एसईबीसी फुल फॉर्म SEBC Full Form In Marathi

SEBC Full Form In Marathi मराठा आरक्षण हा काही काळापूर्वी खूप जास्त चर्चेत असलेला प्रश्न होता मात्र काही काळानंतर सुप्रीम कोर्टाच्या समोर मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर उभे राहू शकले नाही आणि लागू झालेले मराठा आरक्षण पुन्हा रद्द करण्यात आले.

SEBC Full Form In Marathi

एसईबीसी फुल फॉर्म SEBC Full Form In Marathi

भारतात अनेक जातींना आणि संवर्गाना आरक्षण देण्याची एक पद्धत सुरू झालेली असून सध्या त्यामध्ये बदल करण्याचे गरज आहेत मात्र ते होत नाहीत. त्यातील एक पाऊल म्हणजे मराठा आरक्षण म्हणजेच SEBC हा नवीन बनविलेला प्रवर्ग होय.

आज आपण SEBC चा Full Form in Marathi, SEBC म्हणजे काय, SEBC रद्द का झाले, SEBC वरील पर्यायी आरक्षण प्रवर्ग आणि SEBC विषयी इतर माहिती देखील जाणून घेणार आहोत.

SEBC Full Form in Marathi – SEBC Long Form in Marathi

SEBC हा एक OBC, SC, ST सारखा प्रवर्ग बनविण्यात आला होता. या प्रवर्गात मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण दिले जाणार होते. काही काळ हे आरक्षण देखील दिले गेले.

SEBC शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Specially and Educationally Backward Class असा होतो. SEBC शब्दाचा मराठी भाषेत Full Form (अर्थ) हा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग असा आहे.

SEBC म्हणजे काय? – What is SEBC in Marathi?

मराठा आरक्षण हा ज्वलंत असा आरक्षणाचा प्रश्न काही काळापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून रद्द करून थांबविण्यात आला मात्र तरी देखील आजही यासाठी संघर्ष सुरू आहेत. SEBC हा सरकारने बनविलेला एक नवीन प्रवर्ग आहे. याआधी OBC हा प्रवर्ग बनवून त्यांना आरक्षण देण्यात आले होते त्याच प्रमाणे मराठा आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला SEBC या प्रवर्गात टाकण्यात आले.

SEBC हा प्रवर्ग आणि मराठा आरक्षण हे फक्त शैक्षणिक दृष्टया वैध ठरविण्यात आले होते. त्यामुळे SEBC हा प्रवर्ग OBC प्रवर्गाप्रमाणे इतर ठिकाणी आरक्षण देत नव्हता.

मराठा आरक्षण काही काळ टिकले आणि सरकारने त्यासाठी SEBC प्रमानपत्र देखील द्यायला सुरुवात केली होती. SEBC प्रवर्गातील व्यक्तींना इतर EWS सारख्या प्रवर्गातून प्रवेश मिळणे तेव्हा बंद झाले.

SEBC आरक्षण रद्द

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला हे आरक्षण देण्याचा अधिकार नाही किंवा हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे जाहीर करून तात्काळ मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र तरी देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र येऊन हे आरक्षण अजूनही पुन्हा देऊ शकते.

राज्यघटनेत SEBC हा उल्लेख आधीपासूनच झालेला आहे त्यामुळे असा एखादा प्रवर्ग असणे चुकीचे नाही मात्र जुन्या आरक्षणाला धक्का न लावता त्याच टक्केवारीत हे मराठा आरक्षण कसे बसविता येईल याविषयी अजूनही स्पष्टता नाहीये. घटनेनुसार एखादा समाज जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टया मागास असेल तर त्यासाठी कलम 16(1) अनुसार आरक्षण जाहीर करता येण्याचा अधिकार हा राज्यसरकारला आहे.

SEBC वरील पर्यायी आरक्षण वर्ग

SEBC म्हणजेच सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवॉर्ड क्लास होय. याविषयी आपण आधीच माहिती जाणून घेतली आहे. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार SEBC आरक्षण घटनाबाह्य ठरविण्यात आल्यानंतर SEBC समाजासमोर सर्वात मोठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा उभा आहे. तूर्तास तरी यामध्ये काही होणे शक्य नाही असे सरकारने सांगितले असून सरकारने या विषयाला एक पर्याय सुचविला आहे.

