UAE फुल फॉर्म UAE Full Form In Marathi

UAE Full Form In Marathi : UAE हा शब्द अनेकदा आपल्याला देशांच्या यादीमध्ये बघायला मिळत असतो मात्र याविषयी जास्त सविस्तर माहिती फार कमी लोकांना असते. UAE हा काही देशांचा समूह आहे. आज आपण UAE म्हणजे काय, UAE चा फुल फॉर्म काय आहे, UAE ची राजधानी कोणती आहे, UAE मध्ये कोणते चलन वापरतात, UAE चा इतिहास आणि UAE विषयी काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत.

UAE Full Form In Marathi

UAE फुल फॉर्म UAE Full Form In Marathi

UAE Full Form in Marathi । UAE Long Form in Marathi

UAE हा एक फेडरल देश आहे. म्हणजे यामध्ये 7 अमिराती सयुंक्तपणे एकत्र आलेल्या आहेत. UAE शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा United Arab Emirates (युनायटेड अरब इमिरेट्स) असा आहे. UAE शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा संयुक्त अरब अमिरात असा आहे.

UAE म्हणजे काय? – What is UAE?

UAE म्हणजे सयुंक्त अरब अमिरात होय. आता हे संयुक्त अरब अमिरात प्रकरण USA प्रमाणेच आहे. अबू धाबी, दुबई, शारजा, अजमान, उम्म अल क्वेन, फुजैरा आणि रस अल खैमाह या 7 अमिराती एकत्र येऊन त्यांचे जे फेडरेशन बनले आहे त्याला संयुक्त अरब अमिरात म्हणून ओळखतात.

UAE हा देश भारताच्या दृष्टीने अधिक प्रगत आहे. इथल्या चलनाला भारतीय चलनाच्या तुलनेत जवळपास 20% जास्त महत्व आहे. त्यामुळे भारतातून अनेक लोक UAE मध्ये नोकरीसाठी जातात. भरपूर प्रमाणात तिथे त्यांना पैसा देखील मिळतो.

सध्याच्या घडीला UAE मध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. एक फेडरेशन बनविले गेले आणि त्यामुळे या देशाचा विकास देखील झपाट्याने झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात UAE चे महत्व हळूहळू वाढतच जात आहे.

UAE मधील मुख्य अमिराती / शहरे – Important Cities from UAE

UAE मध्ये वर सांगितल्याप्रमाणे मुख्य 7 शहरे आहेत. त्यांना अमिराती म्हणून ओळखले जाते.

  1. अबू धाबी (Abu Dhabi)
  2. दुबई (Dubai)
  3. उम्म अल-क्वेन (Umm Al-Quwain)
  4. अजमान (Ajman)
  5. शारजा (Sharjah)
  6. फुजैरा (Fujairah)
  7. रस अल-खैमाह (Ras al-Khaimah)

अमिरात म्हणजे काय? – What is Emirates?

अमिरात शब्दाचा शब्दशः अर्थ हा रियासत असा होतो. रियासत म्हणजे राजेशाही पद्धतीने चालत आलेला वारसा होय. अमिरात हा अमिराती देशांचा एक समूह असतो. अमिराती म्हणजे असे देश ज्यामध्ये राजेशाही व्यवस्था चालते आणि इथे भरपूर श्रीमंती देखील असते. अशा श्रीमंत देशातील श्रीमंत व्यक्तींना शेख म्हणून ओळखतात.

मात्र UAE सारख्या देशात स्थानिक लोक आत खूप कमी झालेले आहेत. भारतीय नागरिकांचा आकडा या देशात वाढत आहे. अनेक भारतीय नागरिक तसेच इतरही अनेक देशांमधून लोक UAE मध्ये स्थित होत आहेत. कारण UAE मध्ये सर्व पायाभूत सुविधा तर आहेच मात्र याशिवाय रोजगार आणि चलन फुगवटा देखील आहे.

UAE ची राजधानी – Capital of UAE

UAE मधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणजे अबू धाबी होय. अबू धाबी हे शहर UAE देशाची राजधानी आहे. अबू धाबी शहर जर नकाशावर बघितले तर ते आपल्याला आखातात बघायला मिळते. UAE ला लागूनच इराणचे आखात आहे आणि त्या आखातात अबू धाबी हे शहर वसलेले आहे.

