STI फुल फॉर्म STI Full Form In Marathi

STI Full Form In Marathi आपल्या देशात सरकारी पदावर अधिकारी म्हणून नोकरी हे खूप मानाचे मानले जाते त्यामुळे अशा पदांबद्दल बरीच चर्चा देखील होते. असाच कधीतरी तुम्ही STI  अधिकारी असा शब्द देखील ऐकला असेल. आजच्या लेखात आपण STI शब्दाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. STI  full form in Marathi म्हणजेच STI लाँग फॉर्म इन मराठी, STI  meaning in Marathi, STI  म्हणजे काय हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

STI Full Form In Marathi

STI फुल फॉर्म STI Full Form In Marathi

STI Full In Marathi |STI Long Form In Marathi:

STI  या शब्दाचा full form in Marathi म्हणजेच STI long form in Marathi हा State Tax Inspector (स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर) असा आहे. STI शब्दाचा मराठीतील अर्थ हा राज्य कर निरीक्षक असा होतो.

STI Meaning In Marathi|STI  म्हणजे काय? :

STI  म्हणजे State Tax Inspector म्हणजेच राज्य कर निरीक्षक होय. आपल्याला कळले असेल की STI हा एक कर अधिकारी असतो पण हा अधिकारी राज्यासाठी सीमित असतो. म्हणजेच STI अधिकारी हे राज्य स्तरावर कर निरीक्षक म्हणून कार्यरत असतात.

गस्त लागू होण्यापूर्वी STI अधिकाऱ्यास पूर्ण स्वरूप विक्रकर निरीक्षक म्हणून ओळखले जायचे. STI अधिकाऱ्याचे काम हे राज्य कराशी संबंधित असते. त्याबद्दल अजून माहिती आपण पुढे जाणून घेणारच आहोत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत अनेक परीक्षा घेतल्या जातात. MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ह्या महाराष्ट्रात राज्य स्तरावर गट अ, गट ब आणि गट क या पदांवर भरती करण्यासाठी घेतल्या जातात. MPSC गौण गट ब एकत्रित परीक्षा (MPSC combined exam) हि परीक्षा STI , PSI आणि ASO या तीन पदांवर अधिकारी निवड करण्यासाठी घेतली जाते.

याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात STI  बनण्यासाठी MPSC Combined Exam हि परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक राज्यात राज्य स्तरावरची MPSC सारखी परीक्षा असते. प्रत्येक राज्यात ह्या परीक्षेचे नाव वेगळे असू शकते आणि ज्या राज्यात STI  म्हणून काम करायचे आहे त्याच राज्याची परीक्षा द्यावी लागते. म्हणून महाराष्ट्रात STI  बनण्यासाठी MPSC Combined Exam हि परीक्षा द्यावी लागते.

आपण बघितले की STI म्हणजे काय. आता आपण बघुया की STI निवड प्रक्रिया कशी असते तसेच STI बनण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे.

STI  Selection Process | STI  निवड प्रक्रिया :

महाराष्ट्रात 2 पद्धतीने STI बंता येते –

 1. कर सहायक बनून त्यानंतर पदोन्नती होऊन STI बनणे.
 2. एमपीएससी अधीनस्थ सेवांद्वारे एकत्रित गट ब परीक्षा देऊन

STI  Eligibility | STI  पात्रता:

 • कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
 • खुल्या वर्गासाठी वय वर्षे 18-38 वर्षे असावे.
 • SC/ST वर्ग, माझी लष्कर सैनिक, खेळाडू आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी वय वर्षे 18-43 वर्षे असावे.
 • अपंगांसाठी वयोमर्यादा हि 18-45 वर्षे एवढी आहे.

