MHADA Full Form In Marathi : MHADA ची घरे, MHADA ची लॉटरी याविषयी अनेकदा आपल्या कानावर आले असेल मात्र त्याविषयी म्हाडा सोडत बद्दल जास्त काही माहिती नसते. आज आपण MHADA म्हणजे काय, MHADA चा फुल फॉर्म काय आहे, MHADA चा इतिहास, MHADA लॉटरी साठी पात्रता निकष, MHADA गृह लॉटरी साठी आवश्यक कागदपत्रे, MHADA लॉटरीमधील घरांच्या किंमती याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
MHADA फुल फॉर्म MHADA Full Form In Marathi
MHADA Full Form in Marathi । MHADA Long Form in Marathi
MHADA मधून आपल्याला घर मिळते ते ही लॉटरीच्या स्वरूपात! याखेरीज देखील म्हाडा विषयी आज माहिती जाणून घेण्याची वेळ आली आहे. MHADA शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Maharashtra Housing and Area Development Authority (महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट औथोरिटी) असा आहे. MHADA शब्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण असा आहे.
MHADA म्हणजे काय? – What is MHADA?
MHADA म्हणजेच म्हाडा – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण होय. महाराष्ट्र शासनाची ही योजना महाराष्ट्र राज्यात रहिवासी असलेल्या सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देते. म्हाडा ची ही घर देण्याची प्रक्रिया लॉटरी पद्धतीने सुरू असते.
म्हाडा कडून योजनेतील घरांसाठी अर्ज मागविले जातात. या अर्जामध्ये त्या अर्जदाराचे उत्पन्न दाखविलेले असते. त्यानुसार त्याला काढलेल्या योजनेत एकूण किती घरे आहेत आणि त्याला दिलेल्या घराची किती किंमत लावायची हे ठरत असते.
2022 मध्ये म्हाडाच्या मुंबई लॉटरी मध्ये म्हाडाची एकूण 1300 घरे आहेत. त्या घरांची किंमत ही 14.6 लाख रुपये ते 5.8 कोटी रुपये इतकी आहे. त्याचे सविस्तर वाटप आणि माहिती म्हाडाच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. मात्र ही वाटप पूर्णपणे सोडत स्वरूपात होत असते. त्यामुळे कोणाला घर मिळेल याविषयी काही माहिती सांगता येत नाही.
MHADA चा इतिहास – History of MHADA
मुंबई मध्ये असलेल्या घरांच्या समस्येला तोडगा शोधण्यासाठी त्याकाळी म्हणजे 1948 मध्ये गुलजारीलाल नंदा यांनी गृहनिर्माण खात्याकडून एक गृहनिर्माण विधेयक मंजूर केले. यामधून बॉम्बे हाऊसिंग बोर्ड म्हणजेच आत्ताचे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ अस्तित्वात आले.
कमीत कमी दरात लोकांना घरे मिळवून देणे हेच म्हाडा चे उद्दिष्ट्ये असते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम राबविला जात होता. याला अपवाद हा फक्त विदर्भ होता.
MHADA अंतर्गत पार पडलेला पहिला गृहनिर्माण प्रकल्प म्हणजे 1948 साली बांधण्यात आलेली वरळी भागातील आंबेडकर नगर होय. हा सर्वात पहिला गृहनिर्माण प्रकल्प होता. त्यानंतर म्हाडा ने 1963 मध्ये विक्रोळी मधील टागोर नगरचा म्हाडा प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वात मोठा गृहनिर्माण प्रकल्प बनला.
MHADA ACT 1976
म्हाडाच्या इतिहासात त्याची सुरुवात होण्यासाठी हाच म्हाडा ऍक्ट 1976 कारणीभूत ठरला. 5 डिसेंबर 1977 रोजी MHADA ही संस्था अस्तित्वात आली. आधी सांगितल्याप्रमाणे 1948 ते 1977 पर्यंत म्हाडा ही बॉम्बे हाऊसिंग बोर्ड म्हणूनच कार्यरत होती. आज म्हाडा त्यांचे संपूर्ण कार्य हे म्हाडा ऍक्ट 1976 आणि म्हाडा पुनर्रचना 1992 अनुसार करते.
