सी.ए. फुल फॉर्म CA Full Form In Marathi

CA Full Form In Marathi – CA म्हणले की आपल्याला कायम आठवतो तो व्यक्ती म्हणजे ज्याच्या कडे आपण आपले सर्व काही व्यावहारिक कामे घेऊन जातो आणि तो आपल्याला त्यामध्ये मदत करतो किंवा आपल्याला आर्थिक संकटातून आणि आर्थिक व्यवहारातून सुरक्षित अशी मदत करतो. पण कधी आपण विचार केला आहे का की नक्की या CA शब्दाचा अर्थ काय आहे? CA चा Full Form काय असतो?

CA Full Form In Marathi

सी.ए. फुल फॉर्म CA Full Form In Marathi

आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण CA Full Form in Marathi, CA म्हणजे काय, CA ची कामे काय असतात, ICAI म्हणजे काय, CA कसे होता येते, CA परीक्षांचे स्वरूप, CA होण्यासाठी पात्रता याविषयी जाणून घेणार आहोत.

CA म्हणजे काय? (What Is CA In Marathi)

CA ही एक पदवी असून हा अभ्यासक्रम हा ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाऊंटंट याच्या अंतर्गत चालतो. CA हा एक शिक्षक देखील असू शकतो किंवा CA करून एखादा व्यक्ती कंपनीतील उच्च पदांवर जाऊ शकतो. यामध्ये मुख्यतः मॅनेजर आणि सिएफओ ही पदे येतात.

एका कंपनीत काम करत असताना CA इतरही कंपन्यांसाठी किंवा व्यक्तींसाठी एक चांगला टॅक्स ऍडवायझर म्हणून काम बघू शकतो. CA हा इतर कोर्सेस प्रमाणे एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन पूर्ण करण्याचा कोर्स नाहीये. तुम्हाला ICAI अंतर्गत हा कोर्स भेटतो पण यासाठी कोणत्याही कॉलेजला जाण्याची गरज नसते. तुमचा प्रवेश हा फक्त ICAI मध्ये झालेला असतो.

CA Full Form in Marathi । CA Long Form in Marathi

CA आपण किती सहज बोलून जातो मात्र त्यामागील खरा अर्थ हा त्याच्या फुल फॉर्म मध्ये दडलेला आहे. CA हा कोणत्याही वित्तीय विभागाचे किंवा संस्थेचे मूल्यमापन करणारा सर्वात महत्वाचा अधिकारी असतो. त्यामुळे व्यवसायाच्या क्षेत्रात मात्र CA शिवाय कोणतेही काम होत नसते. CA या शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Chartered Accountant असा होतो. CA शब्दाचा शुद्ध मराठी भाषेत फुल फॉर्म हा सनदी लेखापाल असा होतो.

ICAI म्हणजे काय?

ICAI म्हणजेच The Institute Of Chartered Accountants of India होय. ICAI ही एक घटनात्मक संस्था आहे. 1 जुलै 1949 रोजी चार्टर अकाऊंटंट 1949 या कायद्यानुसार ICAI संस्थेची स्थापना करण्यात आली.

CA ची कामे काय असतात?

  • कंपनी आणि व्यापारी वर्गातील सर्व व्यवहारांची अचूक माहिती ठेवणे आणि त्याचा हिशोब करण्याचे कार्य CA करतात.
  • व्यवहारांसाठी कायद्यानुसार आर्थिक सल्ले देण्याचे कार्य CA करतात.
  • आपण ऑडिट झालं हे ऐकून असाल? ऑडिट करण्याचे महत्वाचे काम हे CA करतात. कदाचित ही कामे इतर अधिकारी देखील करतात मात्र त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार हा फक्त CA ला असतो.
  • कर आणि त्यासंबंधित कंपनीला होणारे फायदे आणि कर न भरल्याचे नुकसान हे सर्व काही CA सांभाळत असतो. तो त्या कंपनीचा एकप्रकारे आर्थिक सल्लागारच असतो.
  • अनेक शासकीय यंत्रणा मध्ये CA ला महत्वाचे स्थान दिलेलं आहे. कंपन्यांमध्ये देखील CA हा उच्च पदस्थ अधिकारी असतो. त्याच्या हाताखाली वाणिज्य शाखेतील आणि इतर वित्तीय शाखेतील विद्यार्थी कार्यरत असतात.
  • कर मूल्यमापन आणि कर आकारणी सोबत कायद्याने कर कसा वाचवता येईल याविषयी सर्व माहिती त्या CA ला असल्याने कंपनीला अधिकाधिक फायदा करून देण्याचे काम CA करतात.

CA परीक्षांचे स्वरूप

CA हा अभ्यासक्रम शब्दात दिसतो तितका सोप्पं नाहीये. CA होण्यासाठी आपल्याला 3 टप्प्यातून जावे लागते. आज आपण हेच परीक्षांचे स्वरूप थोडक्यात जाणून घेऊयात.

सर्वात आधी तर CA साठी होणाऱ्या सर्व परीक्षा या वर्षतून 2 वेळा म्हणजेच मे आणि नोव्हेंबर या महिन्यात होतात. म्हणजे वर्षातून तुम्हाला 2 वेळा संधी मिळते.