STI  EXam Pattern | STI  परीक्षा स्वरूप :

 • STI बनण्यासाठी घेतली जाणारी MPSC गट ब एकत्रित परीक्षा हि 3 टप्प्यांत घेतली जाते – पूर्व परीक्षा (Preliminary Exam), मुख्य परिक्षा (Mains Exam) आणि मुलाखत.
 • एफएसएसएआय फुल फॉर्म

MPSC STI  Prelim Exam (पूर्व परीक्षा) –

STI परीक्षेतील पूर्व परीक्षा हा पहिला टप्पा आहे. पूर्व परीक्षा हि एकूण 100 गुणांची असते आणि 1 तास इतका वेळ असतो.  ही परीक्षा एमसीए स्वरूपाची असते. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षेस पात्र ठरले जाते.

MPSC STI  Mains Exam (मुख्य परीक्षा) –

 • पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परिक्षा देता येते. मुख्य परिक्षाचे 2 पेपर असतात. पेपर 1 हा एकूण 200 गुणांचा असतो. पेपर 1 मध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य अध्ययन हे विषय असतात. इंग्रजी विषयाचे एकूण 30 प्रश्न सतत आणि एकूण 60 गुण असतात, मराठी विषयाचे एकूण 50 प्रश्न असून एकूण 100 गुण असतात ते सामान्य अध्ययनाचे 20 प्रश्न असून हा विषय एकूण 40 गुणांचा असतो.
 • पेपर 2 हा चालू घडामोडी, मानसिक क्षमता, विक्रीकर या विधानावर आधारित असतो. पेपर 2 हा एकूण 200 गुणांचा असतो आणि यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात.
 • पेपर 2 मध्ये उत्तीर्ण झाल्यास आणि गुणवत्ता यादीत आल्यास उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले मुलाखती फेरीत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराची STI अधिकारी म्हणून निवड केली जाते.

STI  Training | STI  प्रशिक्षण:

STI परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि STI म्हणून निवड झाल्यानंतर उमेदवारांना STI  प्रशिक्षण दिले जाते. STI  प्रशिक्षण हे 6 महिन्यांचे असते. काहीवेळा उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात नाही. अशावेळी कामावर रुजू झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते.

Jobs of STI  Officer | STI अधिकाऱ्याची कामे :

 1. STI अधिकाऱ्यास डीलर्स/विक्रेत्यांकडून विक्रीकर भरला गेला आहे की नाही हे बघावे लागते आणि त्यासंबंधित प्रकरणे हाताळावी लागतात.
 2. STI अधिकाऱ्यास थकबाकीदारांची भेट घेऊन, मुलाखत घेऊन त्याचे परीक्षण करावे लागते तसेच त्यांना कर भरण्यासंबंधी अधिकृत सूचना द्यावा लागतात.
 3. STI अधिकाऱ्यास कनिष्ठ लिपिक आणीं तंत्रिक अधिकाऱ्यांचे आयोजन आणि पर्यवेक्षण करावे लागते.
 4. कर करायची अमलबजावणी अशी करावी याचे नियोजन STI अधिकाऱ्यास करावे लागते.
 5. STI अधिकाऱ्यास आर्थिक नोंदी तपासाव्या लागतात.
 6. बजेट आणि संसाधन व्यवस्थापनचे काम STI अधिकाऱ्यास करावे लागते.
 7. मालमत्तेची बांधणी करण्याच्या हेतूने पंचनामा करण्याचे काम STI अधिकाऱ्यास करावे लागते.
 8. STI अधिकाऱ्यास मालमत्ता लिलाव करण्याचा अधिकार असतो तसेच अश्या लिलावात STI अधिकाऱ्यास उपस्थित असणे बंधनकारक असते.

FAQs

STI  परीक्षा किती वेळा देता येते?

STI  pariksha देण्यासाठी कुठ्ल्याही प्रक्रे attempt ची म्हणजेच प्रयत्नांची अट नाही. वयोमर्यादा संपेपर्यंत STI  परीक्षा देता येते.

STI  चा हातामधे येणारे एकूण वेतन किती आहे?

STI अधिकाऱ्यांचे मासिक in-hand वेतन हे ₹49,000 ते ₹122800 इतके आहे.

Mpsc STI  पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणती वेबसाईट आहे

mpsc.gov.in ही MPSC ची अधिकृत website aahe. Yavar STI  परीक्षेसाठी अर्ज भरता येतो.

Leave a Comment