(PhD Full Form In Marathi) आपण जर महाविद्यालयात शिक्षण घेत असाल तर अनेकदा आपल्याला या प्राध्यापकाने अमुक विषयात PhD केली असे नक्कीच ऐकायला मिळते. मात्र आपण हे ऐकत जरी असलो तरी हा विषय आपण तसाच सोडून देतो. आपल्याला PhD म्हणजे नक्की काय असते? याविषयी माहिती नसते. PhD चा Full Form काय आहे? PhD म्हणजे नक्की काय? कोणाला PhD करता येते? PhD साठी विषय काय असतात? PhD साठी तुम्हाला काय करावे लागते? हे माहिती नसते. त्यामुळे आज आपण या सर्व मुद्यांवर माहिती जाणून घेणार आहोत.
पीएचडी फुल फॉर्म PhD Full Form In Marathi
PhD म्हणजे काय? (What Is PhD In Marathi)
PhD ही पदवी आहे. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या मुख्य विषयात तज्ञ बनतो तेव्हा त्याला त्याच्या ज्ञानासाठी पीएचडी ही पदवी दिली जाते. तो व्यक्ती त्याने निवडलेल्या विषयात अतिशय तज्ञ असतो.
PhD या पदवीसाठी तुम्हाला सर्वात आधी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करावे लागते. पदव्युत्तर शिक्षणानंतर आपल्याला PhD पदवी अभ्यासक्रमासाठी पात्रता मिळते. PhD करत असताना आपल्याला एक पीएचडी होल्डर गाईड निवडावा लागतो. त्या गाईडच्या अंतर्गतच तुम्हाला पीएचडी करता येते. PhD साठी लागणारा कालावधी हा तुमच्या विषयानुसार आणि संशोधनानुसार 3 वर्षे ते 6 वर्षे इतका असू शकतो.
PhD ही कोणत्याही विषयात करता येते. त्यावर कुठल्याही प्रकारे विषयाचे बंधन नसते. मात्र PhD करणे तितके सोपे नसते आणि त्यामुळे या पदवीला समाजात खूप महत्वाचे आणि सन्मानचे स्थान आहे. PhD झालेल्या व्यक्तीच्या नावासमोर डॉक्टर (Dr.) ही पदवी लागते. PhD झालेल्या व्यक्तीला नोकरीत जास्त महत्वाचे स्थान दिले जाते आणि त्याच्या ज्ञानाचे आणि सल्ल्याचे महत्व देखील वाढलेले असते.
PhD Full Form in Marathi । PhD Long Form in Marathi
PhD या शब्दाचा किंवा पदवीचा इंग्रजी भाषेत full form हा Doctor of Philosophy असा होतो. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच विषयातील तज्ञ होय.
PhD या पदवीला शुद्ध मराठी भाषेत विषय विशेष तज्ञ असे म्हणतात.
PhD करण्यासाठी पात्रता :-
PhD हे पद त्या व्यक्तीला समाजात खूप जास्त महत्वाचे स्थान मिळवून देत असते आणि त्यामुळे त्यासाठी त्या व्यक्तीची पात्रता देखील तितकीच कठोर असायला हवी.
- PhD साठी निवेदन देताना तुमचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले हवे.
- पदव्युत्तर शिक्षणात देखील खुल्या प्रवर्गाला 60% तर इतर राखीव गटांसाठी 55% गुण असणे गरजेचे आहे.
- PhD करण्यासाठी वयोमर्यादा देखील आहे. PhD करत असताना त्या व्यक्तीचे वय हे 55 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
- PhD करण्यासाठी त्या प्राध्यापकाला किंवा स्नातकाला ज्या विद्यापीठातून PhD करायची आहे त्या विद्यापीठाची PhD प्रवेश परीक्षा पास करणे गरजेचे आहे.
- एकदा परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला विषय निवडता येतात आणि मग त्यासाठी तुम्ही पीएचडी असलेल्या गाईडकडे गाईडन्स साठी मागणी करू शकतात.
PhD साठी तयारी कशी करावी?
प्रत्येक विद्यापीठाच्या अनुसार तुम्हाला पीएचडी साठी लागणाऱ्या तयारीत बदल असतील मात्र जवळपास यात जास्त काही बदल नसेल. PhD अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी एक लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यांमधून तुम्हाला जावे लागेल. काही विद्यापीठांमध्ये तुमच्या विषयाशी निगडित काही प्रश्न या परीक्षेत असतात तर काही ठिकाणी संशोधन पद्धतीवर प्रश्न विचारलेले असतात.
