CGPA फुल फॉर्म CGPA Full Form In Marathi

CGPA Full Form In Marathi सध्या जवळपास सर्व उच्च शिक्षणाच्या कोर्सेस मध्ये ग्रेड गुण प्रक्रिया आली असून यामध्ये CGPA हा विषय अनेकदा आपल्याला आपल्या मार्कशीट मध्ये बघायला मिळत असतो. CGPA या पद्धतीत तुम्हाला 100% पैकी मार्क्स न कळता ते ग्रेड पैकी कळतात. तर मग यामध्ये आणि तुमच्या टक्केवारी मध्ये काय फरक आहे? CGPA म्हणजे नक्की काय?, CGPA Full Form in Marathi, CGPA कसा काढतात, टक्के आणि CGPA यामधील संबंध याविषयी आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

CGPA Full Form In Marathi

CGPA फुल फॉर्म CGPA Full Form In Marathi

CGPA Full Form in Marathi – CGPA Long Form in Marathi

CGPA या शब्दाचा वापर हा आता शिक्षण क्षेत्रात सर्वत्र होतो आहे. विद्यार्थ्याने पूर्ण वर्षात काय काय केले याचे सर्व उत्तर हे आपल्याला CGPA मधून समजते. CGPA शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Cumulative Grade Point Average (क्यूम्युलॅटिव्ह ग्रेड पॉईंट एव्हरेज) असा होतो. मराठी भाषेत CGPA चा Full Form हा सरासरी श्रेणी पॉईंट असा होतो.

CGPA म्हणजे काय? (What is CGPA in Marathi?)

विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आता टक्केवारी न देता सराकरने CGPA च्या माध्यमातून श्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना त्यांच्या सत्राच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी वर्षभरातील सर्व काही कार्याचा अनुसार हे ग्रेड पॉईंट्स मिळतात.

CGPA म्हणजे Cumulative Grade Point System होय. यालाच मराठी भाषेत सरासरी श्रेणी पॉईंट्स असे म्हणतात. CGPA हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने दाखविले जातात. यातील पहिली पद्धती म्हणजे ज्यात आपल्याला श्रेणीच्या रुपात आपले मार्क्स कळतात तर दुसरी पद्धत म्हणजे ज्यात 10 पैकी पॉईंट्स च्या स्वरूपात मार्क्स कळतात.

CGPA पद्धतीने विद्यार्थाला त्या विषयात सर्वात शेवटी जे काही गुण मिळाले असतील त्याची सरासरी CGPA मधून कळते. प्रत्येक देशात ही सरासरी काढण्याची पद्धती वेगवेगळी आहे. भारतातील या पद्धतीविषयी आपण जाणुन घेणार आहोत.

CGPA आणि श्रेणी – CGPA and Grades Relation

आपल्याला जर CGPA आणि श्रेणी यातील संबंध समजून घ्यायचे असतील तर आज हे नक्की वाचा.
How to Determine Grades in CGPA?

तुमच्या श्रेणी या CGPA वर देखील अवलंबून असतात आणि टक्केवारी वर देखील. त्यामुळे नक्की CGPA आणि ग्रेडस यातील संबंध आज आपण बघुयात. त्यासाठी खालील चार्ट वरून तुम्हाला हे सर्व लगेच समजून जाईल.

  •  O आणि A+ : Outstanding – 90 ते 100%
  •  A: First Class – 70 ते 89%
  •  B: Second Class – 50 ते 69%
  •  Pass : 40 ते 49%
  •  F : Clear Fail – 39% च्या खाली

CGPA कसा काढला जातो? – How to Calculate CGPA?

CGPA हा सर्वात आधी प्रत्येक विषयाचा काढला जातो. त्यानुसार त्या विद्यार्थ्याला 10 पैकी काहीतरी अंक दिले जातात. प्रत्येक विषयाचा CGPA काढून मग पूर्ण वर्षाचा किंवा सत्राचा CGPA काढला जातो. CGPA हा तुमच्या मार्कांवरून काढलेला असल्याने पूर्ण CGPA साठी तुम्हाला वर सांगितलेल्या O क्लास मध्ये बसावे लागेल.

आपल्याकडे असलेल्या 5 विषयांच्या CGPA वरून एकूण सत्राचा CGPA कसा काढावा हे आपण जाणून घेऊयात. आपण ग्राह्य धरूयात की आपल्याकडे खालील माहिती उपलब्ध आहे. यामध्ये मराठी विषयाला 8.5 गुण, इंग्रजी विषयाला 8 गुण, हिंदी विषयाला 8.5 गुण, गणिताला 9 आणि विज्ञानाला 8 गुण आहेत.

