MBOCWW फुल फॉर्म MBOCWW Full Form In Marathi

MBOCWW Full Form In Marathi महाराष्ट्रात कार्यरत असलेली एक बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी आरोग्यासाठी आणि कल्याणकारी सुविधा देण्यासाठी संस्था म्हणजे MBOCWW होय. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण MBOCWW म्हणजे काय, MBOCWW चा फुल फॉर्म काय आहे, MBOCWW ची मंडळ रचना, MBOCWW ची उद्दिष्टे, MBOCWW चे संपर्क क्रमांक आणि इतरही महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

MBOCWW Full Form In Marathi

MBOCWW फुल फॉर्म MBOCWW Full Form In Marathi

MBOCWW Full Form in Marathi । MBOCWW Long Form in Marathi

 MBOCWW शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (महाराष्ट्र बिल्डिंग अँड ओदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेल्फेअर बोर्ड) असा होतो. MBOCWW शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ असा होतो.

MBOCWW म्हणजे काय? – What is MBOCWW in Marathi?

फक्त महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या हितासाठी MBOCWW प्रमाणे एक मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. MBOCWW म्हणजे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ होय.

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा एक कायदा आहे आणि त्यानुसार प्रत्येक राज्यात 3 पक्षांचा समावेश असेल असे एक मंडळ स्थापित करणे अनिवार्य आहे. कलम 18(1) अनुसार या मंडळाची स्थापना केली जाते.

MBOCWW या मंडळाच्या मार्फत इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना सुविधा देण्याचे कार्य केले जाते. यामध्ये सरकारी योजना सुरुवात करणे, सरकारी योजनांसाठी पाठपुरावा करणे आणि त्या योजना प्रत्येक कामगारांना पोहोचविण्याचे कार्य MBOCWW करत असते.

MBOCWW इतिहास – History of MBOCWW in Marathi

संपूर्ण देशात इमारत आणि इतर बांधकाम कामगार हे असंघटित घटक आहेत. भारत सरकारने इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996 मध्ये रोजगार व सेवाशर्ती नियमन अंतर्गत अशा इमारत आणि इतर बांधकाम कामगार यांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण यासाठी योजना बनविण्याची शिफारस केलेली आहे.

पुढे याच कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 2007 हा रोजगार व सेवा शर्ती नियमन अंतर्गत पारित झाला. त्यानुसार MBOCWW ची स्थापना करण्यात आली. या मंडळावर 5 शासन प्रतिनिधी सुरुवातीला नेमण्यात देखील आले.

कलम 35 (1) अनुसार आता MBOCWW च्या सदस्यांमध्ये शासन, मालक आणि कामगार यांचे प्रत्येकी 3 प्रतिनिधी असतात. यापैकी एक अध्यक्ष देखील असतो. या सर्वांचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा असतो. MBOCWW मध्ये अधिनियम 2011, 2015 व 2018 अनुसार मंडळाची पुनर्रर्रचना करण्यात आली आहे.

MBOCWW ची रचना – Structure of MBOCWW

MBOCWA चे मंडळ हे ऐकून 11 सदस्यांचे मिळून बनलेले असते. यामध्ये मुख्य स्थानी अध्यक्ष असतात. 3 शासकीय प्रतिनिधी हे प्रत्येकी प्रधान सचिव (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय मुंबई), कामगार आयुक्त (महाराष्ट्र शासन, मुंबई) आणि उप सचिव (कामगार 7, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई) एक असतो. आणखी 3 सदस्य हे मालक प्रतिनिधी असतात तर 3 हे बांधकाम कामगार प्रतिनिधी असतात. मालक कामगार प्रतिनिधी पैकी एक व्यक्ती हा अजून जोडलेला असतो, तो शक्यतो सचिव किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

MBOCWW ची कार्ये – Functions of MBOCWW

 • एखादी अपघाती दुर्घटना झाली तर त्या कामगारांना किंवा दुर्घटना ग्रस्त व्यक्तींना मदत तात्काळ पुरविणे.
 • बांधकाम कामगार 60 वर्षांच्या पुढे गेला असेल तर त्याला निवृत्तीवेतन देणे.
 • कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे.
 • आजारपण आल्यास त्यामध्ये आर्थिक मदत करणे.
 • महिला कामगारांना मातृत्व लाभ पुरविणे.
 • कामगारांच्या कल्याणासाठी योजना आखणे, सादर करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे.

MBOCWW ची उद्दिष्टे – Missions of MBOCWW

 • कामगारांसाठी सुलभ अशी नोंदणी प्रक्रिया ठेवणे.
 • प्रत्येक योजना ही बांधकाम कामगारांना पोहोचविणे.
 • नोंदणी प्रक्रियेतून त्यांच्याविषयी माहिती गोळा करणे.
 • लाभ मिळत असतील तर त्यासाठी प्रक्रिया सुलभ बनविणे.
 • लाभ थेट बँक खात्यात जमा करणे.
 • ऑनलाइन नोंदणी होत नसेल तर जिथे काम सुरू असतात तिथे जाऊन त्या कामगारांची नोंदणी करणे.
 • कल्याणकारी योजना राबविणे.

MBOCWW बांधकाम कामगार नोंदणी प्रकिया

MBOCWW बांधकाम कामगार नोंदणी ही त्यांच्या पोर्टलवरून करता येते. त्यासाठी लेखाच्या शेवटी पोर्टलविषयी माहिती दिलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते किंवा अनेकदा बांधकाम होत असलेल्या ठिकाणी MBOCWW अंतर्गत नोंदणी कॅम्प राबविले जातात.

बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी कामगारांचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षे यांच्या दरम्यान असावे. याशिवाय बांधकाम कामगार म्हणून नोंदणी ही तेव्हाच करता येते जेव्हा त्या कामगाराने मागील 12 महिन्यांमध्ये कमीत कमी 90 पेक्षा जास्तच दिवस काम केलेले असावे.

MBOCWW बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रे पुरविणे गरजेचे असते,

वयाचा पुरावा, 90 दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ओळखपत्र पुरावा (आधारकार्ड, पॅन कार्ड, इत्यादी), 3 पासपोर्ट आकाराचे फोटो

MBOCWW संपर्क – MBOCWW Contact Details

संपर्क क्रमांक (दूरध्वनी) – 022 2657 2631

दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री) – 1800 8892 816 (वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत)

ई-मेल आयडी – [email protected]

पत्ता – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,

5 वा मजला, एमएमटीसी हाऊस,

प्लॉट सी – 22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व),

मुंबई – 400051 , महाराष्ट्र

MBOCWW पोर्टल – Portal of MBOCWW

MBOCWW च्या पोर्टलवर आपल्याला बांधकाम कामगारांची नोंदणी, दाव्यांसाठी ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन नोंदणी नूतनीकरण, ऑनलाइन प्रोफाइल लॉगिन आणि उपकर भरणा यासारख्या सेवा मिळतात.

पोर्टल लिंक – mahabocw.in

Leave a Comment