मुलाखतीत तुमची योग्यता ठरवली जाते त्यामुळे त्याची तयारी करणे सर्वात महत्वाचे असते. निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमचे PhD साठी संशोधन सुरू होते.
तुम्हाला आता रिसर्च करावा लागतो. यामध्ये तुम्हाला काही सेमिनार देखील द्यावे लागतील. अनेकदा तुमचा गाईड तुम्हाला नवीन विषयांवर शोध घेण्यासाठी सांगेल मग त्यावर तुम्हाला शोध घ्यावा लागेल.
तुम्हाला त्यासाठी काही डेटा जमा करून त्यावरून निष्कर्ष काढावे लागतील. या काळात तुम्हाला तुमचे संशोधन किंवा अभ्यासपूर्ण माहिती एखाद्या जर्नल मध्ये थेसिस रुपात प्रकाशित करावी लागतील. हे सर्व जर्नल्स प्रतिष्ठित असावीत असा शेवटच्या परीक्षण समितीचे म्हणणे असते.
प्रत्येक 6 महिन्यात तुम्हाला तुमच्यासाठी दिलेल्या परीक्षण समिती समोर तुमच्या अभ्यासाची दिशा आणि काय केले आहे हे दाखवावे लागते. अंतर्गत आणि बाह्य असे दोन परीक्षक मिळून तुमच्या PhD विषयावर तुमचा शेवटी एक प्रेझेंटेशन घेतात आणि त्यानंतर तुम्हाला PhD ही पदवी दिली जाते.
PhD साठी विषय :-
PhD ही कोणत्याही विषयात करता येते. यावर कुठल्याही प्रकारे बंधन नाही. PhD करण्यासाठी तुम्ही तुमच्या पदवी शिक्षणाचा विषय निवडू शकतात किंवा त्याहून वेगळा विषय देखील निवडता येतो मात्र तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात त्या क्षेत्राशी निगडित जर तुम्ही पदवी साठी विषय घेतला तर तुम्हाला नोकरीत बढती आणि पगार वाढ मिळू शकते.
PhD साठी अनेक विषय आहेत मात्र यातील काही विषय तुम्हाला अधिक सन्मान आणि पैसे मिळवण्याच्या संधी देऊ शकतात, ते खालीलप्रमाणे-
- भौतिकशास्त्र पीएचडी
- रसायनशास्त्र अभियांत्रिकी पीएचडी
- बायोमेडिकल अभियांत्रिकी पीएचडी
- इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी पीएचडी
- रसायनशास्त्र पीएचडी
- अर्थशास्त्र पीएचडी
- गणित किंवा स्टॅटिस्टिक्स पीएचडी
- औषध निर्माण शास्त्र पीएचडी
- मायक्रोबायोलॉजी पीएचडी
- संगणकशास्त्र पीएचडी
- आरोग्य सेवा व्यवस्थापन पीएचडी
- संख्यात्मक वर्तन पीएचडी
महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत केल्या जाणाऱ्या पीएचडीला सर्वाधिक जास्त महत्व आहे. आता शासनाने ऑनलाइन किंवा मुक्त विद्यापीठांमधून घेतल्या जाणाऱ्या PhD ला कालबाह्य ठरवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे.
PhD करण्यासाठी येणारा खर्च :-
अनकेदा आपल्याला काहीही शिक्षण सुरू करण्याआधी त्या शिक्षणाला येणारा खर्च जाणून घ्यायचा असतो. PhD हा देखील एक पदवी अभ्यासक्रम आहे. PhD करत असताना ती महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून करता येते. खाजगी महाविद्यालय आणि सरकारी महाविद्यालय दोन्ही ठिकाणी PhD करण्याची सुविधा आहे.
सरकारी महाविद्यालयातून PhD करायची असेल तर वर्षाला 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. खाजगी महाविद्यालयात जर PhD करत असाल तर 50 हजार रुपये ते 2 लाख 50 हजार रुपये इतका हा खर्च प्रति वर्ष होऊ शकतो.
PhD करताना मिळणारे स्टायपेंड :-
तुम्ही जर खाजगी महाविद्यालयात PhD करत असाल तर तुम्हाला तुमच्या विषयानुसार 30 हजार ते 80 हजार पर्यंत मासिक स्टायपेंड मिळते. सरकारी महाविद्यालयातून जर तुम्ही PhD करत असाल तर तुम्हाला महिन्याला 30 हजार पेक्षा जास्त स्टायपेंड मिळते.
PhD Full Form in Marathi, PhD म्हणजे काय?, PhD शिक्षण कुठे घेता येते?, PhD साठी विषय, PhD साठी येणारा खर्च आणि स्टायपेंड याविषयी आज आपण माहिती बघितली.
