EBC फुल फॉर्म EBC Full Form In Marathi

EBC Full Form In Marathi महाविद्यालयात आणि विद्यालयात शिक्षण घेत असताना आपल्याला ई बी सी स्कॉलरशिप हा शब्द अनेकदा ऐकायला मिळाला असेल मात्र यातील EBC म्हणजे नक्की काय याविषयी अनेकांना माहीती नसते. EBC समाजात असून त्यातील लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या EBC चा रथ बऱ्याचदा माहिती नसतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून EBC म्हणजे काय, EBC Full Form in Marathi, EBC सर्टिफिकेट काय आहे, EBC प्रमाणपत्रासाठी पात्रता निकष काय आहेत, EBC प्रमानपत्राचे फायदे काय आहेत याविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत.

EBC Full Form In Marathi

EBC फुल फॉर्म EBC Full Form In Marathi

EBC Full Form in Marathi – EBC Long Form in Marathi

EBC हे एक शासनाकडून समाजाला दिलेले नाव आहे. आपण या आधी देखील OBC विषयी माहिती आणि FULL FORM बघितला आहे. EBC देखील एक त्याप्रमाणे प्रवर्ग आहे. EBC शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Economically Backward Class(इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास) असा आहे. EBC शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा आर्थिकदृष्टया मागास वर्ग असा होतो.

EBC म्हणजे काय? – What is EBC in Marathi?

EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवॉर्ड क्लास होय. मराठी भाषेत या प्रवर्गाला आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग असे म्हणतात. उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी या प्रवर्गाला सूट मिळत असते. आर्थिक दृष्टया हा प्रवर्ग मागे असतो आणि त्यामुळे त्याला EBC हे नाव दिलेले आहे. या प्रवर्गातील व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांच्या आत असते.

मात्र यामध्ये तेच जाती आणि जमातीचे लोक जोडलेले आहेत ज्यांना इतर कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नाही. म्हणजे SC, ST, OBC सारख्या प्रवर्गात असलेल्या लोकांना या EBC सवलतींचा फायदा घेता येत नाही. भारतीय संविधानाच्या अनुसार नोकरीत, शिक्षणात, सरकारी योजनांमध्ये EBC समाजाला आरक्षण देण्यात आलेले आहे. EBC हा समाज एक जातीचा नसून यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. फक्त 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न ही अट त्यांनी पाळली पाहिजे.

EBC प्रमाणपत्र काय आहे? – What is an EBC Certificate in Marathi?

EBC हा शासनाने आर्थिक दृष्टया मागास घटकांसाठी बनविलेला प्रवर्ग आहे. अनेकदा आपण EBC आणि EWS या दोन प्रवर्गात गोंधळ करतो मात्र आपण त्याविषयी देखील पुढे जाणून घेऊयात म्हणजे तो संभ्रम सहज दूर होईल.

आपल्या कुटुंबाचे जर वार्षिक आर्थिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला नक्कीच EBC सर्टिफिकेट बनवून घ्यायला हवे. EBC प्रमानपत्राचे आपल्याला शिक्षण, नोकरी सारख्या क्षेत्रात फायदे आहेत. त्यामुळे आपण हे प्रमाणपत्र आपल्या जवळील सेतू केंद्रातून किंवा सरकारी संस्थेतून बनवून घेतले पाहिजे. सध्या अनेकांना हे EBC काय असते हे माहिती नाहीये आणि त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत नाही.

EBC साठी पात्रता निकष – Eligibility Criteria for EBC Certificate

EBC हे एक प्रमाणपत्र आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला EBC साठी असणारे पात्रता निकष जाणून घ्यायला हवेत.

  •  सर्वात महत्वाची आणि मुख्य निकष म्हणजे आपल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांपेक्षा कमी हवे.
  •  EBC मध्ये समावेश होण्यासाठी उत्पन्नाशिवाय शेती आणि जमिनिविषयी देखील काही निकष आहेत. शेती आणि जमीन ही 5 एकर पेक्षा जास्त नसावी.
  •  तुमच्या फ्लॅटचे किंवा जिथे राहता त्या घराचे क्षेत्र हे 1000 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावे. ज्याचे क्षेत्र देता आहात ते घर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर असेल तरच ती माहिती द्यावी लागते.
  •  इतर काही निकष तुमच्या जिल्ह्यानुसार यामध्ये कमी जास्त होऊ शकतात. नगर पालिका आणि गैर नगरपालिका क्षेत्रात यामध्ये काही सवलती आणि कडक अटी देखील आहेत.

