NEET फुल फॉर्म NEET Full Form In Marathi

NEET Full Form In Marathi : NEET हे नाव बऱ्याच जणांनी ऐकले असेल. NEET परीक्षा अस कुठेतरी तुम्ही ऐकले असेल. 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायचे असे ठरवल्यानंतर बऱ्याचदा NEET  परीक्षा द्या असे ऐकण्यात येते. आपण आजच्या लेखात ह्याच NEET परीक्षेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. NEET म्हणजे काय, NEET meaning in Marathi तसेच NEET full form in Marathi म्हणजेच NEET   long form in Marathi आणि NEET बद्दल इतर सर्व माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाला सुरुवात करुया.

NEET Full Form In Marathi

NEET फुल फॉर्म NEET Full Form In Marathi

NEET Full Form In Marathi | NEET  Long Form In Marathi :

NEET  या शब्दाचा Full form in Marathi म्हणजेच NEET   long form in Marathi हा National Eligibility cum Entrance Test (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) असा आहे.

NEET म्हणजे काय? | What is NEET? :

NEET म्हणजे National Eligibility Cum Entrance Test होय. NEET हे एका परीक्षेचं नाव असून NEET  हि एक पात्रता परिक्षा आहे. NEET   परीक्षा हि NTA म्हणजेच National Testing Agency (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) कडून आयोजित केली जाते. NEET   परीक्षा हि एकूण 13 भाषांमधे घेतली जाते.

NEET परीक्षा हि वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स म्हणजेच अभासक्रमानासाठी प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा म्हणून घेतली जाते. NEET परीक्षेत येणारे गुण हे वैद्यकीय क्षेत्रातील कोर्स मध्ये प्रवेश घेण्याकरिता ग्राह्य धरले जातात आणि ह्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणावर प्रवेश यादी काढली जाते.

12वी अनेकांना वैद्यकीय क्षेत्रात जायचे असते. काहींना डॉक्टर व्हायचे असते, काहीना दंत चिकित्सक व्यायचे असते, जहूनान बर्से तर काहींना इतर कोणता तरी वैद्यकीय कोर्स करण्याची इच्छा आसते. आपल्या देशात अनेक सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आहेत आणि त्यासोबतच सरकारमान्य खाजगी वैद्यकीय महाविद्यालये देखील आहेत.

अशा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश ओरक्रिया असते. या प्रवेश प्रक्रियेतील सर्वप्रथम पायरी म्हणजे प्रवेश परीक्षा होय. भारतात वैद्यकीय, दंत (Dental), आयुष (AYUSH) आणि BVSc आणि AH महाविद्यालयांत NEET   हि एकच परीक्षा म्हणून घेतली जाते. NEET परीक्षा हि राष्ट्र स्तराची अंडरग्रेजुएट म्हणजेच पदवी परिषा आहे. ही भारतातील बहुतेक विद्यालयात admission घेण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा आहे.

NEET Exam Eligibility | NEET परीक्षा पात्रता :

 • NEET परीक्षा देण्यासाठी विज्ञान क्षेत्रातून 12वी उत्तीर्ण असलेला आणि 12वी मध्ये असलेला विद्यार्थी पात्र आहे. तसेच NEET देण्यासाठी 12वी मध्ये Physics, Chemistry आणि Biology हे विषय शिकलेले असणे आवश्यक आहे.
 • वयोमर्यादा: NEET देण्यासाठी वयोमर्यादा हि परीक्षा ज्या वर्षी देत आहे त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी 17 ते 25 वर्षे आहे. SC, ST, OBC, PWD या वर्गांतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि  17 ते 30 वर्षे इतकी आहे.
 • प्रयत्नांची संख्या (Number of attempts) – विद्यार्थी आपली वयोमर्यादा पूर्ण होईपर्यंत हवे तितक्या वेळा NEET परीक्षा देऊ शकते. NEET परीक्षा देण्यासाठी प्रयत्नांची (attempts ची) अट नाही.
 • NEET परीक्षा देण्याकरिता 12वी मध्ये सामान्य वर्गासाठी किमान 50% असण्याची अट आहे आणि SC, ST, OBC ह्या वर्गांसाठी किमान 40% असण्याची अत आहे.

