WTO फुल फॉर्म WTO Full Form In Marathi

WTO Full Form In Marathi जागतिक स्तरावर व्यापाराचे उदारीकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मिळून सुरू केलेली WTO ही संघटना आज जागतिक बाजारावर लक्ष ठेवून आहेत. याच WTO विषयी WTO म्हणजे काय, WTO चा फुल फॉर्म काय आहे, WTO संदर्भातील गॅट करार म्हणजे काय, गॅट करतात काय तरतुदी आणि निकष आहेत, WTO ची कार्ये,WTO ची उद्दिष्टये, WTO ची रचना सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

WTO Full Form In Marathi

WTO फुल फॉर्म WTO Full Form In Marathi

WTO Full Form in Marathi || WTO Long Form in Marathi

WTO शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा World Trade Organization (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) असा आहे. WTO शब्दाचा मराठी भाषेत FULL FORM हा आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना असा आहे.

WTO म्हणजे काय? – What is WTO in Marathi?

जगभरातल्या व्यापारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणजे WTO होय. उदारीकरण ही अर्थशास्त्रीय संकल्पना जगभरात राबविण्यासाठी WTO चे योगदान मोलाचे आहे. आपल्याकडे ज्या आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण होत आहेत किंवा झालेल्या आहेत त्यांच्या स्थापनेविषयी नियम प्रस्थपित करणे हे कार्य WTO करते. नियमांमध्ये सुधारणा आणि बदल करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम WTO मार्फत केले जाते.

जगभरातून 164 देश हे WTO चे सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारात ही एकमेव संस्था कार्यरत आहे. WTO अंतर्गत केलेला गॅट हा करार अनेक राष्ट्रांनी स्वाक्षरी करून संमत केलेला आहे. याच गॅट कराराच्या अंतर्गत देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू आहे.

WTO ही आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आहे मात्र इतर आंतरराष्ट्रीय संघटनाप्रमाणे या संस्थेवर युनो म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन चे वर्चस्व नाही. WTO पूर्णपणे एक स्वतंत्र संस्था म्हणून जगभरात कार्यभार करते.

WTO चा इतिहास – History of WTO

जागतिक महामंदी विषयी आपण नक्कीच ऐकून असाल मात्र ही जागतिक महामंदी झाल्यानंतर संपूर्ण जगाच्या समोर हे असे संकट पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले गेले. कोलमडलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी एक परिषद घेण्यात आली ती म्हणजे ब्रेटन वुड परिषद होय.

ब्रेटन वुड परिषद ही जगाच्या पाठीवर जगातील बँक, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था यांच्या उगमाचा केंद्रबिंदू म्हणून समजली जाते.

याच परिषदेत आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणजे WTO ची स्थापना व्हावी यासाठी एक समिती नेमली गेली. तीच समिती पुढे अहवाल सादर करत गेली आणि आज आपण त्या बळावर WTO कार्यरत आहे हे बघतो.

WTO ची स्थापना ही कदाचित विकसित राष्ट्रांसाठी एक धोका होती त्यामुळे अनेक विकसित राष्ट्रांनी या संस्थेच्या निर्मितिला विरोध केला होता मात्र नंतर हा विरोध मावळून सर्व सुरळीत झाले. अमेरिकेने देखील यामध्ये काही व्यापारविषयी आणि रोजगार निर्मिती विषयी प्रस्ताव समोर ठेवले.

गॅट करार म्हणजे काय? What is the GATT Agreement?

गॅट हा करार आयात कर कमी करण्याविषयी एक सर्वमान्य करार आहे. जिनिव्हा या ठिकाणी 1947 मध्ये एक परिषद घेण्यात आली होती आणि त्यानुसार एक करार करण्यात आला त्याला गॅट करार म्हणून ओळखले जाते. WTO अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यासाठी आयात व्यापार कर कमी करण्यात यावा यासाठी स्वाक्षरी करण्यात आल्या.