EBC प्रमाणपत्राची आवश्यकता काय आहे? – What is the need for an EBC Certificate?

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असला किंवा कोणतेही उच्च शिक्षण घेत असाल तर तिथे EBC सवलत तुम्हाला मिळते. EBC सवलत मिळविण्यासाठी विद्यार्थ्याला त्याचे EBC प्रमाणपत्र असणे गरजेचे असते. यातून विद्यार्थ्याला EBC स्कॉलरशिप मिळते आणि आर्थिक लाभ मिळतो. उच्च शिक्षणात कोणत्या राज्यात कोणाला किती सवलत आहे यात बदल असतात. महाराष्ट्रात विद्यार्थ्याला EBC सवलतीमध्ये तिथली ट्युशन फी माफ होत असते.

EBC स्कॉलरशिप पात्रता निकष – Eligibility Criteria for EBC Scholarship

  • विद्यार्थ्यांनी जर शैक्षणिक वर्षात इतर कोणत्याही सवलतीचा लाभ घेतला असेल तर त्याला EBC योजनेचा लाभ घेता येत नाही.
  •  इयत्ता 10 वि आणि इयत्ता 12 वि मध्ये विद्यार्थ्याला 60% हुन अधिक गुण असतील तरच त्याला EBC स्कॉलरशिपचा लाभ घेता येतो.
  • महाराष्ट्र राज्यात सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना नावाने EBC विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे.
  •  ज्या विद्यार्थ्यांना इयर ड्रॉप बसलेला आहे त्यांना या EBC शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही.
  •  शिष्यवृत्ती लाभ घेणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा किंवा ज्या राज्यात लाभ घेणार आहे त्या राज्याचा रहिवासी असावा.
  •  मागील वर्षात त्या विद्यार्थ्याला 60% हुन अधिक गुण असायला हवेत.

EBC स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे – Documents Required for EBC Scholarship

EBC स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रांची जुळवणी करावी लागेल. यामध्ये काही प्रमाणपत्र, काही शैक्षणी कागदपत्रे तर काही बँकेची कागदपत्रे आहेत.

  •  मागील वर्षांचा शाळा सोडल्याचा दाखला
  •  दहावी आणि बारावीच्या निकालाची सत्यांकित प्रत
  •  मागील वर्षीच्या निकालाची झेरॉक्स
  •  GAP प्रमाणपत्र (असेल तर)
  •  चालू वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  •  महाराष्ट्र राज्याचे DOMICILE सर्टिफिकेट
  •  रेशन कार्ड झेरॉक्स
  •  आधार कार्ड
  •  CAP ऍडमिशन लेटर (इंजिनिअरिंग साठी)
  •  फी भरल्याची पावती
  • कुटुंबातील लाभार्थी प्रमाणपत्र
  •  बँक पासबुक (खातेनंबर आणि IFSC कोड दिसेल असे)
  • आधार आणि बँक लिंकिंग स्लिप

FAQ

महाराष्ट्र राज्यात EBC सवलतीसाठी कोणत्या वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरावे लागतात?

महाराष्ट्र राज्यात EBC स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in वेबसाईटवर फॉर्म भरावा लागतो.

. Mahadbt वेबसाईटवर EBC स्कॉलरशिपसाठी कोणता फॉर्म भरावा?

Mahadbt वेबसाईटवर EBC स्कॉलरशिपसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना हा फॉर्म आहे.

EBC आणि EWS सारखे आहेत का?

EBC आणि EWS हे दोन्ही प्रवर्ग वेगवेगळे आहेत. EBC म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आणि EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक होय. EBC मध्ये आरक्षण नसते तर EWS मध्ये देशभरात 10% आरक्षण असते.

EBC प्रवर्गासाठी उत्पन्नाची अट काय आहे?

EBC प्रवर्गात समावेश होण्यासाठी वार्षिक उत्पन्न हे रुपये 8 लाखांच्या आत असावे, ही अट आहे.

Leave a Comment