UCC Full Form In Marathi आपल्या भारत देशातील विविध जाती – धर्मातील प्रत्येक नागरिकाला एक नियम असणाऱ्या कायद्याला “समान नागरी कायदा” असे म्हणले जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच समान नागरी कायद्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण यू.सी.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची देखील माहिती देखील पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “युनिफॉर्म सिव्हिल कोड” म्हणजे “यू.सी.सी” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

यू.सी.सी फुल फॉर्म UCC Full Form In Marathi
यू.सी.सी फुल्ल फॉर्म (UCC full form)
यू.सी.सी चा फुल्ल फॉर्म “युनिफॉर्म सिव्हिल कोड” असा होतो. यू.सी.सी ला मराठी भाषेमध्ये “समान नागरी कायदा” असे म्हणले जाते. भारतीय जनता पक्षाचा देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा अजेंडा खूप आधीपासून आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे मंदिर बनवणे ,३७० कलम हटवणे आणि देशामध्ये समान नागरी कायदा लागू करणे ,हे भारतीय जनता पक्षाचा खूप आधीपासूनचा अजेंडा राहिला आहे.
भारतीय जनता पक्षाने अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे मंदिर बनवले ,तसेच त्यांनी ३७० कलम देखील हटवले. याचसोबत यावर्षाच्या सुरवातीला उत्तराखंड राज्यातील सरकारने उत्तराखंड राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू केला आहे.
समान नागरी कायदा (Uniform civil code in Marathi)
आपला भारत देश हा विविधतांचा देश आहे. आपल्या भारत देशामध्ये विविध जातीचे ,धर्माचे लोक राहतात. तसेच आपल्या भारत देशामध्ये विविध धर्मांतील सण सर्वजण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतात. वर्तमानात आपल्या देशामध्ये विविध धर्मांसाठी विविध कायदे लागू आहेत. देशामध्ये जर समान नागरी कायदा लागू झाला तर ,देशातील विविध धर्मासाठी एकच कायदा लागू होईल. संविधानातील अनुच्छेद ४४ मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे.
आपल्या भारत देशामध्ये बऱ्यापैकी सर्व धर्माचे लोक राहतात. भारतामध्ये हिंदू धर्म हा बहुसंख्यांक धर्म आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये विविध जाती येतात. या प्रत्येक जातीचे विविध रीती रिवाज आहेत. तसेच इस्लाम धर्मामध्ये देखील विविध लोकांचे वेगवेगळे रीती रीवाज आहेत. याचसोबत क्रिश्चन धर्मात देखील वेगवेगळे रीती रीवाज आहेत. अशा मध्ये समान नागरी कायदा जर देशामध्ये लागू झाला तर ,प्रत्येक धर्मातील लोकांना एक समान कायदा असेल.
देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचे काही फायदे (Some advantages of implementing uniform civil code in Marathi)
१) देशातील विविध जाती – धर्मातील लोकांना विवाह ,घटस्फोट ,संपत्ती आणि अधिकाऱ्यांमध्ये समान कायदा लागू केल्याने देशामध्ये समानता वाढेल.
२) देशातील आजही काही क्षेत्रामध्ये महिलांना कमीपणाचा दर्जा दिला जातो. समान नागरी कायदा भारतात जर लागू झाला तर ,पुरुषांसोबत स्त्रियांना देखील समान न्यान मिळेल.
३) देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला तर ,विविध जाती – धर्मातील लोकांमध्ये एकता निर्माण होईल.
४) वर्तमानात आपल्या देशामध्ये प्रत्येक जाती – धर्मातील लोकांसाठी विवाह , घटस्फोट, संपत्ती आणि अधिकारांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. जर समान नागरी कायदा आपल्या देशामध्ये लागू झाला तर ,देशातील नागरिकांना कायदा जाणून घेणे सोपे जाईल.
५) आपला भारत देश हा “धर्मनिरपेक्ष देश” आहे, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये विविध जाती – धर्मांचे लोक राहतात. जर आपल्या भारत देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला तर ,हा कायदा धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देईल.
देशामध्ये समान नागरी कायदा लागू होण्याचे नुकसान (Some disadvantages of implementing uniform civil code in Marathi)
आपल्या भारत देशामध्ये जर समान नागरी कायदा लागू झाला ,तर प्रत्येक धर्मातील नागरिकांना समान कायदा असेल. अशा परिस्थिती मध्ये काही समुदायातील लोकांच्या मते, “समान नागरी कायदा लागू झाल्यामुळे लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात येईल”.
FAQ
यू.सी.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
यू.सी.सी चा फुल्ल फॉर्म “युनिफॉर्म सिव्हिल कोड” असा होतो.
यू.सी.सी ला मराठी भाषेमध्ये काय म्हणले जाते ?
यू.सी.सी ला मराठी भाषेमध्ये “समान नागरी कायदा” असे म्हणले जाते.
समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय ?
समान नागरी कायदा हा एक कायदा आहे आणि हा कायदा जर भारतात लागू झाला तर ,देशातील विविध धर्मातील प्रत्येक नागरिकाला एकच नियम असेल.
समान नागरी कायद्याचे फायदे कोणकोणते आहेत ?
देशामध्ये समान नागरी कायदा जर लागू झाला तर , देशातील लोकांमध्ये समानता वाढेल. तसेच आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला तर, धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन मिळेल.
भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू झाला आहे ?
या वर्षाच्या सुरवातीला उत्तराखंड राज्यामध्ये तेथील सरकारने समान नागरी कायदा लागू केला आहे.
निष्कर्ष (Conclusion)
देशामध्ये प्रत्येक धर्मातील लोकांसाठी विवाह , घटस्फोट ,संपत्ती आणि अधिकारांमध्ये समान कायदा लागू करणे म्हणजे “समान नागरी कायदा”. आजच्या लेखामध्ये आपण याच समान नागरी कायद्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण यू.सी.सी चा फुल्ल फॉर्म, देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचे काही फायदे, देशामध्ये समान नागरी कायदा लागू होण्याचे नुकसान, यू.सी.सी विषयी विचारल्या जनर्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.
संदर्भ (References)
२)https://hindi.lawrato.com/indian-kanoon/ucc-uniform-civil-code