OK Full Form In Marathi आपल्याकडे सर्रासपणे OK हा शब्द साहजिकपणे वापरला जातो. प्रत्येक वेळी ठीक आहे म्हणत असताना आपण OK चा वापर करत असतो. मात्र OK हा एका शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहव हे तरी आपल्याला माहिती आहे का? आज आपण OK म्हणजे काय, OK चा फुल फॉर्म काय आहे, OK शब्दाचा इतिहास काय आहे, OK चा वापर सर्वात आधी कोणी केला, OK शब्दाचे इतर फुल फॉर्म याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
OK फुल फॉर्म OK Full Form In Marathi
OK Full Form in Marathi – OK Long Form in Marathi
आपण मराठी मध्ये देखील आता इंग्रजी भाषेतील अनेक शब्द सहजच बोलून जात असतो. त्यापैकी एक शब्द म्हणजे OK! आपल्याला प्रत्येक गोष्टीला मान्यता द्यायची असेल किंवा ठीक आहे असे बोलायचे असेल तर आपण नक्की OK हा शब्द वापरत असतो.
OK शब्दाचा इंग्रजी Full Form हा All Correct असा आहे. अनेकदा आपल्याला शाळांमधून किंवा आपल्या जगविख्यात व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी मधून OK चा फुल फॉर्म हा Okay असा ऐकायला मिळतो. मात्र ते योग्य कसे नाही हे आपण OK च्या इतिहासावरून समजून घेणार आहोतच. OK शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा सर्व काही बरोबर आहे असा होतो.
OK म्हणजे काय? What is OK in Marathi?
OK म्हणजे ALL CORRECT होय. आपण शक्यतो फुल फॉर्म हा कसा आहे असे म्हणतो तेव्हा O वरून काहीतरी शब्द आणि K वरून काहीतरी शब्द असा समज असतो. मात्र इथे तसे नाही. जेव्हा सर्व काही योग्य असेल किंवा सर्व काही ठीक असेल तेव्हा OK हा शब्द वापरला जातो.
OK हा शब्द इंग्रजी भाषेने देखील मान्य केलेला आहे त्यामुळे याचा वापर सर्रासपणे संपूर्ण इंग्रजी भाषेमध्ये केला जातो. Ok शब्दाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.
एक अचंबित करणारी गोष्ट सांगायची म्हणले तर OK हा शब्द जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये येतो. हा फॅक्ट BBC च्या एका रिपोर्ट अनुसार सांगत आहोत. Hello हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा शब्द आहे आणि त्यानंतर OK शब्दाचा क्रमांक लागतो.
OK खरच शब्द आहे का? – Is OK English Word?
OK हा शब्द नाहीये मात्र हे अनेक शब्दांचे संक्षिप्त रूप नक्कीच आहे. त्यामुळे आज इंग्रजी भाषेत OK शब्दाला मान्यता आहे. मात्र आता त्या शब्दाचा त्या वाक्यात काय अर्थ असेल हे आपण आपले निवडावे लागते.
आता आपल्याला हा OK शब्द नक्की ALL CORRECT किंवा कोणत्या इतर शब्दांवरून आला कसा याविषयी उत्सुकता लागलेली असेल.
OK शब्दाचा इतिहास – History of OK
TV9 या मराठी वृत्तवाहिणीच्या एका वृत्तानुसार Ok शब्दाला 180 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. म्हणजे 1840 च्या सुमारास हा शब्द पहिल्यांदा वापरात आला असावा. हा इतिहास आपण all correct शब्दावरून ok कसा आला याचा बघतो आहे.
त्या काळात all correct या शब्दावरून ok हा शॉर्ट फॉर्म झाला असावा असा अंदाज बांधला जातो. तेव्हा देखील अनेक गोष्टी शॉर्ट फॉर्म मध्ये बोलण्यासाठी वापरल्या जात असे. शब्दाची उत्पत्ती ही चुकीच्या उच्चारातून होते हे काही वेगळे सांगायला नकोच.