1 जानेवारी 1948 रोजी GATT हा करार झाला. मात्र याकाळात सुद्धा WTO अजूनही अस्तित्वात आलेली नव्हती. गॅट करारावरून  अनेक राष्ट्रांमध्ये मतभेद होते. यामध्ये विकसित राष्ट्रांच्या बाजूने निर्णय झाला असे अनेकांना वाटत होते.

मात्र यामध्ये विकसनशील राष्ट्र कमकुवत पडत होते. पुढे 1 जानेवारी 1995 रोजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO ची स्थापना करण्यात आली. WTO अंतर्गत मग गॅट करारावर चर्चा सुरू झाली आणि पुढील थोड्याच काळात म्हणजे 12 डिसेंबर 1995 रोजी गॅट करार संपवून WTO ने सर्व कार्यभार हाती घेतला.

WTO ची रचना – Structure of WTO

मंत्री परिषद

WTO ने केलेल्या सर्व बहुपक्षीय करार आणि त्या संबंधित कोणत्याही बाबी असतील तरी त्यावर मंत्री परिषदेचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. ही मंत्री परिषद प्रत्येक 2 वर्षांनी होत असते. या बैठकीला अध्यक्ष हे WTO चे अध्यक्ष असतात, सर्व अधिकारी हे समान दर्जावर असतात.

जनरल कौन्सिल

ही मंत्री परिषदच असते मात्र ही दररोजचे कामकाज बघते. यामध्ये सर्व सदस्य देश आपला एक एक प्रतिनिधी पाठवतात. जनरल कौन्सिल ही बॉडी अनेक विभागांमध्ये विभागली गेली आहे. त्यांच्या कार्यानुसार हे विभाग पडलेले आहेत. नियम बनवून त्यांची अंमलबजावणी करणे हे यांचे काम असते.

व्यापार धोरण पुनरावलोकन संस्था

जनरल कौन्सिल चा एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ही संस्था होय. बदलता काळ आणि WTO ची धोरणे यांची सांगड घालण्याचे कार्य ही संस्था करते. व्यापारविषयी धोरणांमधील बदल हे देशांमध्ये पोहोचविणे आणि अंमलबजावणी करणे हे त्यांचे काम असते.

वाद विवाद मिटवणारी संस्था

व्यापारात सदस्य राष्ट्रांमध्ये वाद हे होतात आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी WTO चा एक विभाग कार्य करत असतो.

WTO ची कार्ये – Functions of WTO

  • सदस्य राष्ट्रांमधील व्यापारी वाद मिटविणे किंवा त्यावर तोडगा काढणे.
  • बहुद्देशीय व्यापारी करार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.
  • व्यापारातील आयात आणि निर्यात शुल्क यावर नियंत्रण ठेवणे.
  • प्रत्येक राष्ट्राच्या व्यापारी धोरणात लक्ष घालणे.
  • व्यापारी नियमांची अंमलबजावणी आणि त्याविषयी सदस्य राष्ट्रांना माहिती देणे.
  • विकसनशील देशांना विकसित होण्यासाठी मदत करणे.
  • जागतिक मंदीसारख्या समस्या उद्भवणार नाहीत यासाठी प्रयत्नशील असणे.

FAQ

गॅट करार आज लागू आहे का?

गॅट हा करार स्पष्ट होऊन जरी त्याची जागा WTO ने घेतलेली असली तरी देखील आजही गॅट कराराचे अस्तित्व WTO अंतर्गत टिकून आहे.

WTO चे सदस्य राष्ट्र किती आहेत?

WTO चे एकूण 164 सदस्य राष्ट्र आहेत.

WTO ची स्थापना कधी झाली?

1 जानेवारी 1995 रोजी WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची स्थापना करण्यात आली.

WTO चे मुख्यालय कुठे स्थित आहे?

स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे WTO म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटनेचे मुख्यालय स्थित आहे.

Leave a Comment