EWS फुल फॉर्म EWS Full Form In Marathi

EWS Full Form In Marathi अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले EWS हे प्रमाणपत्र अनेकांना माहिती देखील नाही. मात्र याच EWS कॅटेगरी मुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द करून काहीतरी पर्यायी मार्ग सरकार देऊ शकले होते. आज आपण याच EWS कॅटेगरी विषयी, EWS म्हणजे काय, EWS चा फुल फॉर्म काय आहे, EWS प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया, EWS प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पात्रता निकष, EWS साठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर काही माहिती जाणून घेणार आहोत.

EWS Full Form In Marathi

EWS फुल फॉर्म EWS Full Form In Marathi

EWS Full Form in Marathi | EWS Long Form in Marathi

EWS हा एक सराकरने निश्चित केलेला प्रवर्ग आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात आरक्षण मिळू शकते. EWS हा प्रवर्ग कोणत्याही जाती धर्माशी निगडित नसल्याने याविषयी अनेकांना माहिती देखील नाही.

EWS शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Economically Weaker Section (इकॉनॉमिकली विकर सेक्शन) असा होतो. EWS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा होतो.

EWS म्हणजे काय? What is EWS in Marathi?

भारत सरकार कडून ज्या जातींसाठी आरक्षण लागू नाहीये मात्र त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे त्यांच्यासाठी EWS ही योजना सुरु केली. संपूर्ण भारतात EWS या प्रवर्गाचा अंतर्गत 10% आरक्षण दिले जाते.

हे EWS आरक्षण सर्व खाजगी आणि सरकारी नोकऱ्या तसेच शिक्षण क्षेत्रात लागू आहे. याचा फायदा आर्थिक सवलती मध्ये जरी होत नसला तरी देखील जागा आरक्षित करण्यासाठी या आरक्षणाचा नक्कीच फायदा होतो.

EWS प्रमानपत्राचा इतिहास – History of EWS Certificate

केंद्र सरकारने 7 जानेवारी 2019 रोजी एका आदेशानुसार सरकारी नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात 10% आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्याचे ठरविले. हे आरक्षण देताना केंद्र शासनाने इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. केंद्र सरकारने हे आरक्षण देताना 50% हुन अधिक आरक्षण देण्याची मर्यादा ओलांडली आहे.

राज्यघटनेतील 142 व्या घटनादुरुस्ती अनुसार हे विधेयक लोक सभेत संमत झाले आणि नंतर राष्ट्रपतींनी देखील त्याला परवानगी दिली मात्र काही NGO ने या आरक्षणाला विरोध केला. 25 जानेवारी 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 10% आरक्षण कायम ठेवत खुल्या प्रवर्गाला एकप्रकारे दिलासा दिला.

त्यानंतर कोर्टाने यावर एक 5 सदस्यीय समिती नेमून याविषयी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. मराठा आरक्षण महाराष्ट्रात रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने व राज्य सरकारने मराठा समाजाला देखील EWS आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला.

EWS कॅटेगरी साठी पात्रता निकष काय आहे? EWS Category Eligibility Criteria

 •  EWS हे आरक्षण फक्त त्याच प्रवर्गांसाठी लागू करण्यात आलेले आहे ज्यांना या आधी कोणत्याही प्रकारे आरक्षण नाही. आता याचा अर्थ असा होतो की एससी, एसटी, ओबीसी समाजाला आधीच आरक्षण असल्याने त्यांना EWS प्रमाणपत्र काढता येत नाही. खुल्या प्रवर्गातील उमेदवार EWS प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पात्र आहेत.
 •  आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा हा घटक असल्याने यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असायला हवे.
 •  आपल्याला हे आरक्षण केंद्राकडून जरी दिले गेलेले असले तरी देखील आरक्षण मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.
 •  आर्थिक बाबतीशी हे आरक्षण अवलंबून आहे त्यामुळे कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा जास्त शेती क्षेत्र नसावे.
 •  1000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्र असलेले घर कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर असू नये ही देखील अट आहे.

