एस.जी.पी.टी फुल फॉर्म SGPT Full Form In Marathi

SGPT Full Form In Marathi यकृत हे आपल्या शरीरातील महत्वाच्या अवयवापैकी एक अवयव आहे. प्रमाणापेक्षा जास्त अल्कोहोल चे सेवन केल्यानंतर ,हळू हळू आपले यकृत खराब होऊ लागते. आपले जर यकृत खराब झाले तर ,आपल्याला वेगवेगळ्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी आपले यकृत तंदुरुस्त असणे गरजेचे असते. आपले यकृत चांगले राहण्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच आपण आपल्या आहारामध्ये पौष्टिक गोष्टींचा समावेश केला पाहिजे.

SGPT Full Form In Marathi

एस.जी.पी.टी फुल फॉर्म SGPT Full Form In Marathi

आपले यकृत चांगले आहे की नाही हे पाहण्यासाठी एक टेस्ट घेतली जाते. त्या टेस्टला “एस.जी.पी.टी टेस्ट” असे म्हणले जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच एस.जी.पी.टी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामध्ये आपण एस.जी.पी.टी च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एस.जी.पी.टी च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि एस.जी.पी.टी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

एस.जी.पी.टी फुल्ल फॉर्म (SGPT full form)

एस.जी.पी.टी चा फुल्ल फॉर्म हा “सिरम ग्लुटामिक पाईरूविक ट्रांसएमिनेज” असा होतो आणि एस.जी.पी.टी हे एक शरीरातील यकृतात आढळणारे एक द्रव्य असते. एस.जी.पी.टी टेस्ट ही एक रक्त टेस्ट आहे ,जी की आपल्या यकृतातील एस.जी.पी.टी ची संख्या मोजण्यासाठी केली जाते.

निरोगी व्यक्तीच्या यकृतात असणाऱ्या एस.जी.पी.टी ची सामान्य रेंज ही ७ लिटर युनिट ते ५५ लिटर युनिट इतकी असते. जर एका व्यक्तीची एस.जी.पी.टी ची टेस्ट केली आणि त्याच्या शरीरातील एस.जी.पी.टी ची संख्या ५० लिटर युनिट इतकी असेल ,तर तो व्यक्ती निरोगी मानला जातो.

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची कारणे (Reasons for increased amount of SGPT in the body in Marathi)

१) वजन वाढल्यानंतर आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढू शकते.

२) ज्या लोकांना डायबेटिस चा त्रास असतो ,त्या लोकांच्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढू शकते.

३) जे व्यक्ती अल्कोहोल चे अती सेवन करतात ,त्यांच्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढू शकते.

४) हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंट च्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढू शकते.

५) ज्या व्यक्तीच्या पित्ताशयावर सूज आली असेल तर ,त्या व्यक्तीच्या शरीरातील देखील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढू शकते.

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची काही लक्षणे (Some symptoms of increased amount of SGPT in the body in Marathi)

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची लक्षणे ही विविध लोकांमध्ये वेगवेगळी असू शकतात ; परंतु शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

१) अशक्तपणा येणे.

२) धाप लागणे

३) उलट्या होणे

४) सतत थकवा जाणवणे

५) पायांना सूज येणे

६) रक्तस्राव होणे

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची वरील लक्षणे आपल्याला आपल्या शरीरामध्ये जाणवू लागली तर ,आपण त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे. डॉक्टर आपली एस.जी.पी.टी ची टेस्ट घेतील आणि येणाऱ्या रिपोर्ट वरून डॉक्टर आपल्यावर योग्य ते औषध-उपचार करतील.

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना (Measures taken to control the amount of SGPT in the body in Marathi)

१) आपण जितके शक्य तितके कमी मिठाचे सेवन केले पाहिजे ,जेणेकरून आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित राहील.

२) शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी आपण पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. तसेच आपण नियमित विविध प्रकारची फळे खाल्ली पाहिजेत.

३) शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण शक्य तितके जास्त पाण्याचे सेवन केले पाहिजे.

४) आपण जर सतत बाहेरचे अन्न खात असू तर ,आपण बाहेरचे अन्न न खाता शक्य तितके घरचे अन्न खाल्ले पाहिजे.

५) आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच जर आपल्या योगा करता येत असेल तर ,आपण नियमित योगा केला पाहिजे. याव्यतिरिक्त आपण वेळ मिळेल तेव्हा मेडीटेशन देखील केले पाहिजे.

FAQ

एस.जी.पी.टी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एस.जी.पी.टी चा फुल्ल फॉर्म “सिरम ग्लुटामिक पाईरूविक ट्रांसएमिनेज” असा आहे.

एस.जी.पी.टी टेस्ट ही कशाची टेस्ट आहे ?

एस.जी.पी.टी टेस्ट ही एक रक्ताची टेस्ट आहे आणि या एस.जी.पी.टी टेस्ट द्वारे आपल्या शरीरातील यकृत मधील एस.जी.पी.टी चे प्रमाण मोजले जाते.

सामान्य व्यक्तीच्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण हे साधारण किती असते ?

सामान्य व्यक्तीच्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण हे साधारण ५० लिटर युनिट इतके असले पाहिजे.

आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढले तर ,आपल्याला कोणकोणती लक्षणे जाणवू लागतात ?

आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढल्यानंतर आपल्याला थकवा जाणवणे ,उलट्या होणे ,धाप लागणे, पायांना सूज येणे ,रक्तस्राव होणे ,अशक्तपणा येणे ,इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.

शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढल्याची लक्षणे आपल्याला आपल्या शरीरामध्ये आढळली तर ,आपण काय केले पाहिजे ?

आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढल्याची लक्षणे जाणवू लागली तर, आपण त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण एस.जी.पी.टी ची टेस्ट केली पाहिजे आणि आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले पाहिजेत. तसेच आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपण नियमित व्यायाम किंवा योगा केला पाहिजे. याचसोबत आपण आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा ,फळांचा ,डाळींचा समावेश केला पाहिजे.

निष्कर्ष (Conclusion)

आपल्या शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण पाहण्यासाठी एस.जी.पी.टी ची टेस्ट केली जाते. आजच्या लेखामध्ये आपण याच एस.जी.पी.टी टेस्ट विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एस.जी.पी.टी चा फुल्ल फॉर्म ,शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची कारणे, शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण वाढण्याची काही लक्षणे, शरीरातील एस.जी.पी.टी चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, एस.जी.पी.टी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://redcliffelabs.com/myhealth/hindi/liver-test-in-hindi/sgpt-sgot-test-normal-range-its-levels-and-what-do-they-indicate-2/

२)https://www.google.com/amp/s/www.beatoapp.com/hindi-blog/sgpt-test-meaning-in-hindi/amp/

३)https://www.google.com/amp/s/www.onlymyhealth.com/amp/what-is-high-sgpt-level-in-liver-test-know-from-doctor-in-hindi-1696923286

४)https://pharmeasy.in/blog/sgpt-test-in-hindi/

५)https://www.onlymyhealth.com/what-is-high-sgpt-level-in-liver-test-know-from-doctor-in-hindi-1696923286

Leave a Comment