SOP फुल फॉर्म SOP Full Form In Marathi

SOP Full Form In Marathi कोरोना संकट काळात आपण अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या मुखातून आम्ही या बाबतीत SOP दिल्या आहेत, आमच्या या मंत्रालयाने काही SOP दिल्या आहेत अशा प्रकारे नक्कीच ऐकले असेल. आज आपण हे SOP म्हणजे काय, SOP चा फुल फॉर्म काय आहे, SOP ला इतर पर्यायी शब्द, SOP ची आवश्यकता का आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

SOP Full Form In Marathi

SOP फुल फॉर्म SOP Full Form In Marathi

SOP Full Form in Marathi । SOP Long Form in Marathi

SOP शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Standard Operating Procedure (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) आहे. SOP शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा प्रमाणित संचालन प्रक्रिया असे म्हणतात.

SOP म्हणजे काय? What is SOP?

कागदावर असलेली मुद्देसूद सूचना, दिशानिर्देश किंवा मार्गदर्शिकेचा लिखित स्वरूपातील प्रकार म्हणजेच एक मसुदा यालाच आपण SOP म्हणतो. सरकारी कार्यालये किंवा खाजगी नोकरीच्या जागा अशा सर्व ठिकाणी कार्यालयीन कामकाज कसे चालावे, पुढील काही दिवसांसाठी काय कामे आहेत याचा एक लिखित स्वरूपात मुद्देसूद मसुदा बनविला जातो.

यामध्ये मार्गदर्शक सूचना असतात. याच मार्गदर्शक सुचनांना पालन करून पुढील कार्य सुरू असते. त्यामुळे यांना SOP म्हणजेच प्रमाणित संचालन प्रक्रिया असे म्हणतात.

मुख्यतः SOP चे स्वरूप हे मुद्देसूद पायर्या समजावून सांगणारे असते. म्हणजेच यामध्ये एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी पहिल्या पायरी पासून पुढे काय काय करावे याविषयी सर्व माहिती सविस्तरपणे सांगितलेली असते. SOP या एकप्रकारे प्रत्येक कार्य कसे सोपे आणि प्रमाणानुसार होईल यासाठी बनविलेल्या असतात.

SOP बनवण्याचा उद्देश्य हा प्रत्येक कर्मचाऱ्याला मग तो नवीन जरी असेल तरी देखील त्याला सर्व काही समजावे असा असतो. त्यामुळे SOP समजून घेताना जास्त अडचणी देखील येत नाहीत. प्रत्येक मुद्दा हा सविस्तर आणि सुटसुटीत असतो.

SOP मार्गदर्शिका – SOP Guide

SOP हा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी एक प्रकारे मार्गदर्शिका म्हणून कार्यरत असतो. यातून सरकारी किंवा खाजगी कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करणे अगदी सोपे होते. SOP मार्गदर्शिका म्हणजे काय याविषयी जर उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्ही एका कंपनीचे मालक आहात.

सध्या तुमच्या मालकी हक्कावरून आता कंपनी खूप जास्त मोठी झालेली आहे. त्यानुसार तुम्ही सुरुवातीच्या काळापासून एक वेगळा स्टॅंडर्ड सेट करून ठेवलेला आहे. त्या स्टॅंडर्ड ला कायम ठेवणे आणि लोकांच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे तुमचे कार्य आहे तर मग आता तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये लक्ष घालणे शक्य नसते. अशा वेळी कंपनीचे मालक त्यांच्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या संबंधीत काही निर्णय घेत असतात.

आपले उत्पादन कसे असावे किंवा आपण देत असलेली सेवा कशी असावी याविषयी हे प्रमुख काही मार्गदर्शिका बनवत असतात ज्यामध्ये ते उत्पादन बनवत असताना काही चुका तर होणार नाही ना, याविषयी काळजी घेतलेली असते.

उत्पादन बनवत असताना किंवा सेवा देत असताना ज्या मार्गदर्शक सूचना ग्राहकांना दिल्या जातात त्यांना SOP म्हणून व्यावसायिक क्षेत्रात ओळखले जाते.

