SEBI फुल फॉर्म SEBI Full Form In Marathi

SEBI Full Form In Marathi आपण SEBI हा शब्द अनेक वेळा ऐकला असेल तसेच ही संस्था शेअर बाजाराशी संबंधित आहे हे पण आपल्याला माहित असेल. SEBI ही एक संस्था आहे ती आपल्या देश्याच्या शेअर बाजारावर देखरेख ठेवण्याचे काम करते. आज आपण SEBI म्हणजे काय ? SEBI काय काम करते ? SEBI फुल्ल फॉर्म इन मराठी ? SEBI बद्दल संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत.

SEBI Full Form In Marathi

SEBI फुल फॉर्म SEBI Full Form In Marathi

SEBI Full Form In Marathi। SEBI Long Form In Marathi 

SEBI हा शब्दाचा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म “Securities and exchange board of India” (सेक्युरिटी अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया) हा असा होतो. SEBI चा मराठी फुल्ल फॉर्म “भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ”असा आहे.

SEBI म्हणजे काय? – What Is SEBI?

SEBI  म्हणजे सेक्युरिटी अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया असा आहे, यालाच “भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ”असा आहे. कोणत्याही बाजारपेठेला किंवा उद्योगाला सांभाळण्यासाठी संस्थाची गरज असते त्यासाठीच शेअर बाजार सांभाळण्यासाठी SEBI ची स्थापना झाली. SEBI हि भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी सर्वात मोठी संस्था आहे.

SEBI चा इतिहास – History Of SEBI

SEBI ची स्थापना १२ एप्रिल १९८८ रोजी SEBI ची स्थापना करण्यात आली पण १२ एप्रिल १९९२ रोजी हि एक स्वयंपूर्ण संस्था बनली ,सेक्युरिटी मार्केट मध्ये नियमन करण्यासाठी स्थापना करण्यात आली.

शेयर्स मार्केट मध्ये वाढती फसवणूक व SCAM ला आळा घालण्यासाठी SEBI ची स्थापना झाली. SEBI चे मुख्यलाय मुंबई ला असून कोलकत्ता,दिल्ली आणि चेन्नई ला तिची विभागीय कार्यालय आहे.

नंतर जयपूर,बेंगळूर या ठिकाणी  स्थानिक कार्यालय उघडले आहे. २०१३-२०१४  मध्ये भुवनेश्वर,पाटणा,कोची,गुहावती आणि चंदीगड इथे देखील कार्यालय उघडली गेली.

निवृत्त पोलीस आधीकारी दत्तात्रय सोमण हे काही काळ सेबी चे सल्लागार होते.आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी सेबी ला काय काय करता येईल त्यांनी सल्लगार च्या भूमिकेत मदत केली.त्यामुळे सेबी बळकट झाली व गुंतवणूक दारांना दिलासा देण्यात प्रभावी ठरली.

श्रीमती माधवी पुरी बूच ह्या सद्याच्या SEBI च्या चेअरमन आहे. सेबीचे पूर्वकालीन चेअरमन अजय त्यागी यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२२ रोजी समाप्त झाला व १ मार्च २०२२ रोजी श्रीमती माधवी पुरी बूच या दिवशी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तीन वर्षा साठी त्यांची नियुक्ती झाली आहे . तसेच त्या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत.

SEBI चे सर्व विभाग

  • कमिटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट रेगुलेशन विभाग
  • महानगरपालिका वित्त विभाग
  • विभाग आर्थिक आणि धोरण विश्लेषण
  • कर्ज आणि संकरित विभाग
  • अंमलबजावणी विभाग – 1
  • अंमलबजावणी विभाग – 2
  • चौकशी आणि निवारण विभाग
  • सामान्य सेवा विभाग
  • पुनर्प्राप्ती आणि परतावा विभाग
  • मानव संसाधन विभाग
  • परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि संरक्षकांचे विभाग
  • माहिती तंत्रज्ञान विभाग
  • एकात्मिक पाळत ठेव विभाग
  • अन्वेषण विभाग
  • गुंतवणूक व्यवस्थापन विभाग
  • कायदेशीर व्यवहार विभाग
  • मार्केट इंटरमीडियरी नियमन व पर्यवेक्षण विभाग
  • बाजार नियमन विभाग
  • आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यालय
  • गुंतवणूकदार सहाय्य आणि शिक्षण कार्यालय
  • अध्यक्ष कार्यालय
  • प्रादेशिक कार्यालये
  • दक्षता विभाग