MHADA गृह लॉटरी साठी पात्रता निकष – MHADA Lottery Eligibility Criteria
म्हाडा लॉटरीसाठी अर्जदार पात्र आहे की नाही हे ठरविणारे काही पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत,
- अर्जदार हा 18 वर्ष पेक्षा जास्त वयाचा असावा.
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला असावा.
- अर्जदारकडे पॅन कार्ड असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार हा सरकारी किंवा खाजगी ठिकाणी नोकरी करत असावा. त्यासाठी त्याच्याकडे एक सॅलरी खाते बँकेत असावे.
- तुमचे मासिक उत्पन्न जसे असेल त्यानुसारच तुम्हाला घरासाठी अर्ज करता येतो. त्यामध्ये फ्लॅटचे स्वरूप आणि तुमचे मासिक उत्पन्न यासंदर्भात खालील माहिती वाचून घ्यावी.
- मासिक उत्पन्न : 25 हजार ते 50 हजार – LIG फ्लॅटसाठी पात्र
- मासिक उत्पन्न : 50 हजार ते 75 हजार – MIG फ्लॅटसाठी पात्र
- मासिक उत्पन्न : 75 हजार पेक्षा जास्त – HIG फ्लॅटसाठी अर्ज
MHADA अर्ज प्रक्रिया – Application for MHADA
MHADA फक्त मुंबई नव्हे तर कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , नागपूर आणि अमरावती इथे देखील कार्यरत आहे. MHADA साठी अर्ज करण्याच्या स्टेप्स-
- https://lottery.mhada.gov.in या म्हाडा च्या ऑफिशियल संकेतस्थळावर जावे.
- संकेतस्थळावर तुम्हाला म्हाडा च्या चालू असलेल्या लॉटरी विषयी माहिती मिळेल.
- समोर आलेल्या शहरांपैकी तुमच्या शहराचे नाव निवडून पुढे जा.
- वरच्या बाजूला मेन्यू मध्ये असलेल्या रजिस्टर बटन वर क्लिक करून रजिस्टर करा. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरा.
- एकदा रजिस्टर केले की पुढील टॅब मध्ये तुम्हाला लॉटरी स्कीम आणि तुमच्या उत्पन्नानुसार फ्लॅटचा प्रकार निवडायचा आहे.
- एकदा हे दोन्ही झाले की अर्जाची पावती प्रिंट करून घ्यावी.
- अर्ज पूर्ण करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन पेमेंट पर्यायाचा वापर करून अर्ज रक्कम भरावी लागेल.
- आता तुमचा अर्ज सबमिट झालेला असेल.
याच संकेतस्थळावर जाऊन लॉटरी रिझल्ट विभागात तुम्हाला लागलेल्या सोडतींचे निकाल बघायला मिळतील.
MHADA साठी आवश्यक कागदपत्रे – Documents Required for MHADA
MHADA मध्ये आपल्याला अर्ज करत असताना काही कागदपत्रे आवश्यक असतात. त्यांची यादी खालीलप्रमाणे,
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला (महाराष्ट्र राज्य)
- पासपोर्ट (असेल तर)
- मतदान कार्ड
- जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
- ड्रायव्हिंग लायसन्स
FAQ
MHADA ची स्थापना कधी झाली?
5 डिसेंबर 1977 रोजी MHADA म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मंडळाची स्थापना झाली.
MHADA चे मुख्यालय कोठे आहे?
MHADA चे मुख्यालय हे वांद्रे पूर्व येथे स्थित आहे.
MHADA मधून कोणते 3 प्रकारचे फ्लॅट दिले जातात?
MHADA योजनेतून LIG, MIG आणि HIG प्रकारचे फ्लॅट्स अर्जदारांसाठी त्यांच्या उत्पन्नाच्या अनुसार दिले जातात.
EWS साठी MHADA योजनेत राखीव फ्लॅट असतात का?
हो, EWS कॅटेगरी साठी देखील MHADA च्या लॉटरी गृहनिर्माण योजनेत फ्लॅट्स असतात. 2022 मुंबई म्हाडा लॉटरी मध्ये EWS साठी 63 फ्लॅट्स राखीव होते.