SOP ची इतर काही नावे – SOP साठी इतर शब्द

लिखित स्वरूपाच्या मसुद्यासाठी SOP हा एकमेव शब्द नाहीये. याशिवाय इतरही अनेक शब्द आहेत ज्यांचा वापर व्यावसायिक क्षेत्रात केला जातो.

WI – Work Instructions : कंपन्यांमध्ये SOP ऐवजी अनेकदा WI म्हणजेच कामाच्या सूचना हा शब्द वापरला जातो. या WI वाचून मग कामगारांना कार्य करावे लागते.

SSOP – Safe Standard Operation Procedure : आपल्याकडे जे काही उत्पादन होणार आहे त्यांच्यातील सुरक्षितता तशीच राहावी आणि काही सुरक्षा अटी पाळल्या जाव्या यासाठी कंपनी SSOP जारी करत असते. SSOP म्हणजे सेफ स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर होय.

PCS – Process Control Standard : SOP हा शब्द जिथे काहीतरी उत्पादन होते आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये वापरला जात नाही. त्याशिवाय PCS हा शब्द अनेकदा वापरला जातो. एखादी प्रक्रिया कुठल्या स्टॅंडर्ड नुसार व्हावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना आणि अटी घातलेल्या असतात त्यांना PCS म्हणतात.

SWS – Standard Work Sheet : SOP प्रमाणे यामध्ये देखील कामाचे स्वरूप सांगितलेले असते. याला स्टॅंडर्ड वर्क शीट म्हणजेच एक प्रमाण कार्य मसुदा असे देखील म्हणतात.

SOP ची आवश्यकता – Need of SOP

SOP हे आपले काम सुलभ करत असते आणि त्यामुळेच आपण SOP बनवत असतो किंवा त्यांचे पालन करत असतो. त्याविषयी सविस्तरपणे समजून घेऊयात.

वेळ आणि पैसा वाचतो

वेळ आणि पैसा कसा वाचतो? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जेव्हा आपल्याकडे SOP तयार असतात तेव्हा आपण आपले कार्य किती वेळात पूर्ण होईल याचा अंदाज बांधू शकत असतो. त्यामुळे अनेकदा आपल्याला पुढील स्टेप काय असेल याविषयी जास्त विचार करण्याची गरज पडत नाही कारम ती समोर असते आणि आपण त्याच्या आधीची स्टेप पुढच्या स्टेपला उपयोगी पडेल अशीच बनवतो.

त्यामुळे पुन्हा मागील स्टेप मध्ये बदल करावा लागेल अशी वेळ येत नाही आणि वेळ वाचतो. सर्व काही आपल्याला SOP नुसार करायचे असल्याने त्यामध्ये चुका फार कमी होतात आणि पैशांची बचत होते.

प्रक्रिया आणि संपर्क सोपा होतो

एखाद्या कंपनीत आपण नवीन म्हणून जॉईन करत असाल तर आपल्याला तिथल्या प्रोडक्शन विषयी जास्त काही माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व काही विस्तृतपणे समजून सांगण्यापेक्षा SOP देणे कधीही सोपे असते.

त्यामुळे आपले विचार त्यांच्यापर्यंत चांगल्या आणि योग्य पद्धतीने पोहोचतात. त्याला कार्य करण्याची प्रक्रिया देखील समजते. त्यामुळे नवीन कर्मचारी असेल तरी आपल्या प्रक्रियेत जास्त बदल किंवा चुका होत नाहीत. 

FAQ

SOP शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?

SOP शब्दाचा फुल फॉर्म हा Standard Operating Procedure (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) असा होतो.

SOP शब्दाचा मराठी फुल फॉर्म काय आहे?

मराठी भाषेत SOP म्हणजे प्रमाणित संचालन प्रक्रिया होय.

कोरोना काळात SOP म्हणजे काय?

कोरोना संकट काळात SOP म्हणजे स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होय आणि या SOP एक कोव्हिड पेशंट एका ठिकानवरून दुसरीकडे नेण्यासाठी सांगण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना होत्या.

Leave a Comment