आरपीएम फुल फॉर्म RPM Full Form In Marathi

RPM Full Form In Marathi आपल्या वाहनांच्या मीटर वर किंवा जर आपण एखादी मोटार असलेली वस्तू विकत घेत असलो तरी आपल्याला त्यावर RPM ही संकल्पना नक्कीच बघायला मिळते. आज आपण RPM म्हणजे काय, RPM चा फुल फॉर्म काय आहे, RPM आणि स्पीड यामध्ये काय संबंध असतात, RPM चे इतर काही Full Form जाणून घेणार आहोत.

RPM Full Form In Marathi

आरपीएम फुल फॉर्म RPM Full Form In Marathi

RPM Full Form in Marathi । RPM Long Form in Marathi

भौतिकशास्त्र विषय इयत्ता अकरावी आणि बारावी मध्ये शिकत असताना आपल्याला नक्कीच RPM हा शब्द कानावर पडला असेल. कानावर पडला असेल म्हणण्यापेक्षा आपण त्याचा अभ्यास देखील केला असेल मात्र आपण केलेला अभ्यास आणि नक्की RPM चा जीवनातील वापर हे आपण समजून घ्याल हवे.

RPM शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Revolution Per Minute (रिव्हॉल्युशन पर मिनिट) असा होतो. RPM शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा प्रति मिनिट क्रांती असा होतो.

RPM म्हणजे काय? – What is RPM in Marathi?

RPM म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजेच प्रति मिनिट क्रांती होय. हे थोडंस वैज्ञानिक झालं असले तरी देखील सोप्या भाषेत समजून सांगायचे झाल्यास हे एखाद्या वस्तूच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या गतीविषयी मापणाचे एक एकक आहे. उदाहरण म्हणजे आपल्या गाडीचे चाक तिच्या ऍक्सिस भोवती फिरते. तर हे चाक त्या अक्षाभोवती एक मिनिट कालावधी मध्ये किती वेळा फिरते त्याचा आकडा म्हणजे त्या चाकाचा RPM होय.

एखाद्या वस्तूच्या सरळ गतीचा वेग आणि अंतर हे आपण वेगाच्या एककात आणि अंतराच्या एककात मोजत असतो. त्याचप्रमाणे एखादया वस्तूची चक्रीय गती मोजण्यासाठी आपल्याकडे RPM हे एकमेव एकक आहे.

आपण जर जुन्या काळातील DVD किंवा CD प्लेअर बघितला असेल तर तिथे तुम्हाला हा ऍक्सिस आणि त्या सीडी किंवा डीव्हीडी चा भाग हा एका ठिकाणी स्थिर दिसेल. म्हणजे इथे देखील तुमचा ऍक्सिस हा उभा असेल आणि त्या CD किंवा DVD च्या फिरण्याची गती ही RPM मध्ये मोजली जाईल.

गाडीमध्ये RPM कसे मोजतात? How to Calculate RPM in Cars Tyres?

सीडी किंवा डीव्हीडी सारख्या गोष्टी एका जागेवर स्थिर आहेत आणि त्यामुळे त्यांचे RPM मोजणे सोपे असते मात्र जे वाहन चालू आहे त्याच्या चाकाचा RPM आपण कसा मोजणार? हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल. मशिनचा RPM हा तुमच्या गाडीच्या चाकाचा RPM नसतो त्यामुळे तुमचे उत्तर हेच असेल तर ते चुकीचे आहे.

गाडीच्या चाकाच्या ऍक्सिस जवळ टॅंकोमीटर (Tachometer) हे एक यंत्र बसविलेले असते. याच Tachometer च्या साहाय्याने गाडीच्या चाकाचा RPM हा गाडी एका जागेवरून दुसरीकडे पुढे जात असताना देखील चेक केला जाऊ शकतो.

RPM आणि स्पीड यामधील संबंध

आपल्याला एक गाडीच्या उदाहरणातून RPM विषयी ही गोष्ट कळली असेल की RPM हे एकक चक्राकार गती मापन करण्यासाठी उपयुक्त ठरते. जर आपल्याला आपल्या गाडीचा स्पीड म्हणजेच वेग काढायचा असेल तर आपण एका तासात किती किलोमीटर तुमची गाडी जाते हे बघतो.

