टी.एल.सी फुल फॉर्म TLC Full Form In Marathi

TLC Full Form In Marathi आजच्या लेखामध्ये आपण पांढऱ्या पेशी संबंधी असणाऱ्या एका टेस्ट विषयी म्हणजे टी.एल.सी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण टी.एल.सी च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे टी.एल.सी चा फुल्ल फॉर्म आणि टी.एल.सी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

TLC Full Form In Marathi

टी.एल.सी फुल फॉर्म TLC Full Form In Marathi

टी.एल.सी फुल्ल फॉर्म  (TLC full form)

टी.एल.सी चा फुल्ल फॉर्म “टोटल ल्यूकोसाइट्स काउंट” असा होतो. टी.एल.सी टेस्ट ही आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशीशी सबंधित असते. आपल्या शरारीतील पांढऱ्या पेशी या आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये मोठी भूमिका बजावत असतात.

आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स ची संख्या जर वाढली तर आपल्याला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो , त्यामुळे आपण आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्सचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम किंवा योग केला पाहिजे. याचसोबत आपण निरोगी आहाराचे सेवन देखील केले पाहिजे ; जेणेकरून आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित राहील.

टी.एल.सी टेस्ट (TLC Test in Marathi)

टी.एल.सी टेस्ट ही एक रक्ताची टेस्ट असते ज्याद्वारे आपल्या शरीरातील रक्तामधील ल्यूकोसाइट्स ची संख्या मोजली जाते. या टी.एल.सी टेस्ट द्वारे शरीरातील पांढऱ्या पेशींच्या संख्या देखील मोजली जाते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हायरस किंवा बॅक्टेरिया चे संक्रमण होते ,तेव्हा आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी त्या व्हायरस पासून आपल्या शरीराचे रक्षण करत असतात.

टी.एल.सी टेस्ट द्वारे आपले शरीर  व्हायरस किंवा बॅक्टेरिया ने संक्रमित आहे की नाही हे आपल्याला समजते. तसेच टी.एल.सी टेस्ट द्वारे आपल्या शरीरामध्ये होणारे बदल देखील आपल्याला समजतात. समजा आपण टी.एल.सी ची टेस्ट केली आणि आपला रिपोर्ट असामान्य आला तर, आपण असे समजावे की, “आपले शरीर कोणत्यातरी व्हायरस वा बॅक्टेरिया ने संक्रमित झाले आहे.”

टी.एल.सी टेस्ट करण्याची प्रक्रिया (Procedure for conducting TLC test in Marathi)

टी.एल.सी टेस्ट करताना सर्वप्रथम आपल्या शरीरामधील रक्त घेतले जाते ,त्या रक्ताला लाल ट्यूब मध्ये संग्रहित केले जाते आणि टी.एल.सी टेस्ट करण्यासाठी त्या रक्ताच्या सँपल ला प्रयोगशाळेत पाठवले जाते. आपली टी.एल.सी ची टेस्ट झाल्यानंतर काही वेळानंतर टी.एल.सी टेस्ट चा रिपोर्ट येतो ,ज्याद्वारे आपल्याला समजते की, “आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स ची संख्या नियंत्रित आहे की कमी – जास्त आहे ते”. जर आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित नसेल तर ,डॉक्टर आपले उपचार करतात आणि काही केसेस मध्ये आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित नसेल तर ,डॉक्टर आपल्याला ऍडमिट होण्याचा सल्ला देतो.

टी.एल.सी टेस्ट देताना घ्यावयाची काळजी (Precautions to be taken while giving TLC test in Marathi)

१) टी.एल.सी टेस्ट देण्यापूर्वी आपण व्यायाम केला नसला पाहिजे. आपण जर टी.एल.सी टेस्ट देण्यापूर्वी व्यायाम केला तर ,आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स ची संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते.