आता आपल्याकडे असलेल्या सर्व विषयांच्या गुणांची किंवा अंकांची आपण बेरीज करून घेऊयात. ही एकूण बेरीज 42 इतकी होते.
8.5 + 8 + 8.5 + 9 + 8 = 42

CGPA काढण्यासाठी आता आपल्याकडे असलेली बेरीज आणि आपल्याकडे असलेल्या विषयांची संख्या गरजेची आहे.

CGPA = सर्व विषयांच्या अंकांची बेरीज / एकूण विषय CGPA = 42 / 5 = 8.4
तर शेवटी आलेल्या उत्तरानुसार त्या विद्यार्थ्यांच्या या सत्रातील मार्कशीट वर CGPA हा 8.4 इतका असेल.

CGPA ला टक्केवारी मध्ये कसे काढतात? – How to Convert CGPA to Percentage?

अनेकदा आपल्याला काही ठिकाणी फॉर्म भरत असताना टक्केवारी टाकायला सांगितलेली असतें मात्र आपल्या निकालावर तर टक्केवारी कुठेही नसून फक्त CGPA दिलेला असतो. अशावेळी CGPA वरून टक्केवारी कशी काढतात? हा प्रश्न अनेकांना पडतो.

आज आपण याविषयीच अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला CGPA माहिती असेल तर त्याला 9.5 ने गुणल्यास जी संख्या मिळते ते आपली टक्केवारी असते. म्हणजे CGPA जर वरील उदाहरणाप्रमाणे 8.4 असेल तर त्याची टक्केवारी ही,
8.4 × 9.5 = 79.8% इतकी असेल.

FAQ

CGPA म्हणजे काय?

CGPA म्हणजे Cumulative Grade Point Average होय. CGPA ही पद्धती आता जवळपास सर्व शैक्षणिक क्षेत्रात वापरली जात असून विद्यार्थ्यांचा 1 वर्षाचा किंवा कोर्सचा पूर्ण परफॉर्मन्स या CGPA मधून कळत असतो. टक्केवारी मध्ये असलेली स्पर्धा कमी करून ज्ञान अर्जन करण्यासाठी ही ग्रेड पॉईंट सिस्टम आणण्यात आली आहे.

CGPA आणि GPA हे दोन्ही सारखे आहेत का?

GPA आणि CGPA मध्ये जास्त काही फरक नाही. GPA हा आपण वर्षासाठी किंवा सत्रासाठी करतात मात्र आपण त्याला देखील CGPA म्हणूनच ओळखत असतो. तर CGPA या पूर्ण कोर्सचा शेवट असलेला रिझल्ट असतो. मात्र भारतात GPA म्हणजेच ग्रेड पॉईंट एव्हरेज आणि CGPA हे CGPA या एकाच नावाने वापरले जातात.
GPA काढण्याची पद्धती ही CGPA काढण्याच्या पद्धतीप्रमाणे अगदी तंतोतंत तशीच आहे. CGPA कसा काढतात याविषयी अधिक माहिती लेखात दिलेली आहे.

CGPA कसा काढला जातो?

अनकेदा आपल्याला आपला CGPA कसा काढला जातो याविषयी जाणून घ्यायचे असते. आपल्या निकालावर असणारा CGPA हा आपल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक लेखाजोखा असतो. आपल्या सर्व विषयातील गुणांना किंवा अंकाना 10 पैकी ग्रेड पॉईंट्स मध्ये काढून घेऊन नंतर त्यांची सर्वांची बेरीज केली जाते.
केलेल्या बेरजेला विषयांच्या संख्येने भागले जाते. येणारे उत्तर हा तुमचा CGPA असतो. नावाप्रमाणे हे एक सरासरी अंक असतात.
CGPA = एकूण सर्व विषयांचे अंक / एकूण विषय

CGPA वरून टक्केवारी कशी काढतात?

CGPA वरून टक्केवारी काढण्यासाठी भारतात 9.5 हा अंक तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला मिळालेल्या CGPA ला 9.5 ने गुणले असता येणारे उत्तर हे तुमची टक्केवारी सांगत असते. त्यामुळे CGPA जर 9.5 असेल तर टक्केवारी ही 90.25 % इतकी असेल. 10 CGPA असला तरी देखील टक्केवारी ही 95% इतकीच असेल.

Leave a Comment