सरकारने काढलेल्या जीआर अनुसार मराठा समाजाला आता SEBC आरक्षण नसले तरी देखील त्यांना EWS प्रवर्गात समाविष्ट करण्यात येईल. EWS प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण आधी पासून आहे. मात्र SEBC आल्यानंतर यामधून मराठा समाजाला किंवा इतर कोणत्याही प्रवर्गाचा लाभ घेणाऱ्याला EWS प्रवर्गाचा लाभ मिळत नसे. आता मात्र सरकारने तसे पण मराठा आरक्षण रद्द झालेले आहे हे बघून पुन्हा जुने EWS आरक्षण मराठा समाजासाठी खुले केले आहे.

EWS म्हणजे काय? What is EWS in Marathi?

EWS हा देखील OBC सारखा प्रवर्ग आहे. केंद्र सरकारने या प्रवर्गाची निर्मिती केली आणि त्यानुसार आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये काही टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या.

EWS शब्दाचा FULL FORM हा Economically Weaker Sections असा होतो. EWS प्रमाणपत्र हे दरवर्षी नवीन काढावे लागत असते आणि त्यासाठी अनेक निकष आहेत.

EWS प्रमाणपत्रासाठी पात्रता निकष – Eligibility for EWS Certificate in Marathi

  • कुटुंबाचे एकूण मागील आणि चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांच्या वर नसावे. आई वडील यांच्या उत्पन्नाचा यात समावेश होतो.
  • EWS प्रमानपत्रासाठी शेतीची अट देखील आहे. त्या कुटुंबाकडे एकूण शेती ही 5 एकर पेक्षा जास्त नसावी. त्यासाठी तुम्हाला तुमचा 7/12 उतारा देखील काढावा लागतो.
  • भारत देशाचा रहिवासी असल्याच नॅशनलिटी प्रमाणपत्र काढावे.
  • रेशन कार्ड वर तुमचे म्हणजे ज्याला प्रमाणपत्र हवे आहे त्याचे नाव असावे.
  • कुटुंबातील सदस्य संख्या म्हणजेच पाल्यांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी.
  • कोणत्याही इतर प्रवर्गाचा लाभ त्या व्यक्तीने घेतलेला नसावा.

EWS प्रवर्गासाठी मिळणाऱ्या सवलती

  • EWS हे आरक्षण फक्त त्याच जातीच्या लोकांसाठी वैध आहे ज्यांच्या जातींचा समावेश हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 मध्ये समावेश नाही.
  • EWS प्रवर्गासाठी 10% जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. या जागा संपूर्ण देशभरात राखीव आहेत.
  • शिक्षण क्षेत्रात विद्यापीठ, स्वायत्त विद्यापीठ आणि त्या सोबत सर्व महाविद्यालये, विद्यालय, अनुदानित आणि विना अनुदानित शैक्षणिक संस्था या सर्व ठिकाणी EWS हे आरक्षण लागू असते.
  • MPSC आणि UPSC सारख्या सरळसेवा भरती मध्ये सर्व ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय आस्थापनामध्ये EWS हे आरक्षण लागू असते.
  • सर्व ठिकाणी हे आरक्षण 10% असून त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी पुन्हा नूतनीकरण केलेले EWS प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

FAQ

SEBC प्रवर्गाला म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण घटनेतील कोणत्या कलमानुसार भेटले होते?

राज्यघटनेच्या कलम 15.4 आणि 16.4 मध्ये असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार SEBC हे आरक्षण मराठा समाजाला मिळाले होते.

SEBC प्रवर्गाला एकूण किती टक्के आरक्षण होते?

SEBC म्हणजेच मराठा समाजाला एकूण 16% शैक्षणिक आरक्षण देण्यात आले होते.

SEBC प्रवर्गाने मराठा आरक्षणासाठी दिलेल्या लढ्यातील आंदोलनाचे नाव काय होते?

SEBC प्रवर्गाने मराठा आरक्षणासाठी आणि कोपर्डी घटनेतील ताईला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती मुकमोर्चा या मूक चळवळीने लढ्याला सुरुवात केली होती.

SEBC प्रवर्गासाठी आरक्षण म्हणून कोणता पर्याय उपलब्ध आहे?

SEBC आरक्षण रद्द झालेले असले तरी देखील आता SEBC प्रवर्गासमोर EWS मधून 10% आरक्षणाचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Leave a Comment