सीजीएसटी फुल फॉर्म CGST Full Form In Marathi

CGST Full Form In Marathi आपल्याला GST माहिती असतो मात्र बिलांवर जेवहा CGST, SGST सारख्या संज्ञा लिहून येतात तेव्हा मात्र आपल्या मनात हा विचार नक्की येतो की हे काय आहे? आपल्याकडे तर सरकार बोलते की एक देश एक कर, मग हे वेगवेगळे कर का आकारले जातात? चला तर मग आज याविषयी संपूर्ण माहिती, CGST म्हणजे काय, CGST चा फुल फॉर्म, CGST SGST आणि IGST यामध्ये काय फरक आहेत, आणि CGST संबंधित इतर काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.

CGST Full Form In Marathi

सीजीएसटी फुल फॉर्म CGST Full Form In Marathi

CGST Full Form in Marathi । CGST Long Form in Marathi

सर्वात आधी आपण GST म्हणजे काय हे समजून घेऊयात. GST म्हणजे Goods and Service Tax होय. CGST शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Central Goods and Services Tax (सेंट्रल गुडस अँड सर्व्हिसेस टॅक्स) हा आहे. CGST शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा केंद्रीय वस्तू आणि सेवा कर असा आहे.

CGST म्हणजे काय? – What is CGST?

भारतात GST ही एक कर प्रणाली लागू करण्यात आली आहे मात्र या GST मधून जे काही आधीच्या काळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या कर घेतले जात होते ते सर्व पुन्हा लावले गेलेले आहेतच. केंद्र सरकारचे जे काही अप्रत्यक्ष कर होते त्यांचा समावेश एकत्रितपणे GST मध्ये करण्यासाठी CGST ची निर्मिती केली गेली आहे.

राज्यामध्ये होणारा वस्तूचा विनिमय हा कर नियंत्रित असतो. म्हणजे जम्मू काश्मीर वगळता इतर सर्व राज्यांमध्ये वस्तूंची जर आयात निर्यात होत असेल तर त्यावर GST मध्ये CGST लावला जातो. आंतरराज्यीय वस्तू विनिमय करत असताना त्यावर SGST देखील लावला जातो.

CGST मधून होणारी संपूर्ण कर कमाई ही केंद्र सरकारकडे जात असते तर SGST मधील कमाई ही राज्य सरकार कडे असते. CGST, SGST किंवा IGST किती लावावा, कसा लावावा याविषयी सर्व नियमावली ही गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट 2017 मध्ये दिलेली आहे.

CGST कायदा काय आहे? CGST Act 2017

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 अनुसार CGST वरील नियंत्रण सांगितलेले आहे. CGST कायद्यामध्ये वस्तू आणि सेवा संदर्भात व्यवहारांवर लावले जाणारे कर सांगितलेले आहेत. CGST कायद्या अनुसार यातून मिळणारा कर हा केंद्र सरकारच्या स्वामीत्वाखाली असतो.

कायद्यातील कलम 8 अनुसार CGST हा कोणत्याही वस्तू किंवा सेवेवर 14% पेक्षा जास्त नसावा असे नमूद केलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकार किती कर वसुली करेल यावर देखील नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

उदाहरण दयायचे झाले तर 30,000 रुपये ची एखादी खरेदी किंवा विक्री असेल तर त्यावर 18% GST लागतो. आता या 18% ची विभागणी 50-50 केली जाते. यामध्ये 9% रक्कम म्हणजे 2700 रुपये हे केंद्र सरकार कडे CGST तर 9% रक्कम म्हणजे 2700 रुपये हे राज्य सरकार कडे SGST स्वरूपात असतात.

CGST चे फायदे – Benefits of CGST

एक कर व्यवस्था

बघायला गेलं तर हा GST चा फायदा आहे. कारण GST मुळे सर्व कर एकत्र आले आहेत. आपण आजही ते सर्व कर भरतो आहे मात्र ते सर्व कर एका छताखाली आणण्याचे कार्य CGST मुळे शक्य झाले आहे. यामध्ये आता आपल्याला विक्री कर, व्यवहार कर, सेवा कर हे सर्व CGST आणि GST या नावांखाली बघायला मिळतात.

वस्तू सेवा किंमती कमी

आपल्याकडे प्रत्येक कर जेवहा वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात होता तेव्हा आपल्याला प्रत्येक वस्तूसाठी 14% हुन अधिक कर हा फक्त केंद्र सरकारला द्यावा लागत होता, मात्र सध्याच्या काळात यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आज CGST मुळे केंद्र सरकारच्या करांवर नियंत्रण आले आहे आणि परिणामी वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी झालेल्या आहेत.

व्यापार सुलभ

CGST आणि GST येण्याच्या आधी आपल्याला प्रत्येक राज्याच्या कर प्रणाली अनुसार व्यापार वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागत होता आणि त्यामुळे प्रत्येक शहरात व्यापार करणे सुलभ नव्हते. मात्र CGST मुळे आंतरराज्यीय व्यापारात सुलभता आली आहे.

टॅक्स भरणे सोपे

GST मुळे प्रत्येक कर दात्याला आता टॅक्स फाईल करणे आणि भरणे सोपे झाले आहे. टॅक्स भरण्याचे प्रमाण देखील CGST आल्यानंतर वाढले होते. टॅक्स भरून ती रक्कम पुन्हा मिळविणे देखील सध्या सोपे झाले आहे.

CGST vs SGST vs IGST

CGST म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर होय. SGST म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर होय. तर IGST म्हणजे एकत्रित (Integrated) वस्तू आणि सेवा कर होय.

CGST हा कर आंतरराज्यीय वस्तू आणि सेवा देवाणघेवाण करण्यावर लावला जातो. SGST हा राज्याच्या अंतर्गत वस्तूंच्या देवाणघेवाण वर आकारला जातो. तर IGST हा कर राज्यांच्या मध्ये व्यवहार होत असताना जो कर CGST किंवा SGST म्हणून आकारता येत नाही तिथे आकारला जातो. IGST चे पुन्हा कर विभाजन करून ज्यांचे स्वामित्व आहे त्यांना म्हणजे केंद्राला किंवा राज्याला हे कर सोपविले जातात.

FAQ

GST म्हणजे काय? GST चा Full Form काय आहे?

GST म्हणजे Goods and Service Tax होय. याला मराठी मध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात.

GST चे किती भागांमध्ये विभाजन केले गेले आहे?

GST कर प्रणाली एक देश एक कर प्रणाली असली तरी देखील राज्य आणि केंद्र सरकार मध्ये करांचे स्वामित्व ठरवून देण्यासाठी CGST, SGST आणि IGST असे तीन विभागांत GST चे विभाजन केलेले आहे.

GST रक्कम पुन्हा कशी मिळवता येते?

ITR प्रमाणे GST मध्ये GST RETURN ही सेवा देण्यात आलेली आहे. तुम्ही एक व्यावसायिक म्हणून जो काही GST भरता तो सर्व तुमच्या GST खात्यावर असतो. त्यामुळे त्याला रिटर्न मिळविणे अगदी सुलभ असते.

CGST काय असतो?

CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स होय. यालाच मराठी मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणतात. हा GST चा एक विभाग आहे.

Leave a Comment