ईएमआय फुल फॉर्म EMI Full Form In Marathi

EMI Full Form In Marathi मित्रांनो फुल फॉर्म या website वर तुमचे स्वागत आहेत, आज आपण इथे पाहणार आहोत ई एम आय म्हणजे काय? ई एम आय चा अर्थ काय होतो? कर्ज घेतल्यानंतर ई एम आय किती प्रमाणात भरावा लागतो इत्यादी माहिती आपण जाणून घेणार आहोत.

EMI Full Form In Marathi

ईएमआय फुल फॉर्म EMI Full Form In Marathi

EMI Full form in Marathi | EMI long form | EMI meaning in Marathi

EMI या शब्दाचा full form म्हणजेच long form हा Equated Monthly Installment (एक्वेटेड मंथली इंस्टॉलमेंट) असा आहे. EMI या शब्दाचा मराठी अर्थ हा समतुल्य मासिक हप्ता असा आहे.

या लेखात आपण EMI विषयी पुर्ण माहिती जाणून घेऊया.

EMI म्हणजे काय? | What Is EMI? | EMI Meaning in Marathi –

EMI full form हा Equated Monthly Installment असा आहे. जेव्हा तुम्ही कर्ज घेता तेव्हा तुमच्यावर EMI लागू पडतो. ही एक ठरलेली रक्कम असते जी कर्जदाराकडून म्हणजेच कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे त्या व्यक्तीला जोपर्यंत कर्ज फेडले जात नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला द्यावी लागणारी विशिष्ट रक्कम आहे.

म्हणजेच समजा तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला त्याची परतफेड करावी लागते, अशावेळी तुम्ही एकदम ते कर्ज फेडू शकत नसाल तर एक पर्याय म्हणून EMI ने कर्ज फेडले जाते. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी महिन्याला रक्कम ठरवली जाते. हि ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला कर्ज देणाऱ्याला द्यायची. अशाप्रकारे सर्व कर्ज फेडले जाईल तोपर्यंत ही रक्कम द्यायची असते, त्यालाच EMI म्हणजेच Equated Monthly Installment म्हणजेच सोप्या भाषेत कर्जाचा हप्ता असे म्हटले जाते. अशाप्रकारे तुम्हाला EMI म्हणजे काय हे समजले असेल अशी आशा आहे. आता पुढे आपण EMI विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

आपण जेवढे कर्ज घेतो ती रक्कम म्हणजे मूळ रक्कम आणि काही ठिकाणी, खरंतर बहुतेक ठिकाणी कर्जावर व्याज लावले जाते, ती रक्कम म्हणजे व्याजाची रक्कम असते. अशा प्रकारे आपल्याला मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम काय हे कळले. मग रकमेचा EMI शी काय संबंध आहे हे आता पुढे जाणून घेऊया.

EMI जो असतो, त्यामध्ये मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम असते. याचा अर्थ जेव्हा आपण कर्ज फेडणार असतो तेव्हा मूळ रक्कम ही कर्ज देणाऱ्यास द्यायची असते पण त्यासोबत व्याजाची रक्कम देखील द्यायची असते. समजा तुम्ही एक ठराविक रक्कम कर्ज म्हणून घेतली आहे तर त्यावर काहीतरी टक्के व्याज लावले जाते. समजा 100 रुपये कर्ज घेतले आहे आणि कर देणारा म्हणाला की मी 10 टक्के व्याजाने कर्ज देईल तर याचा अर्थ असा होतो की तो मूळ रकमेच्या 10 टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला अधिक घेणार.

आता या उदाहरणात 100 रुपये रकमेचे 10 टक्के म्हणजे 10 रुपये. मग याचा अर्थ असा की जर तुम्ही 100 रुपये कर्ज 10 टक्के व्याजदराने घेतले असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 10 रुपये द्यावे लागतील. हे 10 रुपये 100 रुपयांपेक्षा वेगळे धरले जातात. याचाच अर्थ असा की तुम्ही 100 रुपयेही फेडायचे आणि वरून जोपर्यंत तुमचे 100 रुपये परत केले जात नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्याला 10 रुपये अधिक द्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला कळले असेल की व्याजाने पैसे घेणे कसे असते आणि ते पैसे मागे कसे करायचे.

आता आपण समजून घेऊया की EMI मधे व्याजाची रक्कम आणि कर्जाची रक्कम कशी दिली जाते. यामधे अजून एक गोष्ट जाणून घेणे गरजेचे आहे. आपण जेव्हा कर्ज आणि EMI याबद्दल बोलतो तेव्हा कर्ज म्हणून घेतलेली जी मूळ रक्कम असते त्यास मुद्दल असे म्हणतात. आता पुढील माहिती बघुया.