Foundation :-

फाउंडेशन परीक्षेत एकूण 4 पेपर असतात. यामध्ये तुम्हाला 2 पेपर हे विभागलेले असतात. 12 वि नंतर जर तुम्हाला CA करायचे असेल तर तुम्हाला ही Foundation परीक्षा द्यावी लागते. मात्र पदवी नंतर जर प्रयत्न केला तर तुम्हाला फाउंडेशन हा पेपर द्यावा लागत नाही. तुमच्या CA होण्याच्या यशोमार्गातून पहिला टप्पा नाहीसा झालेला असतो. तुम्हाला सरळ दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच intermediate exam ला बसता येते.

Intermediate :-

ही पायरी सर्वात महत्वाची असते कारण याआधी तुम्हाला 8 महिन्यांची आर्टिकलशिप देखील करावी लागते. ही परीक्षा 2 विभागात विभागलेली असून एका विभागात एकूण 4 पेपर असतात. जोपर्यंत तुम्ही हे सर्व विषय पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला परत परत हे सर्व विषय द्यावे लागतात.

Final:-

Final पेपर ला जाण्याच्या आधी तुम्हाला कमीत कमी 2अडीच वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. CA FINAL साठी हा पात्रता निकष आहे. यामध्ये देखील 2 विभाग आणि एका विभागात 4 असे एकूण 8 पेपर असतात. आपल्याला यामध्ये दुसऱ्या विभागात एका विषयाला पर्यायी विषय निवडण्याची संधी असते. एकदा final पेपर पास झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या नावासमोर CA लावू शकतात.

CA साठी पात्रता

तुम्हाला CA होण्यासाठी 2 मार्ग आहेत आणि त्यानुसार मग तुम्ही जो मार्ग निवडाल त्यानुसार तुमची पात्रता ठरते. तुम्हाला 12 वि नंतर जर CA साठी प्रवेश घ्यायचा असेल तर CA फाउंडेशन या परीक्षेत तुम्हाला सहभागी व्हावे लागेल. CA फौंडेशन ही परीक्षा तुम्हाला CA कोर्स मध्ये पहिली स्टेप म्हणून असतो.

फाउंडेशन नंतर intermediate आणि त्यानंतर final अशा तीन टप्प्यात तुम्हाला CA होण्यासाठी मार्गक्रमण करायचे असते. 12 वि मध्ये देखील तुम्ही विज्ञान किंवा कॉमर्स या दोन शाखांमधून पास झालेले असावे ही अट आहे. 55% हुन अधिक मार्क्स तुम्हाला 12 वि मध्ये असायला हवेत.

वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेत जर तुम्ही पदवी घेतली असेल किंवा कुठलीही पदवी घेतलेली असेल तर तुम्हाला CA साठी प्रवेश घेता येतो. हा पदवी नंतरचा मार्ग आहे. यामध्ये फक्त तुम्हाला 3 टप्प्यांपैकी पहिला फाउंडेशन चा टप्पा करावा लागत नाही. तुम्हाला सरळ INTERMEDIATE आणि FINAL साठी अभ्यास करायचा असतो. आर्टिकल शिप हा एक CA बनण्यासाठी टप्पा असतो. जवळपास 8 महिन्यांची कमीत कमी तुम्हाला आर्टिकलशिप करावी लागते.

FAQ’s On CA Full Form In Marathi

CA चा पगार किती असतो?

भारतात सरासरी पगार 6-7 लाखांच्या दरम्यान आहे. एखाद्या CA चा पगार, त्याच्या कौशल्य आणि अनुभवानुसार सरासरी 40-60 लाखांपर्यंत वाढू शकतो. जर त्याला आंतरराष्ट्रीय पोस्टिंग मिळाली तर तो 75 लाख रुपये कमवू शकतो. अलीकडील ICAI प्लेसमेंटमध्ये, 8.4 लाख हे CA चा सरासरी पगार आहे.

सीए साठी पात्रता काय आहे?

या अभ्यासक्रमासाठी पात्रता निकष म्हणजे वाणिज्य शाखेतील 55% एकूण गुणांसह पदवी किंवा गैर-वाणिज्य विषयात एकूण 60% गुण किंवा प्रथम स्तर पात्रता. सीए इंटरमीडिएट परीक्षांचे दोन गट आहेत आणि तुम्हाला दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

सीएची नोकरी काय आहे?

एक चार्टर्ड अकाउंटंट, ज्याला प्रमाणित सार्वजनिक लेखापाल किंवा CPA म्हणून देखील ओळखले जाते, हा एक व्यावसायिक लेखापाल आहे जो लेखाविषयक क्रियाकलापांच्या स्पेक्ट्रमसह काम करण्यास पात्र आहे. चार्टर्ड अकाउंटंट अकाउंटिंग सिस्टम लागू करेल, मासिक आर्थिक अहवाल तयार करेल आणि कॉर्पोरेट टॅक्स रिटर्न सबमिट करेल.

मी 12वी नंतर CA करू शकतो का?

ज्या विद्यार्थ्यांना 12वी विज्ञान नंतर सीए व्हायचे आहे ते 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, जी कार्यक्रमासाठी प्रवेश-स्तर परीक्षा आहे. 12वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर ते सीए फाउंडेशनच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

Leave a Comment