CBI Full Form In Marathi भारतात गुन्हे शाखा ही पूर्णपणे पोलिसांच्या ताब्यात असते मात्र एखादी केस जर अधिक प्रतिष्ठेची किंवा गुंतागुंतीची असेल तर त्यासाठी न्याय व्यवस्थेत इतर काही शाखा बनविल्या गेल्या आहेत, त्यापैकीच एक म्हणजे CBI होय. आज आपण याच CBI संस्थेविषयी माहिती जाणून घेणार आहोत, यामध्ये CBI म्हणजे काय, CBI Full Form in Marathi, CBI अधिकारी कसे होता येते, CBI चा इतिहास, CBI ची कार्ये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सीबीआय फुल फॉर्म CBI Full Form In Marathi
CBI Full Form In Marathi | CBI Long Form in Marathi
भारतातील सर्वात मोठी तपास यंत्रणा म्हणून CBI हे नाव समोर येते. भारतात केंद्र स्तरावरील एक प्रतिष्ठित मात्र सध्याच्या काळात राजकर्त्यांच्या हाताखाली असलेली ही संस्था बदनाम होते आहे.
CBI शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Central Bureau of Investigation (सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) असा होतो. CBI शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच केंद्रीय चौकशी विभाग असा होतो.
CBI म्हणजे काय? What is CBI in Marathi?
CBI म्हणजे केंद्रीय चौकशी विभाग होय. यालाच इंग्रजीमध्ये सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन होय. CBI अंतर्गत भारतातील सर्व मंत्रालयात होणारे व्यवहार आणि गैरव्यवहार यावर नियंत्रण ठेवले जाते. शक्यतो भ्रष्टाचार, लाचलुचपत यासारख्या सरकारी गुन्ह्यांमध्ये लक्ष घालण्याचे काम CBI अंतर्गत केले जाते.
एखादा व्यक्ती जर केंद्रीय कायद्याचे उल्लंघन करत असेल किंवा संघटित राज्यांच्या नियमावलीत असलेल्या नियमांच्या उल्लंघनात समाविष्ट असेल, भारताच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व तपासणी करण्याचे अधिकार CBI कडे असतात.
यामध्ये माहिती अधिकार कायद्याने अधिक भर घालण्यात आलेली आहे. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत CBI आता आर्थिक गुन्हेगारी, भ्रष्टाचार संबंधित प्रकार विषयी चौकशी साठी विशेष मोकळीक देणारे अधिकार स्वतःकडे ठेवते.
CBI चा इतिहास – History of CBI
CBI संस्थेचा इतिहास हा ब्रिटिश कालीन भारताशी संबंधित आहे. 1941 मध्ये ब्रिटिश राजवटीत भारतात युद्ध आणि पुरवठा विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पोलिसांची एक विशेष चौकशी तुकडी नेमण्यात आली होती.
सर्व भ्रष्टाचार हा उत्तरेत सीमेवर होत असल्याने त्यासाठी या तुकडीचे मुख्य कार्यालय देखील सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या लाहोर येथे होते. ही स्थापना स्पेशल पोलीस इस्टेबलिशमेंट ऍक्ट 1941 अनुसार झाली होती.
स्वातंत्र्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 1946 मध्ये हे दल भारतासाठी देखील बनविले गेले. त्यावेळी हे दल ब्रिटिश भारत सरकारच्या गृह खात्या अंतर्गत कार्य करू लागले.
1 एप्रिल 1963 रोजी भारतीय गृह खात्याने स्वातंत्र्य उत्तर काळात या दलाचे नाव बदलून सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सीबीआय ठेवण्यात आले. 1963 साली CBI ची स्थापना झाल्यानंतर धरम नाथ प्रसाद कोहली हे CBI चे पहिले संचालक होते. सध्या सुभोध कुमार जैस्वाल हे 2021 पासून CBI चे संचालक आहेत.
CBI चे विभाग – Departments Under CBI
CBI चे कार्य विभागांमध्ये विभाजले गेले आहे. प्रत्येक विभागाला त्याची वेगवगेळी कामे दिलेली असून हे विभाग CBI या नावावर कार्य करतात.
अँटी करप्शन विभाग –
भ्रष्टाचार आणि लाचलुचपत संबंधित कार्यवाही करण्याचे अधिकार या विभागाला आहेत.