EMI हा कर्ज घेताना ठरवला जातो. आपण ज्यावेळी कर्ज घेतो तेव्हा EMI रक्कम ठरवायची असते. यात मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून एक ठराविक रक्कम द्यायची असते. हे समजून घेण्यासाठी आपण वरील उदाहरण बघुया. समजा आपण 100 रुपये कर्ज घेतले आणि ते 10 टक्के व्याजाने घेतले. अशावेळी EMI हप्ता ठरवताना आपण प्रत्येक महिन्याला मुद्दलीचे 10 रुपये आणि व्याजाचे 10 रुपये असे एकूण 20 रुपये द्यायचे ठरवले. यालाच EMI म्हणतात.

कर्ज घेताना आणि EMI ठरवताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची असते ती म्हणजे कर्जाची मुदत. कर्जाची मुदत म्हणजे जेवढ्या दिवसांसाठी तुम्ही कर्ज घेतले आहे तो काळ. समजा तुम्ही 2 वर्षांसाठी कर्ज घेतले आहे आणि असे सांगितले की 2 वर्षात मी कर्ज परत करेल तेव्हा हे 2 वर्ष म्हणजे कर्जाची मुदत होय.

आपण जेव्हा EMI भरतो तेव्हा कर्जाची मुदत किती आहे यावर पण EMI हप्ता ठरवला जातो. समजा आपण 2 वर्षांसाठी कर्ज घेतले तर 2 वर्ष प्रत्येक महिन्याला EMI हप्ता द्यायचा असतो. म्हणून EMI हप्ता असा ठरवला जातो की पूर्ण कर्ज, व्याजासहित परत केले जावे.

EMI गणना व्याज दर, कर्जाची रक्कम आणि कर्जाची मुदत या तीन घटकांवर अवलंबून असते. व्याजदर हा कर्जदारकडून आकारला जाणारा व्याजाचा दर आहे, उदा. बँक, जिथे कर्जाची रक्कम म्हणजे कर्ज घेतलेली रक्कम आहे किंवा त्याला मूळ रक्कम देखील म्हटले जाते आणि कर्जाचा कालावधी म्हणजे कर्जदाराने व्याजासह संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला वेळ आहे.

EMI चे फायदे | EMI Benefits –

  • तुम्हाला एखादी महागडी वस्तू खरेदी करायची असेल, समजा, गाडी किंवा घर आणि तुमच्याकडे पूर्ण किंमत देण्याइतपत रक्कम नसेल तर तुम्ही कर्जाचा आधार घेऊ शकता आणि EMI भरून ती वस्तू खरेदी करू शकता.
  • यामध्ये कुठलाही मध्यस्थी माणूस नसतो यामुळे सर्व व्यवहार हा स्पष्ट आणि भेसळ विरहित होतो. कुठल्याही धोक्याचा संभव नसतो.
  • तुम्ही काही बचत करून ठेवली असेल आणि तुम्हाला पैश्याची गरज असेल पण बचतीला खर्च करायचे असेल त्यावेळी EMI कामी येते. अशावेळी बचतीला धक्का न लागता तुमचे काम होऊ शकते.

EMI ani कर्जबद्दल अजून माहिती | Information about EMI and Loan –

आजकाल EMI चा उपयोग करून बहुतेक गोष्टी खरेदी केल्या जात आहेत यात प्रामुख्याने घर, गाडी अश्या मोठ्या वस्तू येतात. तसेच बरेच लोक आता उद्योगधंद्यात, व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी EMI वर कर्ज उचलतात. तसेच शिक्षण घेण्यासाठीही कर्ज उचलले जाते.

बहूतेक खाजगी आणि सरकारी बँका ह्या वरील कारणासाठी कर्ज देतात. प्रत्येक बँक मधील व्याजदर हा वेगवेगळा असू शकतो. आता EMI घेणे हे बहूतेक सोपे झाले आहे.

FAQ’s

EMI व्याज काय आहे?

ईएमआयमध्ये दोन घटक असतात - मूळ परतफेड आणि व्याज. सुरुवातीच्या वर्षांमध्ये, ईएमआयच्या महत्त्वपूर्ण भागामध्ये व्याजाची रक्कम असते. तथापि, कर्जाचा कालावधी संपल्यानंतर, मूळ रक्कम ही EMI पेमेंटचा एक प्रमुख भाग बनवते आणि व्याजाची किंमत तुलनेने कमी रक्कम बनते.

EMI डाउन पेमेंट म्हणजे काय?

डाउन पेमेंट हा एक पेमेंट पर्याय आहे जो निवडक उत्पादनांवर उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून तुम्ही उत्पादनाच्या किंमतीच्या 25% खरेदीच्या वेळी देऊ शकता आणि शिल्लक रक्कम तुमच्या क्रेडिट कार्डवरील EMI मध्ये रूपांतरित करू शकता. तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डच्या पुढील बिलिंग सायकलमध्ये डाउन पेमेंट आणि पहिला EMI हप्ता भरावा लागेल.

Leave a Comment