3 हजार रुपये ते 15 हजार रुपये इतका असतो. सरकारी दवाखान्यात हा खर्च कमी येतो.

MRI स्कॅन चे दुष्परिणाम काय आहेत?

MRI स्कॅन करण्याचे जास्त काही साईड इफेक्टस नाहीत. मात्र तपासणी करत असताना आपला संपर्क हा मॅग्नेटिक फिल्ड सोबत आल्याने थोड्याफार प्रमाणात डोकेदुखी आणि अंगदुखी होऊ शकते.

MRI स्कॅन साठी किती वेळ लागतो?

MRI स्कॅन करण्यासाठी साधारणतः 15 मिनिटे ते 90 मिनिटे इतका कालावधी लागतो. जास्त वेळ लागू नये यासाठी डॉक्टरांकडून खबरदारी घेतली जाते.

MRI स्कॅन मशीनची किंमत किती असते?

MRI स्कॅन करण्यासाठी उपयोगात आणले जाणाऱ्या मशीनची किंमत ही साधारणतः 25 लाख ते 1 कोटी रुपयांच्या मध्ये असे. मशीन मधील सुविधांच्या अनुसार यामध्ये बदल बघायला मिळतात.

Leave a Comment