SP फुल फॉर्म SP Full Form In Marathi

SP Full Form In Marathi पोलीस दलामध्ये देखील खांद्यावर असलेल्या विविध प्रकारच्या स्टार वरून त्यांचा एक दर्जा ठरविला जातो. त्यापैकी एक म्हणजे SP होय. आज आपण SP म्हणजे काय, SP शब्दाचा फुल फॉर्म काय आहे, SP बनण्यासाठी पात्रता निकष, SP ची कामे, SP शब्दाचे इतर काही फुल फॉर्म याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

SP Full Form In Marathi

SP फुल फॉर्म SP Full Form In Marathi

SP Full Form in Marathi । SP Long Form in Marathi

जिल्ह्यातील पोलीस दलाच्या प्रमुखाला SP म्हणून ओळखले जाते. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरती होणारे हे पद म्हणजे पोलीस दलातील एक महत्वाचा भाग आहे.

SP शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Superintendent of Police (सुप्रिंटेडन्ट ऑफ पोलीस) असा आहे. SP शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा पोलीस अधीक्षक असा होतो.

SP म्हणजे काय? – What is SP?

पोलीस दलातील जिल्ह्याचा मुख्य अधिकारी म्हणजे SP होय. यालाच मराठी भाषेत पोलीस अधीक्षक म्हणून ओळखले जाते. मुख्यतः तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या शहरात राहत असाल तर तुम्हाला SP हे पद ऐकायला मिळणार नाही कारण तिथे कमिशनर ऑफ पोलीस कार्यरत असतात मात्र कमिशनर ऑफ पोलीस या व्यक्तीच्या खालील पद म्हणजे डेप्युटी पोलीस कमिशनर हा दर्जा SP स्तराचा असतो.

SP हे पद आपल्याकडे राज्य आणि केंद्र दोन्ही सरकार कडून दिले जाते. UPSC सारखी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपण IPS अधिकारी होऊन SP या पदावर कार्यरत असतो किंवा राज्य सरकार कडून पोलीस दलातून होणारी पदोन्नती देखील SP पदापर्यंत घेऊन जाते.

IPS झालेला SP आणि राज्य स्तरावरून आलेला SP ओळखण्याची महत्वाची खून म्हणजे त्यांच्या खांद्यावर असलेले बॅच होय. प्रत्येक SP अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या बॅच वर भारताचे अशोक स्तंभ हे चिन्ह असते. IPS अधिकारी असेल तर त्याच्या खांद्यावर अशोक स्तंभखाली दोन स्टार आणि IPS हे अक्षर लिहिलेले असते. राज्यातून आलेल्या SP अधिकाऱ्यांच्या खांद्यावर अशोक स्तंभ आणि एक स्टार असते.

SP बनण्याची प्रक्रिया – Process to become SP Officer

SP हे पद वेगवेगळ्या दोन पद्धती मधून मिळविता येते. राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर वेगवेगळ्या परीक्षा यासाठी होत असतात.

  • केंद्र स्तरावर SP होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC मार्फत घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. लेखी पूर्व, मुख्य, मुलाखत या तीन स्तरांमधून पुढे गेल्यानंतर तुम्हाला मेरिट अनुसार IPS अधिकारी पद दिले जाते. IPS अधिकारी हे सर्वात आधी DSP किंवा ACP या पदांवर रुजू केले जातात. काही काळानंतर अनुभव आल्यानंतर त्यांना SP या पदावर रुजू केले जाते.
  • महाराष्ट्र राज्यात घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षेच्या मार्फत देखील SP अधिकारी बनता येते. यासाठी MPSC मार्फत होणारी गट अ परीक्षा पूर्व, मुख्य आणि मुलाखत पास व्हावी लागते. त्यानंतर उमेदवाराला DYSP पदावर रुजू केले जाते. काही अनुभवानंतर त्याला पदोन्नती देऊन SP हे पद देखील दिले जाते.

या दोन पद्धती शिवाय आणखी एक मार्ग आहे ज्याने तुम्हाला SP बनता येऊ शकते. पोलीस भरती मधून जर भरती झाला असला तर त्यामधून चांगल्या कार्यातून पदोन्नती होऊन SP म्हणजेच पोलीस अधीक्षक पदापर्यंत जाता येते.

SP होण्यासाठी पात्रता निकष – Eligibility Criteria to Become SP

SP अधिकारी होण्यासाठी खालील पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे असतात.

  • SP अधिकारी होण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे असते.
  • भारतीय नागरिकत्व असणे अनिवार्य आहे.
  • मागासवर्गीय जाती जमाती मधून असाल तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असावे.
  • इयत्ता बारावी मध्ये 60% हुन अधिक गुण असावेत.
  • वर सांगितलेल्या पर्यायांपैकी जो पर्याय मान्य असेल त्यानुसार UPSC, MPSC किंवा पोलीस भरती साठी परीक्षा द्याव्यात.

SP अधिकाऱ्यांची कार्ये – Functions of SP

  • SP अधिकारी हा त्याचा जिल्हा आणि जिल्हा छोटा असेल तर शेजारील काही भागामध्ये पोलीस दलाचे नेतृत्व करत असतो.
  • पोलीस दल आणि जनतेतील संपर्क प्रस्थापित करणे आणि त्यांच्यातील सद्भावना निर्माण करणे.
  • SP ज्या क्षेत्रात कार्य करत असतो तेथील इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जनसंपर्क प्रस्थापित करणे.
  • SP अधिकारी त्याच्या हाताखाली असलेल्या टीम मध्ये अनुशासन ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.
  • कार्य क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्य करणे.
  • महत्वाच्या गुन्ह्यांमध्ये SP अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना आणि सल्ला देतात.
  • टीम मधील अधिकारी आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिथल्या कार्याचा आढावा घेणे.
  • हाताखाली कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि इमानदारी साठी पुरस्कार करणे.

राजकारणातील SP चे Full Form

राजकारणात SP शब्दाचे खालील फुल फॉर्म होतात.

  • Samajwadi Party – समाजवादी पार्टी हा उत्तरप्रदेश राज्यातील मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली चालणारी एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे.
  • Solidarity Party – सॉलिडेटरी पार्टी ही अमेरिकेतील एक राजकीय पार्टी आहे.

SP कॉलेज – SP College

पुण्यातील SP म्हणजे सर परशुराम भाऊ कॉलेज हे एक प्रसिद्ध कॉलेज आहे. 1916 साली स्थापना झालेले हे SP कॉलेज सुरुवातीच्या काळात न्यू पुना कॉलेज म्हणून ओळखले जात होते. पुण्यातील सदाशिव पेठेत टिळक रोड वर हे कॉलेज आहे. शिक्षण प्रसारक मंडळ पुणे यांच्या अंतर्गत हे SP कॉलेज सुरू असून कॉलेजला NAAC चे A+ मानांकन प्राप्त आहे.

FAQ

SP आणि DSP पैकी उच्च दर्जाचा अधिकारी कोण असतो?

SP म्हणजे पोलीस निरीक्षक तर DSP म्हणजे पोलीस उपनिरीक्षक होय. यावरून आपल्याला लक्षात येते की SP हा अधिकारी उच्च दर्जाचा असतो.

तंत्रज्ञान क्षेत्रात SP शब्दाचा Full Form काय आहे?

तंत्रज्ञान क्षेत्रात SP शब्दाचा Full Form हा Security Processor असा होतो.

शिक्षण क्षेत्रात SP म्हणजे काय?

शिक्षण क्षेत्रात आपल्या दाखल्यावर शैक्षणिक प्रगती मध्ये लिहिलेला ग्रेड पैकी एक ग्रेड म्हणजे SP होय. SP म्हणजे Satisfactory Progress (समाधानकारक प्रगती) होय.

राजकारणातील SP हे कोणत्या पक्षाचे नाव आहे?

राजकारणात SP म्हणजे समाजवादी पार्टी होय. उत्तरप्रदेश राज्यातील यादव घरण्याने नेतृत्व केलेला हा एक पक्ष आहे.

SP म्हणजे पोलीस निरीक्षक तर DSP म्हणजे पोलीस उपनिरीक्षक होय. यावरून आपल्याला लक्षात येते की SP हा अधिकारी उच्च दर्जाचा असतो.

Leave a Comment