स्पेशल क्राईम विभाग –
समाजात शांतता टिकवून ठेवण्यासाठी हा विभाग समाजातील अपहरण, खून यासारख्या गुन्ह्यांचा तपास करत असतो.
आर्थिक गुन्हे विभाग –
आर्थिक गुन्ह्यांवर कडक कार्यवाही करण्यासाठी भ्रष्टाचार नंतर हा विभाग सर्वाधिक कार्यरत असतो.
याशिवाय अनेक छोटे विभाग CBI कडे आहेत आणि त्यांना त्यांच्या विभागप्रमाणे कार्यभार वाटून दिला गेला आहे.
CBI ची कार्ये – Functions of CBI
- दिल्ली पोलीस इस्टेबलिशमेन्ट ऍक्ट 1946 अनुसार CBI कार्यरत आहे. त्यांना पोलिसांपेक्षा अधिक अधिकार देण्यात आलेले आहेत.
- केंद्र स्तरावरील सर्व प्रमुख गुन्ह्याची तपासणी ही CBI करत असते.
- भारत सरकार आणि न्यायालय CBI ला आदेश देऊ शकते. दिलेल्या आदेशांचे पालन करणे हे त्यांचे कार्य आहे.
- आर्थिक व्यवहारात आयकर नियमांचे उल्लंघन, परकीय चलनाच्या नियमांचे उल्लंघन, केंद्रीय उत्पादन शुल्क नियम उल्लंघन सारख्या गुन्ह्यांवर CBI कारवाई करते. पोलिसांच्या आणि स्थानिक संस्थांच्या निदर्शनात याविषयी बाबी आणून देण्याचे महत्वाचे काम CBI कडे आहे.
- CBI च्या अंतर्गत विविध आयोग स्थापलेले आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांवर चौकशी केली जाते.
- भ्रष्टाचार निवारण अधिनियम 1988 अनुसार भ्रष्टाचार संबंधित सर्व गुन्हे आणि त्यांना बंधन घालण्याचे काम CBI करते.
- भारतातून बाहेरील देशांसोबत होणाऱ्या व्यापारात आणि देवाणघेवाण मध्ये जर भ्रष्टाचार किंवा घोटाळे होत असतील तर त्यावर चौकशी करण्याचे अधिकार CBI कडे असतात.
CBI अधिकारी कसे होतात?
CBI अधिकारी होण्यासाठी आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी SSC CGL ही परीक्षा पात्र होणे आवश्यक आहे. किंवा तुम्हाला UPSC अंतर्गत पहिल्या श्रेणीच्या पोस्ट साठी क्वालिफाय व्हावे लागेल.
त्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे खालील पात्रता निकषांची पूर्तता झालेली हवी.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण झालेलं असावे. पदवी मध्ये तुम्हाला 50% हुन अधिक मार्क असावे.
- बारावी किंवा त्या समतुल्य कोणतेही शिक्षण पूर्ण असावे.
- UPSC ची ग्रेड A पोस्ट असावी किंवा UPSC ची ग्रेड B पोस्ट असेल तर SSC CGL परीक्षा द्यावी.
- कमीत कमी वय 20 वर्षे असावे.
- कॅटेगरी अनुसार वयोमर्यादा बदलते. खुल्या प्रवर्गासाठी हे वय 30 वर्षे, ओबीसी साठी 33 वर्षे तर एससी आणि एसटी साठी हे वय 35 वर्षे आहे.
- महिलांसाठी उंचीची अट कमीत कमी 150 सेमी तर पुरुषांसाठी हीच अट 165 सेमी आहे.
- पुरुषांची छाती फुगवून 76 सेमी कमीत कमी असावी.
FAQ
CBI म्हणजे काय?
CBI ही एक केंद्र स्तरावरील गुन्हेगारी चौकशी यंत्रणा असून तिला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन किंवा केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणून ओळखले जाते.
CBI ची स्थापना केव्हा झाली?
1 एप्रिल 1963 रोजी CBI म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ची स्थापना करण्यात आली.
CBI चे सध्याचे मुख्यालय कोठे आहे?
नवी दिल्ली येथे CBI चे मुख्यालय आहे.
CBI अधिकारी होण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते?
CBI ऑफिसर होण्यासाठी SSC CGL ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते.