पीएमआरडीए फुल फॉर्म PMRDA Full Form In Marathi

PMRDA Full Form In Marathi पुणे महानगराच्या विकासासाठी कार्यरत असलेली एक संस्था म्हणजे PMRDA होय. आज आपण हेच PMRDA काय आहे, PMRDA चा फुल फॉर्म काय आहे, PMRDA चे विभाग, PMRDA विषयी माहिती, PMRDA चे प्रकल्प आणि PMRDA संपर्क करण्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

PMRDA Full Form In Marathi

पीएमआरडीए फुल फॉर्म PMRDA Full Form In Marathi

PMRDA Full Form in Marathi । PMRDA Long Form in Marathi

पुणे सारख्या महानगराच्या आणि पिंपरी चिंचवड सारख्या शहराच्या एकात्मिक विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने PMRDA ची निर्मिती केली गेली आहे. PMRDA चा इंग्रजी भाषेत full form हा Pune Metropolitan Region Development Authority (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट औथोरिटी) असा आहे.
PMRDA चा मराठी भाषेत Full Form हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा आहे.

PMRDA म्हणजे काय? – What is PMRDA in Marathi?

पुणे महानगरपालिका क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी PMRDA ही राज्य सरकारचा कंट्रोल असलेली संस्था स्थापन करण्यात आली. PMRDA ची सर्व नियंत्रण सूत्र ही मुख्यमंत्रि म्हणजेच राज्याकडे असतात. PMRDA म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण होय.

PMRDA च्या अंतर्गत जवळपास 7256.46 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र येते. महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारे एक विकास प्राधिकरण प्रत्येक मोठ्या शहराला दिलेला आहे. त्या महानगर क्षेत्रापैकी पुणे महानगर क्षेत्र हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. PMRDA ज्या क्षेत्रात काम करते त्याची एकूण लोकसंख्या ही 72.76 लाखांच्या वर आहे.

अनेक ठिकाणी आपल्याला असे वाचायला भेटते की PMRDA ही भारतातील पुणे मेट्रो क्षेत्रासाठी (PMR) साठी विकास आणि योजना आखणारी एक संस्था आहे. पुण्यातील मेट्रो हा PMRDA चा महत्वाचा प्रकल्प आहे त्यामुळे कदाचित PMRDA ला PMR सोबत संबंधीत दाखविले जात असेल.

PMC आणि PMRDA मध्ये फरक काय आहे?

PMC म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन होय. यालाच आपण पुणे महानगरपालिका म्हणून ओळखतो. तर PMRDA म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण होय.

PMC ही फक्त पुणे शहराच्या विकासासाठी कार्यरत महानगरपालिका आहे आणि PCMC ही पिंपरी चिंचवड शहरासाठी असलेली महानगर पालिका आहे. म्हणजे या दोन्हीचे स्वरूप हे महानगरपालिका इतके आहे. मात्र PMRDA ही एक विकास प्राधिकरण संस्था असून यावर महाराष्ट्र राज्य सरकारचे नियंत्रण आहे.

PMC आणि PCMC हे फक्त स्वतःच्या शहराच्या हद्दीत काम करतात मात्र PMRDA ही संस्था जवळपास संपूर्ण पुणे जिल्ह्यात म्हणजे पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहर मध्ये काम करते.

PMRDA क्षेत्र आणि सविस्तर माहिती

PMRDA अंतर्गत एकूण 2 महानगरपालिका, 3 छावणी बोर्ड, 7 नगरपरिषदा, 842 गावे आणि 13 शहरे आहेत. यामध्ये पुणे शहर, मावळ, मुळशी, हवेली तहसील, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे तालुक्याचे काही भाग पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात समाविष्ट आहेत. PMRDA ही स्वायत्त आणि सामुदायिक संस्था आहे.

PMRDA ची स्थापना ही 31 मार्च 2015 रोजी करण्यात आली आहे. PMRDA चे कामकाज हे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालते. PMRDA चे मुख्यालय हे पुण्यातील औंध येथे आहे. एक PMRDA कार्यालय पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी मध्ये देखील आहे.

PMRDA चे महानगर आयुक्त हे डॉ सुहास दिवसे हे आहेत. सुहास हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. PMRDA हे पुणे महानगर क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक वाढविणे हे आहे. त्यांच्या संकेतस्थळावर “आंतरराष्ट्रीय प्राधान्याचे गुंतवणूक केंद्र” म्हणून पुणे महानगर क्षेत्राचा विकास करणे हे ध्येय आहे.

PMRDA चे विभाग – Departments of PMRDA

PMRDA चे कार्य वेगवेगळ्या विभागांच्या अंतर्गत सुरू आहे. प्रत्येक विभागाला वेगळे वेगळे कार्यभार वाटून दिलेले आहेत.

  •  लेखा आणि वित्त
  •  अभियांत्रिकी – 1 आणि 2
  •  जमीन व मालमत्ता
  •  नियोजन
  •  विकास परवानगी
  •  अनधिकृत बांधकाम (निर्मूलन)
  •  अग्निशमन
  •  उत्तमता केंद्र
  • खासगी आणि परकीय गुंतवणूक
  •  एडमिनिस्ट्रेशन

PMRDA चे विविध प्रकल्प – Projects of PMRDA

PMRDA अंतर्गत संपूर्ण पुणे जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मेट्रो सारखे प्रकल्प अधिक वेगाने आणि मुख्यत्वे सुरू आहेत.

  •  हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो
  •  पुणे रिंग रोड
  • म्हाळुंगे माण उपनगर (टिपी) योजना
  •  इंद्रायणी तटाग्र
  •  येरवडा इमारत
  •  वाघोली अग्निशमन केंद्र
  •  छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ
  •  पुणे मुंबई हायपरलूप
  •  वाघोली पाणी पुरवठा योजनेचे आवर्धन
  •  पुणे महानगर प्रदेशामध्ये पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, पावसाच्या अतिरिक्त पाण्यासाठी मार्गदर्शक योजना
  •  ईओआय मार्फत नगर रचना योजना
  •  विकास योजना
  •  प्रधान मंत्री आवास योजना (पीएमएवाय)
  •  भु मुद्रीकरण
  •  अभिलेख कक्ष

PMRDA ची कामे

  •  विकासासाठी पायाभूत आणि नागरी सेवा सुविधा पुरविणे आणि त्यासाठी नियोजन देखील करणे.
  •  व्यवसायात गुंतवणूक ही पुणे महानगर क्षेत्रात व्हावी यासाठी प्रयत्नशील असणे.
  •  सर्व प्रकल्प हरित विकासात कसे योगदान देतील यासाठी काम करणे.
  •  माहितीच्या अधिकाराखाली प्रत्येक प्रकल्पाची माहिती सांख्यिकी स्वरूपात प्रदर्शित करणे.
  •  रोजगार निर्मिती करणे.
  •  पुण्याला लाभलेली संस्कृती आणि परंपरा यांच्यासोबत सांगड घालत पुणे महानगर क्षेत्रात विकास कार्य करणे.

FAQ

PMRDA आणि PCM हे वेगवेगळे आहेत का?

हो. PCM म्हणजे पुणे महानगर पालिका तर PMRDA म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण होय.

PMRDA च्या महानगर आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकाचा संपर्क क्रमांक काय आहे?

PMRDA च्या महानगर आयुक्तांच्या पी ए चा फोन नंबर - 020 25933344

PMRDA अंतर्गत पुण्यातील कोणते क्षेत्र येते?

PMRDA च्या अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड, मावळ तालुका, हवेली आणि त्याच्याशिवाय भोर, शिरूर, दौंड, खेड, पुरंदर आणि वेल्हे तालुक्याचे काही भाग येतात.

PMRDA चे अध्यक्ष कोण आहेत?

सुहास दिवसे हे आय ए एस ऑफिसर अध्यक्ष म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये कार्यरत आहेत.

PMRDA म्हणजे काय?

PMRDA म्हणजे पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट औथोरिटी होय. यालाच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment