PSC Full Form In Marathi सरकारी नोकरी मिळवणे हे बऱ्याच मुलांचे स्वप्न असते. सरकारी नोकरी मध्ये मिळणारी सुरक्षितता ,आकर्षक पगार ,सरकार कडून मिळणाऱ्या सवलती ,इत्यादी गोष्टींकडे काही मुले आकर्षित होतात ; परंतु काही मुलांचे सरकारी नोकरी मिळवून लोकांची सेवा करणे ,हे ध्येय असते.
पी.एस.सी फुल फॉर्म PSC Full Form In Marathi
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुले दिवसरात्र मेहनत घेतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका सरकारी नोकरी मिळणाऱ्या एका परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पी.एस.सी परीक्षे विषयी आणि पी.एस.सी च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
पी.एस.सी फुल्ल फॉर्म (PSC full form)
पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म “पब्लिक सर्व्हिस कमीशन” असा होतो आणि मराठी भाषेमध्ये पी.एस.सी ला “लोकसेवा आयोग” असे म्हणले जाते. पी.एस.सी ची परीक्षा ही राज्यस्तरीय परीक्षा आहे आणि विविध राज्यांमध्ये पी.एस.सी ची परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड राज्यामध्ये विविध ठिकाणी केली जाते. पी.एस.सी परीक्षेसाठी विविध राज्यांचे वेगवेगळे नियम असतात. एमपीएससी हे पी.एस.सी चे एक उदाहरण आहे.
पी.एस.सी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for PSC exam in Marathi)
१) पी.एस.सी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे असते.
२) पी.एस.सी ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातुन आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असले पाहिजे.
३) पी.एस.सी ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्षे ते ४४ वर्षे इतकी असते.
४) एक उमेदवार आयुसीमा संपेपर्यंत कितीही वेळा पी.एस.सी ची परीक्षा देऊ शकतो.
पी.एस.सी परीक्षेची निवडक प्रक्रिया (PSC Exam Selection Process in Marathi)
पी.एस.सी ची परीक्षा तीन चरणांमध्ये आयोजित केली जाते आणि या तीन चरणांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड “लोकसेवा आयोगाद्वारे” विविध पदांसाठी केली जाते.
पी.एस.सी च्या परीक्षेची तीन चरणे खालीलप्रमाणे आहेत :
१) प्राथमिक परीक्षा – पी.एस.सी च्या परीक्षेचे पाहिले चरण म्हणजे “प्राथमिक परीक्षा”. पी.एस.सी द्वारे दरवर्षी प्राथमिक परीक्षा आयोजित केली जाते आणि जे विद्यार्थी ह्या वर्षीच्या पी.एस.सी च्या प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाहीत, ते पुढच्या वर्षाची पी.एस.सी ची प्राथमिक परीक्षा देऊ शकतात. तसेच प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड पी.एस.सी च्या मुख्य परीक्षेसाठी केली जाते.
२) मुख्य परीक्षा – पी.एस.सी च्या परीक्षेचे दुसरे चरण म्हणजे “मुख्य परीक्षा”. जे विद्यार्थी प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करतात ,ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात.
३) मुलाखत – पी.एस.सी परीक्षेचे तिसरे आणि शेवटचे चरण म्हणजे “मुलाखत राऊंड”. जे उमेदवार प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांची निवड पी.एस.सी च्या मुलाखत राऊंड साठी केली जाते.
या तिन्ही चरणांमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतात ,पी.एस.सी द्वारे त्या उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवले जाते आणि त्या उत्तीर्ण उमेदवारांचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची निवड राज्यामध्ये विविध पदांसाठी केली जाते.
पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मासिक पगार (Monthly Salary of PSC exam passed candidate in Marathi)
पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड विविध पदांसाठी केली जाते आणि या विविध पदांसाठी असणारा मासिक पगार हा वेगवेगळा असतो ; परंतु पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये ते १,३२,००० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मासिक पगार हा १,८२,२०० रुपये ते २,२४,१०० रुपये इतका होतो.
पी.एस.सी ची परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी संदेश (Message for PSC Exam Failed Candidates in Marathi)
तुम्ही जर ह्या वर्षीच्या पी.एस.सी च्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झाला असाल तर ,तुम्ही न डगमगता ,न घाबरता ,पुन्हा नव्या उमेदीने ,अजून थोडी मेहनत घेऊन पुढच्या वर्षीची पी.एस.सी ची परीक्षा देऊ शकता आणि ह्या वर्षीच्या पी.एस.सी च्या परीक्षेमध्ये तुमच्या कडून ज्या चुका झाल्या आहेत ,त्या चुकांवर तुम्ही काम करा आणि पुढच्या वर्षीच्या पी.एस.सी परीक्षेमध्ये त्या चुका तुम्ही पुन्हा करू नका. असे जर तुम्ही केले तर ,पुढच्या वर्षी होणाऱ्या पी.एस.सी च्या परीक्षेमध्ये तुमची उत्तीर्ण होण्याची शक्यता वाढेल.
FAQ
पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म “पब्लिक सर्व्हिस कमीशन” असा होतो.
मराठीमध्ये पी.एस.सी ला काय म्हणतात ?
मराठीमध्ये पी.एस.सी ला “लोकसेवा आयोग” असे म्हणले जाते.
पी.एस.सी च्या परीक्षेसाठी पात्रता निकष काय असतो ?
पी.एस.सी ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच पी.एस.सी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे. पी.एस.सी परीक्षेसाठी असणारी आयुसीमा ही १८ वर्ष ते ४४ वर्ष इतकी असते.
पी.एस.सी च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमदवारांचा मासिक पगार हा साधारण किती असतो ?
जे उमेदवार पी.एस.सी ची परीक्षा उत्तीर्ण करतात ,त्यांचा मासिक पगार हा साधारण ५६,१०० रुपये ते १,३२,००० रुपये इतका असतो. तसेच वाढत्या अनुभवासोबत पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मासिक पगार हा १,८२,२०० रुपये ते २,२४,१०० रुपये इतका होतो.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण पी.एस.सी परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.एस.सी चा फुल्ल फॉर्म ,पी.एस.सी परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, पी.एस.सी परीक्षेची निवडक प्रक्रिया, पी.एस.सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मासिक पगार, पी.एस.सी ची परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी संदेश, पी.एस.सी परीक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.
संदर्भ (References)
१)https://padhaipur.in/psc-post/#google_vignette
२)https://www.ssatripura.com/psc-full-form-in-hindi/
४)https://leverageedu.com/blog/hi/psc-full-form-in-hindi/
५)https://hindi.bankersadda.com/full-form-ssc-ifs-ias-ips-psc-upsc-in-hindi/