केरळ राज्यात EWS साठी काही वेगळे पात्रता निकष आहेत. त्याविषयी देखील जाणून घेऊयात.

 •  केरळ राज्यात EWS प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 4 लाखांपेक्षा कमी असायला हवे.
 •  त्या कुटुंबातील व्यक्तीकडे अडीच एकर पेक्षा जास्त क्षेत्र नसावे. यामध्ये महापालिका आणि ग्रामीण क्षेत्रानुसार अटीमध्ये बदल आहेत.
 •  500 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त मोठ्या जागेत त्या कुटुंबाचे घर नसावे ही देखील एक अट घालण्यात आलेली आहे.

इतर राज्यांनी देखील EWS हा कोटा आपल्या राज्यात लागू केलेला आहे. हा कोटा देत असताना इतर आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लावण्यात आलेला नाही. त्यामुळे आजही हे आरक्षण संपूर्ण देशात लागू आहे.

EWS साठी आवश्यक कागदपत्रे – Documents Required for EWS Certificate

WS प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया बघण्याआधी आपण EWS साठी आवश्यक असणारी कागदपत्रे काय आहेत हे जाणून घेऊयात.

 •  आधार कार्ड
 •  इनकम सर्टिफिकेट
 •  जातीचे प्रमाणपत्र (खुल्या प्रवर्गासाठी नाही)
 •  पॅन कार्ड
 •  बीपीएल कार्ड
 •  बँक स्टेटमेंट

EWS प्रमाणपत्र कसे काढावे? How to apply for an EWS Certificate?

वरील मुद्यात सांगितल्याप्रमाणे जर सर्व पात्रता निकष तुम्ही पूर्ण केलेले असतील आणि कागदपत्रे असतील तर EWS प्रमाणपत्र सहज काढू शकतात. आता हे EWS प्रमाणपत्र कसे काढावे याविषयी जाणून घेऊयात.

तुमच्याकडे असणाऱ्या स्थानिक शासकीय सेतू कार्यालयातून EWS प्रमाणपत्र मिळू शकते. काही विभागांत या EWS प्रमानपत्राला 10 टक्के आरक्षण प्रमाणपत्र असे देखील म्हणतात. EWS प्रमानपत्राला त्याच्या आरक्षणावरून इनकम अँड असेट्स प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखले जाते.

सेतू कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे EWS विषयी मागणी करावी लागेल. एखादा फॉर्म भरून तुम्हाला हे प्रमाणपत्र काढण्यासाठी मागणी करता येईल. 5 ते 6 दिवसानंतर तुमच्या शासकीय कार्यालयातून अँप्रोवल मिळाले की EWS प्रमाणपत्र मिळून जाईल. हे EWS प्रमाणपत्र तुम्हाला प्रत्येक वर्षी इनकम प्रमाणपत्र देऊन बनवून घ्यावे लागते.

FAQ

ओबीसी प्रवर्गातील लोक EWS साठी अर्ज करू शकतात का?

ओबीसी प्रवर्गाला आरक्षण असल्याने त्यांना EWS साठी अर्ज करू शकत नाही.

EWS प्रमाणपत्राची वैधता कालावधी किती असतो?

EWS प्रमानपत्राचा कालावधी हा 1 वर्षे इतका असतो. आपल्याला प्रत्येक वर्षी आपले उत्पन्नाचे प्रमाणपत्र देऊन त्याला रिन्यू करावे लागेल.

EWS प्रमानपत्र असलेल्या व्यक्तीला किती टक्के आरक्षण असते?

EWS प्रमाणपत्र असणाऱ्या व्यक्तीला 10% आरक्षण मिळते. EWS हे आरक्षण नोकरी मध्ये मग ती खाजगी किंवा सरकारी असो आणि शिक्षणात मिळते.

EWS प्रमाणपत्र कुठे मिळू शकते?

EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला जवळील शासकीय कार्यालयात म्हणजे सेतू कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जावे लागेल. तिथे तुम्ही सादर केलेले सर्व कागदपत्रे तपासून तुम्हाला EWS प्रमाणपत्र दिले जाईल.

Leave a Comment