पीएसआय फुल फॉर्म PSI Full Form In Marathi

PSI Full Form In Marathi आजच्या लेखात आपण PSI चा पूर्ण अर्थ म्हणजेच full form जाणून घेणार आहोत. PSI होण्यास कोणती पात्रता आवश्यक आहेत. PSI म्हणजे काय असते तसेच PSI ची कर्तव्ये कोणती असते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

PSI Full Form In Marathi

पीएसआय फुल फॉर्म PSI Full Form In Marathi

PSI म्हणजे काय? (What Is PSI In Marathi)

PSI म्हटलं की आपल्यापुढे खाकी वर्दीतील कडक अस, हातात पोलिसाची लाठी असलेला माणूस उभा राहतो. एक पोलिस चौकी उभी राहते. PSI ya शब्दातच रुबाब वाटतो आणि आतापर्यंत हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल. आपल्याला या शब्दाबद्दल कुठलाही वाटले असेल. काहींनी तर PSI नावाचा रुबाब बघूनच तसे काहीतरी बनावे असे स्वप्नही बघितले असेल. तर तुमचे कुतूहल बरोबर आहे आणि म्हणूनच आपण या लेखात जाणून घेणार आहोत की PSI mhnje नेमकं आहे तरी काय?

PSI Full Form in Marathi – PSI Long Form in Marathi

खरंतर PSI चा full form हा police sub-inspector असा आहे. त्याला मराठीमध्ये पोलिस उपनिरीक्षक असे म्हणतात. भारतातली पोलिस शाखेतील हा एक पोलिस दर्जा आहे.

भारतीय पोलिसांच्या नियमांनुसार, PSI हा पोलिस खात्यातील तपास अधिकारी आहे. PSI कडे खूप सारे अधिकार दिले असतात. जसे की पोलिस खात्यामध्ये PSI ला कोणत्याही न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी आहे. PSI chi निवड ही भरतीने केली जाते. त्यासाठी एक परीक्षा असते. त्याविषयी आपण लेखात खाली जाणून घेणार आहोत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन (SSC CPO) द्वारे घेतलेल्या परीक्षेत पात्रता मिळवून PSI ची सेवेत भरती केली जाते. उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून नियुक्त केले जाते आणि काही वर्षांच्या सेवेनंतर PSI म्हणून पदोन्नती दिली जाते.

PSI चे काम काय असते?

आता तुम्ही विचार करत असाल PSI चे काम काय असतं?

खरंतर PSI हा एक अधिकारी असल्यामुळे त्यावर जबाबदाऱ्या असतात. त्याचे कामही जोखमीचे असते. त्यावर वेगवेगळ्या जबाबदारी दिलेली असते. प्रामुख्याने त्याचे काम कायदा वा सुव्यवस्था बघायचे असते. तिथल्या विभागातील सुरक्षा नियंत्रित ठेवायचे काम त्याच्याकडे असते.

PSI हा पोलिस स्टेशन किंवा वेगवेगळ्या कमांडिंग चौक्यांचा प्रभारी असतो किंवा कोणतीही केस सोडवताना त्याच्या वरिष्ठांना मदत करतो. तो इतर खालच्या दर्जाच्या कर्मचार्‍यांना जसे की कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल इ. मार्गदर्शन करत असतो.

पोलीस संघटनांव्यतिरिक्त, PSI ची मोटार वाहतूक सारख्या इतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांमध्ये देखील भरती केली जाते. बीएसएफ, सीआयएसएफ, सीबीआय, आयटीबीपी आणि सीआरपीएफ सारख्या अनेक निमलष्करी दलांकडेही हे पद आहे.

PSI कसे बनावे? –

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा मोठा हुद्दा आहे तर हा मिळवायचा कसा? थोडक्यात PSI बनायचे कसे? तर काहीही काळजी करू नका. आपण या लेखात PSI कसे बनावे हे पूर्णपणे जाणून घेऊया.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की PSI बनण्यासाठी पात्रता काय असावी.

PSI बनण्याची पात्रता –

PSI बनण्यासाठी भारतातली सर्व राज्यात, भरती संस्थांमध्ये पात्रता काही निकष हे समान आहेत तर काही वेगळे आहेत.
PSI बनण्याचे पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.

⦁ नागरिकत्व: भारतीय पोलीस विभागात उपनिरीक्षक म्हणून म्हणजेच PSI करण्यासाठी, तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.

⦁ शैक्षणिक पात्रता: पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी, एखाद्याने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान ५०% गुणांसह कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे.