UAE देशाची सर्व मुख्य कार्यालये या अबू धाबी शहरात आहेत. अबू धाबी शहराची दरडोई उत्पन्न पातळी झपाट्याने वाढत आहे आणि यामध्ये होत असलेले बदल इतर लोकांना आकर्षित करत आहेत.

या शहराचे उत्पन्न इतके जास्त आहे की संपूर्ण UAE च्या उत्पन्नाचा 57% पर्यंत वाटा हा एकट्या अबू धाबी मधून येतो. आधी सांगितल्या प्रमाणे राजघराणे आणि राजेशाही ही अबू धाबी मध्ये जास्त आहे. सर्व राजघराण्यातील वारस अबू धाबी शहरात राहतात.

UAE चा इतिहास – History of UAE

UAE हा देश देखील भारताप्रमाणे पारतंत्र्यात होता. जवळपास 1873 ते 1947 पर्यंत UAE वर ब्रिटिश इंडिया कंपनीचे अधिपत्य होते. भारत 1947 साली स्वतंत्र झाला. मात्र त्यानंतर सुद्धा UAE स्वतंत्र झाला नव्हता त्यांच्यावर लंडन येथून परराष्ट्र मंत्रालयाद्वारे लक्ष दिले जात होते.

मात्र त्यानंतर आखाती देश किंवा शहरे अबू धाबी, उम्म अल- क्वेन, अजमान, शारजा, फुजैरा या सहा अमिरतींनी मिळून 1971 मध्ये एक संयुक्त राष्ट्र निर्माण करण्यास प्रयत्न केला. त्यालाच आज आपण UAE म्हणजेच युनायटेड अरब इमिरेट्स म्हणून ओळखतो.

पुढे 1972 मध्ये यामध्ये रस अल- खैमाह या अमिराती चा देखील समावेश करण्यात आला. UAE हा जगातील 6 व्या क्रमांकाचा तेल उत्पादन करणारा देश आहे. UAE चा विकास देखील खूप वेगाने होत आहे त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था देखील तितकी मजबूत बनत चालली आहे.

UAE मधील चलन – Currency of UAE

UAE मध्ये दिरहम (DIRHAM) हे चलन वापरले जाते. सध्याच्या स्थितीत 1 दिरहम ची किंमत ही 21 रुपयांच्या वर आहे. रुपयांचा तुलनेत दिरहम ची किंमत ही 21 पट जास्त आहे. त्यामुळे या देशाचे दरडोई उत्पन्न देखील जास्त आहे.

दुबई सारखे शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने खूप जास्त महत्वाचे बनले आहे. अनेक लोक देश विदेशातून इथे पर्यटनासाठी येतात. शारजा आणि दुबई इथे क्रिकेट स्टेडियम देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे आयपीएल सारखे इव्हेंट इथे झाले आणि UAE ची अधिक आर्थिक ताकद वाढली.

UAE ची राष्ट्रभाषा आणि धर्म – National Language and Religion of UAE

UAE या देशामध्ये अरबी भाषा बोलली जाते आणि याच भाषेला तिथे राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त आहे. UAE देशात राष्ट्रीय धर्म म्हणून इस्लाम धर्माला मान्यता आहे.

FAQ

UAE देशामध्ये कोणती भाषा ही राष्ट्रभाषा आहे?

UAE देशात अरबी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त आहे.

UAE म्हणजे काय?

UAE म्हणजे युनायटेड अरब इमिरेट्स होय. यालाच मराठी भाषेत संयुक्त अरब अमिरात म्हणून ओळखतात.

UAE मध्ये कोणत्या अमिराती किंवा शहरांचा समावेश होतो?

UAE या राष्ट्रात एकूण 7 अमिराती किंवा शहरांचा समावेश होतो. यामध्ये अबू धाबी, उम्म अल- क्वेन, अजमान, शारजा, फुजैरा आणि रस अल-खैमाह यांचा देखील समावेश होतो.

UAE राष्ट्राचे चलन कोणते आहे?

दिरहम (DIRHAM) हे UAE चे चलन आहे.

Leave a Comment