याशिवाय ok शब्दाचे इतर फुल फॉर्म आणि त्यांना जास्त काही इतिहास नाही. ते सर्व फुल फॉर्म हे कधी भाषेत येऊन गेले हे कळले नाही.
इथे देखील OK शब्दाच्या इतिहासाची एक वेगळीच कहाणी आहे. अमेरिकेत असलेल्या बोस्टन या शहरात महापालिकेने एक कायदा लागू केला होता. त्या कायद्याच्या विरोधात काही व्यक्ती गेले. तेव्हा त्या OK शब्दाची उत्पत्ती झाली असावी.
OK शब्द हा कदाचित स्कॉटिश शब्द och aye म्हणजेच oh yes वरून आलेला असावा असा अंदाज बांधला जातो. ग्रीक भाषेतून अनेक शब्द आपल्याकडे शॉर्ट फॉर्म होऊन आलेले आहेत त्यामुळे ग्रीक भाषेतून ok शब्द आला असल्याचे आपल्याला नाकारता येत नाही. ग्रीक भाषेत ola kala म्हणजेच all good होय. कदाचित यावरून OK शब्दाची उत्पत्ती झाली असावी.
OK शब्दाचा सर्वात पहिला वापर – First Written use of OK
एलन वॉलकर रीड यांचे या OK शब्दाच्या उत्पत्ती बाबतीत संशोधन फार मोलाचे आहे. त्यांना केलेल्या संशोधनामध्ये 23 मार्च 1839 रोजी बोस्टन मॉर्निंग पोस्ट मध्ये OK शब्दाचा वापर आढळला होता. या पोस्टचे लेखक हे चार्ल्स गार्डन ग्रीन हे होते.
तद्नंतर OK शब्दावर संशोधन आणि व्यंगात्मक पुस्तक देखील आले. त्या पुस्तकाचे नाव म्हणजे OK: द इंप्रोबेबल स्टोरी ऑफ अमेरिका ग्रेटेस्ट वर्ड होय. एलन मेंटकाल्फ या विद्वान लेखकांच्या लेखणीतून हे पुस्तक बाहेर आले होते.
OK शब्दाचे सर्व फुल फॉर्म
- All Correct
- All Clear
- Okay
- Objection Killed
- Objection Knocked
- All Correct
OK शब्द आणि इतर भाषा
Ok हा शब्द तेव्हा पासून अस्तित्वात आहे जेवहा आपण GN SD TC हे शब्द वापरत नव्हतो. त्यामुळे या शब्दाचा वापर पुढे इतका जास्त प्रमाणात झाला की आज अनेक भाषांमध्ये OK शब्दाचा साधर्म्य असणारे शब्द साहजिक वापरले जातात.
- आफ्रिका – oukei
- अरेबिक – ukey किंवा okey
- चायनीज – Oukei
- फ्रेंच – Okey
- जर्मन – Okey
- हिब्रू – Okey
- हिंदी – ओके
- जापनीज – oke
- कोरियन – oke
- लॅटिन – okej
- युक्रेनियन – Okej
FAQ
OK शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?
Ok शब्दाचा जगमान्य फुल फॉर्म हा All Correct असा आहे. मात्र यासंदर्भात आजही अनेक मतभिन्नता आहेत.
OK शब्दाची उत्पत्ती करणारा ग्रीक शब्द कोणता आहे?
Ola Kala म्हणजेच All Good हा ग्रीक शब्द OK शब्दाची उत्पत्ती होण्याचे कारण असावे.
OK शब्दाचा संदर्भ देणारा स्कॉटिश शब्द कोणता?
Och aye म्हणजेच इंग्रजीमध्ये oh yes हा स्कॉटिश शब्द कदाचित OK शब्दाच्या उत्पत्तीचे कारण असावा.