वेग = अंतर / वेळ

आपले अंतर आणि वेळ यानुसार वेगाचे एकक हे किमी/ तास (ताशी किलोमीटर) किंवा मी/सेकंद हे असते. आता RPM म्हणजे रिव्हॉल्युशन प्रति मिनिट होय. गाडीचे चाक देखील चक्राकार गती पाळते.

जर आपली गाडी जास्त वेगाने पुढे जावी अस वाटत असेल तर आपण आपल्या गाडीच्या एक्सलरेटर वर पाय देऊन तिला पुढे नेत असतो. याचाच अर्थ आपण आपल्या गाडीच्या इंजिनचा RPM हा वाढवत असतो आणि परिणामतः त्यामुळे गाडीच्या चाकाचा देखील RPM वाढतो.

त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की RPM ही गोष्ट आपल्या गाडीच्या वेगाशी सरळ संबंधित आहे. म्हणजे RPM जास्त दिला की गाडीला वेग वाढतो आणि RPM कमी मिळाला तर गाडीचा वेग देखील कमी होतो.

मोठ्या गाड्यांमध्ये म्हणजे सध्याच्या चारचाकी गाड्यांमध्ये हे RPM मीटर समोर दिलेले असते. यावरून आपल्याला आपल्या गाडीच्या RPM चा अंदाज येतो. हे RPM तुम्हाला Tachometer च्या सहाय्याने दिसते मात्र यामध्ये प्रति 1000 नुसार समोर आकडेवारी असते. म्हणजे जर 20 दिसत असेल तर त्याचा अर्थ हा 20000 RPM इतका होतो. गाडीच्या मॉडेलनुसार आणि कंपनी नुसार यामध्ये बदल असू शकतात.

संगणकातील RPM – RPM in Computer

आपण हार्ड डिस्क नवीन घेत असताना त्याचा RPM कधी बघत नसतो मात्र जेवहा कधी आपण हार्ड डिस्क खरेदी करतो तेव्हा तिचा RPM नक्की बघून घ्यावा. कारण हार्ड डिस्कचा RPM जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने त्यांच्यावरील पार्ट्सची हालचाल होईल आणि आपल्याला चांगला अनुभव भेटेल. सध्या येत असलेल्या हार्ड डिस्क मध्ये वेगवान हालचाली होतात कारण त्याचा RPM हा जास्त असतो.

RPM चे इतर काही Full Form

  •  Racing Performance Machine
  •  Radial Pressure Management
  • Rails Performance Management
  •  Rate Per Minute
  •  Raw Power Moves
  •  Real Audio Plugin
  •  Reality Performance Management
  •  Redhat Package Management
  •  Repair Performance Maintenance
  •  Requests Per Minute
  •  Rotation Per Minute
  •  Rounds led Minute

FAQ

RPM म्हणजे काय?

RPM म्हणजे Revolutions Per Minute होय. मराठी मध्ये RPM म्हणजे प्रति मिनिट क्रांती होय.

स्पीड आणि RPM मधीक फरक काय आहे?

स्पीड हे लिनीअर म्हणजेच समांतर कापलेले अंतर आणि त्यासाठी लागलेला वेळ याचे गुणोत्तर आहे तर RPM हे चक्राकार विस्थापन मोजण्याचे एक एकक आहे.

एखाद्या मोटारचा RPM कसा काढतात?

मोटारचा RPM काढण्यासाठी चाकाचे किंवा वस्तूचे तिच्या ऍक्सिस भोवती गोलाकार भ्रमण एका मिनिटांसाठी मोजावे. हे मिळणारे एकक तुमचे RPM असेल.

12 व्होल्ट डिसी मोटारीचा RPM किती असतो?

आपल्या खेळण्यांमध्ये वापरल्या जाणारी 12 व्होल्ट डिसी मोटारचा RPM हा 8600 RPM असतो.

Leave a Comment