SEBI चे कार्य

  • सेक्युरिटी एक्सचेन्ज कायद्याना मंजुरी देणे.
  • सेक्युरिटी एक्सचेन्ज त्यांच्या कायद्या नुसार दुरुस्ती करणे.
  • आर्थिक माध्यमांच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करणे.
  • ब्रोकर आणि सब ब्रोकर ची नोंदणी करणे.
  • न्यायालयीन प्रमुख म्हणून घोषणा,आदेश,नियम काढण्याचा अधिकार सेबी ला आहे.
  • प्रमुख म्हणून सेबी गैरव्यहारची चौकशी व त्यावर कारवाई करू शकते.
  • कायदेपालक म्हणून सर्व कायदे कार्याचा अधिकार सेबी ला आहे.
  • खात्याच्या पुस्तकाची तपासणी करणे आणि मान्यताप्राप्त सेक्युरिटी एक्सचेन्ज नियमित परतावा मागवणे .

SEBI ची कार्यपद्धती

SEBI तीन घटकांसाठी काम करते-

  • प्रतिभूती निर्गमन
  • गुंतवणूकदार
  • बाजारातील मध्यस्थ आणि बाजार

सदस्य स्थापना

  • SEBI चे अध्यक्ष हे भारत सरकारकडून निवडले जातात.
  • दोन सदस्य हे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी असतात.
  • रिझर्व बँक ऑफ इंडियाचा एक सदस्य असतो.
  • उर्वरित सदस्य हे भारत सरकार कडून नेमले जातात,त्यातील सदस्य हे पूर्ण वेळ सदस्य असतील.

SEBI चे उद्दिष्ट

  • कंपन्या/संस्था यांना शेयर विक्री / खरिदि साठी योग्य वातावरण तयार करणे.
  • गुंतवणूक दारांचे शेयरचे चे संरक्षण करणे.
  • सर्व शेयर मार्केट वर नियंत्रण ठेवणे.
  • व्यवहार कार्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविदा उपलब्ध करून देणे.
  • रोखे बाजारात व्यावसायिक तत्वावर चालण्यासाठी वातावरण निर्माण करणे.

भारतातील रोखे बाजार

भारतात अनेक रोखे बाजार आहे त्यातील प्रामुख्याने ४ हे महाराष्ट्रात आहे. त्यातील तीन हे मुंबई इथे आहे हे राष्ट्रीय रोखे बाजार म्हणून मानले जातात आणि एक हा पुण्यात आहे तो क्षेत्रीय रोखे बाजार म्हणून मानला जातो.

मुंबई रोखे बाजार लाच BSE”(Bombay Stock exchange)” असे म्हणतात.

BSE ची स्थापना ५ फेब्रुवारी १८७७ रोजी रोजी झाली झाली पण अधिकृत मान्यता ३१ ऑगस्ट १९५७ रोजी मिळाली. मुंबई  रोखे बाजारात नोंदणी साठी कंपनीचे भांडवल ५ कोटी असावे लागते.

राष्ट्रीय रोखे बाजार म्हणजे NSE(National Stock Exchange) होय

१९५६ याची स्थापना करण्यात अली,देशातील प्रमुख १६ बँक व वित्तीय संस्था मिळून राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना केली केली.

FAQ

SEBI म्हणजे काय?

SEBI  म्हणजे सेक्युरिटी अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया होय, यालाच “भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ”असा आहे.

SEBI इन मराठी .

SEBI म्हणजे  भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ होय.

SEBI ची स्थापना कधी झाली?

SEBI ची स्थापना १२ एप्रिल १९८८ रोजी करण्यात आली .

What is Full Form Of SEBI.

Securities and exchange board of India”

SEBI ची वेबसाईट कोणती आहे ?

https://www.sebi.gov.in/ हि SEBI ची वेबसाईट आहे

SEBI चे सद्याचे चेअरमन कोण आहे ?

श्रीमती माधवी पुरी बूच ह्या सद्याच्या SEBI च्या चेअरमन आहे.

SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहे ?

श्रीमती माधवी पुरी बूच ह्या सद्याच्या SEBI च्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

Leave a Comment