NEET Registration Process | NEET नोंदणी प्रक्रिया :

NEET परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी प्रथम NEET registration म्हणजे नोंदणी करावी लागते. आपण आता जाणून घेऊया की NEET registration कसे करतात आणि NEET परीक्षेचं फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात.

NTA NEET  नोंदणी प्रक्रिया –

 • सर्वप्रथमnta.nic.in या वेबसाईट वर जावे.
 • NEET वेबसाईट वर लॉगिन करावे.
 • लॉगिन केल्यानंतर तिथे विचारलेली सर्व माहिती भरावी. ह्या माहितीमध्ये ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, नाव आणि शैक्षणिक तपशील भरावा लागतो.
 • त्यानंतर NEET फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रांची कॉपी अपलोड करावी लागते. ते कागदपत्रे खालीलप्रमाणे –
 • आधार क्रमांक
 • बँक खाते क्रमांक
 • निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड
 • शिधापत्रिका क्रमांक
 • पारपत्र क्रमांक
 • सर्व ती आवश्यक माहिती भरल्यानंतर फोर सबमिट करावा.

NEET  Form Fee | NEET फॉर्म शुल्क :

सामान्य आणि OBC वर्गासाठी :  ₹1400 + GST ​​आणि सेवा कर

SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर वर्गांसाठी :   ₹750 + GST ​​आणि सेवा कर

NEET   Exam Pattern | NEET  परीक्षेचे स्वरूप :

आपण बघितले की काय NEET   परीक्षा काय असते आणि तिचा फॉर्म कसा भरावा. आता आपण बघुया की NEET   परीक्षेचं स्वरूप कसे असते.

 • NEET परीक्षेत 3 विषय असतात – Physics, Chemistry आणि
 • Biology विषयांत 2 विभाग असतात – Zoology आणि Botony
 • NEET परीक्षेत एकूण 180 प्रश्न असतात.
 • Physics आणि Chemistry या विषयांचे प्रत्येकी 45 प्रश्न असतात.
 • Biology या  विषयाचे एकूण 90 प्रश्न असतात त्यामध्ये Botony विषयाचे 45 आणि Zoology विषयाचे 45 असे एकूण 90 प्रश्न असतात.
 • प्रत्येक प्रश्न हा MCQ असतो.
 • NEET परीक्षेस एकूण 3 तासांचा वेळ असतो.
 • प्रत्येक प्रश्न हा 4 गुणांचा असतो. प्रत्येक बरोबर उत्तरास 4 गुण दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो.
 • NEET परीक्षा हि पेन आणि पेपर मोड मध्ये घेतली जाते.

FAQs – Frequently Asked Questions:

(NEET  परीक्षा कशासाठी आहे?)

NEET  ही भारतीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमध्ये MBBS आणि BDS तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याकरिता घेतली जाणारी पात्रता परिक्षा आहे आणि NEET   परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केले जाते.

NEET  परीक्षेत कोणते विषय असतात?

NEET UG परीक्षा ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमांच्या अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. NEET   परीक्षा प्रामुख्याने 3 विषयांवर आधारित असते - भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि जीवशास्त्र (Biology).

NEET  फक्त MBBS साठी आहे का?

नाही. नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच NEET   हि परीक्षा MBBS अभ्यासक्रमांसाठी घेतली जाते पण याचसोबत वैद्यकीय क्षेत्रातील इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देखील NEET   परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय (MBBS), डेंटल (MBBS) साठी NEET  पात्रता परीक्षा म्हणून घेतली जाते तसेच BDS आणि आयुष (BAMS, BUMS, BHMS) ह्या अभ्यासक्रमांसाठी देखील NEET   परीक्षा घेतली जाते.

(NEET  साठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?)

NEET .nta.nic.in हि NEET   साठी अधिकृत वेबसाईट आहे.

Leave a Comment