२) आपल्या शरीरातील टी.एल.सी ची संख्या सतत वाढत असते वा कमी होत असते ,त्यामुळे आपण डॉक्टर जेव्हा म्हणतील तेव्हाच टी.एल.सी ची टेस्ट केली पाहिजे.

३) जर तुम्हाला अगोदरच कोणतातरी आजार असेल तर ,टी.एल.सी टेस्ट करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांना त्या आजारा विषयी माहिती दिली पाहिजे.

४) टी.एल.सी ची टेस्ट देण्यापूर्वी आपण अति तणावामध्ये नसलो पाहिजे.

५)  टी.एल.सी ची टेस्ट देण्यापूर्वी आपण बाहेरचे फास्ट फूड खाल्ले नाही पाहिजे.

आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण खालील गोष्टी केल्या पाहिजेत (To control the amount of leukocytes in our body, we should do the following things in Marathi)

१) आपल्याला जर आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर ,आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच आपण नियमित मेडीटेशन देखील केले पाहिजे. आपण जर नियमित व्यायाम आणि नियमित मेडीटेशन केले तर ,आपले शरीर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या मजबूत बनेल.

२) आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. तसेच आपण दररोज विविध फळांचे सेवन केले पाहिजे.

३) आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण मिठाचे सेवन जेवढे कमी करता येईल तेवढे कमी केले पाहिजे. तसेच आपण जेवढे शक्य तेवढे पाणी पिले पाहिजे.

FAQ

टी.एल.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

टी.एल.सी चा फुल्ल फॉर्म “टोटल ल्यूकोसाइट्स काउंट” असा होतो.

टी.एल.सी टेस्ट द्वारे आपल्या शरीरातील कोणत्या घटकाची संख्या मोजली जाते ?

टी.एल.सी टेस्ट द्वारे आपल्या शरीरातील रक्तातील ल्यूकोसाइट्स ची संख्या मोजली जाते. तसेच या टी.एल.सी टेस्ट वरून आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण किती आहे याची देखील माहिती आपल्याला समजते.

आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ?

आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण नियमित व्यायाम आणि मेडीटेशन केले पाहिजे. याचसोबत आपण निरोगी आहाराचे सेवन केले पाहिजे. आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा ,डाळींचा समावेश केला पाहिजे. तसेच आपण दररोज विविध प्रकारची फळे खाल्ली पाहिजेत.

टी.एल.सी टेस्ट करताना आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे ?

टी.एल.सी ची टेस्ट करण्यापूर्वी आपण व्यायाम नाही केला पाहिजे. तसेच आपण बाहेरचे फास्ट फूड नाही खाल्ले पाहिजे. डॉक्टर जेव्हा आपली टी.एल.सी ची टेस्ट करतील ,तेव्हा आपण तणाव नाही घेतला पाहिजे. आपल्याला जर अगोदरच कोणतातरी आजार असेल तर ,टी.एल.सी टेस्ट करण्यापूर्वी आपण त्या आजाराविषयी डॉक्टरांना सांगितले पाहिजे.

आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण केव्हा कमी – जास्त होते ?

आपले शरीर जेव्हा कोणत्यातरी व्हायरस ने किंवा बॅक्टेरिया ने संक्रमित होते ,तेव्हा आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण वाढते किंवा कमी होते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण टी.एल.सी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण टी.एल.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? ,टी.एल.सी टेस्ट करण्याची प्रक्रिया, टी.एल.सी टेस्ट देताना घ्यावयाची काळजी , आपल्या शरीरातील ल्यूकोसाइट्स चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टी ,टी.एल.सी टेस्ट विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/White_blood_cell?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

२)https://redcliffelabs.com/myhealth/hindi/tlc-test-brief-information-and-importance/

३)https://unacademy-com.translate.goog/content/neet-ug/full-forms/tlc-full-form/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

४)https://www.ganeshdiagnostic.com/blog/tlc-and-dlc-test-in-hindi

५)https://pathcareindia.com/news/tlc-count-in-blood-test-in-hindi/

Leave a Comment