⦁ शारीरिक मोजमाप: पोलिस विभागात उपनिरीक्षक पदासाठी विचारात घेण्यासाठी, उमेदवारांची उंची 170 सेमी आणि छातीचे माप 80-85 सेमी असणे आवश्यक आहे.

तुम्ही ज्या भरती मंडळासाठी अर्ज करत आहात त्यानुसार वरील पात्रता निकष बदलतील. तसेच, राज्यानुसार, उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार वयात सूट दिली जाईल. PSI होण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही 12 वी पास होणे आवश्यक आहे आणि त्यांनतर कोणत्याही शाखेतून एखाद्या विषयात पदवी मिळवणे आवश्यक आहे.

हि पात्रता झाली. आपण आता जाणून घेऊया की PSI बनण्यासाठी काय करावे लागते.

PSI बनण्यासाठी काय करायचे असते?

PSI बनण्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक राज्यामध्ये ही परीक्षा वेगळी आहे. महाराष्ट्र मध्ये PSI म्हणजेच बनण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) अर्ज करावा लागेल. त्यांनतर MPSC ही परीक्षा द्यावी लागेल.

MPSC देण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे.

पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वय : 28 वर्षांपर्यंत (आरक्षित श्रेणीसाठी 32 वर्षांपर्यंतच्या वयात सूट)
परीक्षेचा नमुना : प्राथमिक आणि मुख्य परीक्षा घेतल्या जातात. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
प्रशिक्षण : यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे 11 महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.

PSI चा पगार किती असतो?

PSI झाल्यावर साधारण वेतन म्हणजे पगार हा 38,600 रू. ते 1,22,800 रू. इतका असू शकतो.

PSI चे अजून काही अर्थ –

PSI चा फक्त एकच अर्थ नसून अजूनही दोन अर्थ आहे. त्या दोन्ही अर्थांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. PSI चा अजून एक अर्थ म्हणजे pounds per square inch असा आहे.

Pound per square inch म्हणजे पाउंड प्रति चौरस इंच.

1PSI चे मूल्य = दाब जे 1 चौरस इंच क्षेत्रावर 1 पौंड बल लागू केल्यावर तयार होते. 1PSI=1lb(पाउंड)/1इंच चौरस.
प्रेशर मध्ये PSI फुल फॉर्म आहे “पाऊंड प्रति स्क्वेअर इंच” आहे, दबावाच्या युनिटच्या बाबतीत,
द्रव दाब मापनात, PSI चा वापर सामान्यतः वातावरणाशी संबंधित असतो.

2. लोकसंख्या सेवा आंतरराष्ट्रीय

PSI चे इतर पूर्ण रूप म्हणजे पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल

दुसरा PSI पूर्ण फॉर्म पॉप्युलेशन सर्व्हिसेस इंटरनॅशनल आहे. ही एक आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था आहे ज्याची स्थापना विकसनशील देशांमधील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी करण्यात आली आहे.

हे लोकांना कुटुंब नियोजनाच्या फायद्यांबद्दल शिक्षण देते आणि एचआयव्ही, मलेरिया, अतिसार, न्यूमोनिया आणि कुपोषण यांसारख्या गंभीर आजारांसाठी वैद्यकीय सुविधा आणि जीवनरक्षक औषधे देते.

या संस्थेचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन, डी.सी. येथे आहे. ते जगभरातील 60 हून अधिक देशांमध्ये विस्तारलेले आहे आणि सुमारे 9,000 कर्मचारी सदस्य आहेत.

याप्रकारे या लेखात आपण जाणून घेतले की PSI full form,PSI म्हणजे काय, PSI che वेगवेगळे अर्थ, आणि PSI म्हणजे पोलिस पनिरीक्षक कसे बनावे हे सर्व जाणून घेतले आहे.

FAQs – Frequently Asked Questions

PSI चे पूर्ण नाव काय आहे?

पोलिसांमध्ये PSI म्हणजे पोलिस उपनिरीक्षक. PSI हा सर्वात खालचा दर्जाचा अधिकारी आहे जो भारतीय पोलिस नियम आणि नियमांनुसार न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतो.

पोलिसात पीएसआय आणि एसआय सारखेच आहेत का?

पीएसआय हे दैनंदिन प्रकरणात वरिष्ठांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेले पद आहे. पोलीस उपनिरीक्षक हे निम्न दर्जाचे कर्मचारी आहेत जे कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल इत्यादींना सूचना देऊ शकतात.

Leave a Comment