आर.ए.एस फुल फॉर्म RAS Full Form In Marathi

RAS Full Form In Marathi दरवर्षी राजस्थान मधील बरेच विद्यार्थी आर.ए.एस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत घेतात ; परंतु त्यातील काहीच विद्यार्थी आर.ए.एस अधिकारी बनतात. आजच्या लेखामध्ये आपण याच आर.ए.एस अधिकाऱ्यांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण आर.ए.एस च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयी आणि आर.ए.एस पदाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

RAS Full Form In Marathi

आर.ए.एस फुल फॉर्म RAS Full Form In Marathi

आर.ए.एस फुल्ल फॉर्म (RAS full form)

आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म “राजस्थान एडमिनेस्त्रेटिव सर्व्हिस असा” होतो. मराठी भाषेमध्ये आर.ए.एस अधिकाऱ्यांना “राजस्थान प्रशासनिक सेवा अधिकारी” असे म्हणले जाते.

राजस्थान प्रशासनिक सेवा म्हणजे आर.ए.एस मध्ये बरीच पदे येतात आणि या पदातील अधिकाऱ्यांची नियुक्ती राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे राजस्थान राज्यामधील विविध ठिकाणी केली जाते. तसेच ज्या ठिकाणी आपण सर्व्हिस करत आहोत ,त्या ठिकाणामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आर.ए.एस अधिकाऱ्यांवर असते.

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for becoming RAS officer in Marathi)

१) आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवार हा भारत देशाचा नागरिक असणे गरजेचे असते.

२) आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. ज्या उमेदवाराचे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले नाही ,तो उमेदवार आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी अपात्र ठरतो.

३) आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही २१ वर्षे ते ३५ वर्षाच्या दरम्यान असली पाहिजे.

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप (Exam pattern for becoming RAS officer in Marathi)

“राजस्थान प्रशासनिक सेवा अधिकारी” म्हणजे “आर.ए.एस अधिकारी” बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ही तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते आणि हे तीन चरण खालीलप्रमाणे आहेत :

१) प्राथमिक परीक्षा – आर.ए.एस परीक्षेचे पाहिले चरण म्हणजे “प्राथमिक परीक्षा”. राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी प्राथमिक परीक्षेचे आयोजन केले जाते. प्राथमिक परीक्षा ही एकूण २०० गुणांची असते आणि या प्राथमिक परीक्षेमध्ये एकूण १५० प्रश्न असतात. तसेच या प्राथमिक परीक्षेचा कालावधी हा ३ तासांचा असतो.

२) मुख्य परीक्षा – राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे “मुख्य परीक्षा”. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते. मुख्य परीक्षेमध्ये एकूण ४ पेपर असतात आणि हे ४ पेपर प्रत्येकी २०० गुणांचे असतात. मुख्य परीक्षा ही चारही पेपर मिळून ८०० गुणांची असते. तसेच मुख्य परीक्षेच्या प्रत्येक पेपरचा कालावधी हा ३ तासांचा असतो.

३) मुलाखत राऊंड – राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे शेवटचे चरण म्हणजे “मुलाखत राऊंड”. जे उमेदवार प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड मुलाखत राऊंड साठी केली जाते. मुलाखत राऊंड मध्ये उमेदवाराला विविध प्रश्न विचारले जातात.

जे उमेदवार वरील तीन चरण म्हणजे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड उत्तीर्ण करतात ,त्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते आणि राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे उत्तीर्ण उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण उमेदवारांची निवड विविध पदांसाठी केली जाते.

आर.ए.एस चे इतर काही फुल्ल फॉर्म (Other full forms of RAS in Marathi)

१) कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म हा “रिसोर्स अलोकेशन सिस्टीम” असा होतो.

२) आपण जेव्हा कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जातो ,तेव्हा तिथे येणाऱ्या आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म हा “रजिस्ट्रेशन ऍडमिशन आणि स्टेटस” असा होतो.

३) जर तुम्ही डेटाबेस वरती काम करत असाल तर ,तिथे वापरल्या जाणाऱ्या आर.ए.एस शब्दाचा फुल्ल फॉर्म हा “रेकॉर्ड असोसियेशन सिस्टीम” असा होतो.

FAQ

आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म काय होतो ? आणि आर.ए.एस अधिकाऱ्यांना मराठी भाषेमध्ये काय म्हणले जाते ?

आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म हा “राजस्थान एडमिनेस्त्रेटिव सर्व्हिस असा” होतो आणि मराठी भाषेमध्ये आर.ए.एस अधिकाऱ्यांना “राजस्थान प्रशासनिक सेवा अधिकारी” असे म्हणले जाते.

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा कोणाद्वारे आयोजित केली जाते ?

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा “राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे” आयोजित केली जाते.

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी पात्रता निकष काय असते ?

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी सर्वप्रथम उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. याचसोबत आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी असणारी आयुसीमा ही २१ वर्ष ते ३५ वर्ष इतकी असते.

आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप काय असते ?

राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी दरवर्षी परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते. या तीन चरणांमध्ये प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड या चरणांचा समावेश असतो.

मी माझे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण कला शाखेतून पूर्ण केले आहे ,तर मी “राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारे” आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी पात्र आहे का ?

हो ,तुम्ही आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा देऊ शकता. आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराचे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

आर.ए.एस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?

आर.ए.एस अधिकाऱ्यांचा सुरवातीचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत आर.ए.एस अधिकाऱ्यांचा मासिक पगार हा २,०८,७०० रुपये इतका होतो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण आर.ए.एस विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आर.ए.एस चा फुल्ल फॉर्म काय आहे ? ,आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी असणारी निकष पात्रता, आर.ए.एस अधिकारी बनण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप, आर.ए.एस चे इतर काही फुल्ल फॉर्म, आर.ए.एस अधिकाऱ्यांविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE

२)https://gyannagari.com/ras-full-form-hindi/

३)https://www-pw-live.translate.goog/full-form/ras-full-form?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

४)https://www.wizr.in/hi/articles-hindi/ras-full-form-in-hindi

५)https://www.adda247.com/upsc-exam/rpsc-ras-salary/

Leave a Comment