PFI Full Form In Marathi आजच्या लेखामध्ये आपण पी.एफ.आई चा फुल्ल फॉर्म काय आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.एफ.आई संघटने विषयी संपूर्ण माहिती ,पी.एफ.आई संघटनेला फंडिंग मिळण्याचे साधन ,पी.एफ.आई संघटने वर लावण्यात येणार आरोप आणि पी.एफ.आई संघटने विषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पी.एफ.आई संघटने विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
पी.एफ.आई फुल फॉर्म PFI Full Form In Marathi
पी.एफ.आई फुल्ल फॉर्म (PFI Full form)
पी.एफ.आई चा फुल्ल फॉर्म हा “पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया” असा होतो. “पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया” म्हणजेच पी.एफ.आई ही एक संघटना आहे आणि या संघटनेची स्थापना २२ नोव्हेंबर २००६ मध्ये करण्यात आली होतो. पी.एफ.आई ही संघटना दक्षिण भारतातील तीन संघटनांना एकत्र करून बनवण्यात आली होती. या तीन संघटनांमध्ये नेशनल डेमोक्रेटिक फ्रंट ,कर्नाटक राज्यातील फोरम फॉर डिग्निटी आणि तमिळनाडू राज्यातील मनिथा निती पसराई या संघटनांचा समावेश आहे.
पी.एफ.आई ही एक मुस्लिम संघटना आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आरक्षण मिळावे यासाठी देखील पी.एफ.आई संघटनेच्या लोकांनी कित्येक वेळा आंदोलन केली आहेत. जेव्हापासून पी.एफ.आई संघटनेची स्थापना करण्यात आली होती ,तेव्हापासूनच पी.एफ.आई संघटनेवर विविध पक्षाकडून व गटाकडून विविध आरोप लावण्यात आले आहेत.
पी.एफ.आई संघटनेचा प्रसार संपूर्ण भारतभर तेजीने पसरला होता. असे म्हणतात की ,केरळ राज्यामध्ये पी.एफ.आई संघटनेची मजबूत पकड होती. काही लोकांच्या मते पी.एफ.आई ही संघटना देशातील बऱ्याच राज्यामध्ये सक्रिय आहे.
पी.एफ.आई संघटनेला फंडींग मिळण्याचे साधन (obtaining funding for a PFI organization in Marathi)
मागे ईडी ने पी.एफ.आई संघटनेच्या आणि “कैंपस फ्रंट ऑफ इंडिया” संघटनेच्या ५ सदस्यांवर चार्जशीट दर्ज केली होती. ईडी च्या या चौकशी दरम्यान ईडी ला असे निदर्शनास आले की ,“पी.एफ.आई” संघटनेला आणि “कैंपस फ्रंट ऑफ इंडिया” संघटनेला आखाती देशाकडून फंडिंग मिळत होती आणि या फंडिंग चा वापर पी.एफ.आई संघटनेद्वारे विविध कार्यासाठी केला जात होता.
ईडी च्या या संशोधनामधून ईडीने १.३६ करोड एवढी अवैध रक्कम जप्त केली होती. ईडीच्या या चौकशी वरून असे निदर्शनास आले होती की, “२०२० मध्ये जेव्हा सी.ए.ए विरुद्ध संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन चालू होते ,तेव्हा पी.एफ.आई संघटना त्या आंदोलनामध्ये या फंडिंग चा वापर करत होते”. याव्यतिरिक्त ईडी च्या मते ,२०१३ पासून पी.एफ.आई संघटनेद्वारे होणाऱ्या डीपोजिट आणि ट्रांजिक्शन चे प्रमाण वाढले होते. पी.एफ.आई संघटनेला आखाती देशाकडून पैसे हे हवाला पद्धतीने मिळत होते.
पी.एफ.आई संघटनेवर लावण्यात येणारे काही आरोप (Some Allegations against PFI organisation in Marathi)
२०१७ मध्ये एन.आई.ए (NIA) ने गृह मंत्रालयाला पत्र लिहिले होते आणि त्या पत्रामध्ये एन.आई.ए (NIA) ने पी.एफ.आई संघटनेला बैन करण्यासाठी विनंती केली होती. एन.आई.ए (NIA) च्या मते,“पी.एफ.आई संघटना एक कट्टर इस्लामिक संघटना आहे आणि ही संघटना राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी घातक आहे”.
एन.आई.ए (NIA) च्या मते ,“पी.एफ.आई संघटनेद्वारे देशातील तरुण मुलांना आतंकवादी बनण्यासाठी ट्रेनिंग दिले जाते”. तसेच एन.आई.ए (NIA) च्या मते ,“पी.एफ.आई ही संघटना दुसऱ्या धर्मीय लोकांचे जबरदस्ती धर्मांतरण करते.”
ईडी ने पी.एफ.आई संघटनेवर हा आरोप लावला होता की ,“पी.एफ.आई संघटनेने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर बिहार मध्ये हल्ला करण्यासाठी योजना आखली होती. या हल्ल्यासाठी पी.एफ.आई संघटनेने काही लोकांना ट्रेनिंग देखील दिले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक गोष्टींवर पी.एफ.आई संघटनेची माणसे नजर ठेवून होती.
FAQ
पी.एफ.आई चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
पी.एफ.आई चा फुल्ल फॉर्म हा “पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया” असा होतो.
पी.एफ.आई संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली होती ?
पी.एफ.आई संघटनेची स्थापना २२ नोव्हेंबर २००६ मध्ये करण्यात आली होती. तीन संघटना एकत्र येऊन या पी.एफ.आई संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या तीन संघटनांमध्ये नेशनल डेमोक्रेटिक फ्रंट ,कर्नाटक मधील फोरम फॉर डिग्निटी आणि तमिळनाडू मधील मनिथा निती पसराई या संघटनांचा समावेश होता.
गृह मंत्रालयाद्वारे पी.एफ.आई संघटनेला किती वर्षांसाठी बैन करण्यात आले आहे ?
सरकारमधील गृह मंत्रालयाद्वारे पी.एफ.आई संघटनेला २८ सप्टेंबर २०२२ मध्ये ५ वर्षांसाठी बैन करण्यात आले आहे.
पी.एफ.आई संघटनेला कोणाद्वारे फंडिंग मिळत होते ?
एन.आई.ए (NIA) ने दावा केला होता की ,पी.एफ.आई संघटना ही कट्टर इस्लामिक संघटना आहे आणि एन.आई.ए (NIA) च्या मते पी.एफ.आई संघटना ही देशातील काही तरुण लोकांना आतंकवादी बनण्यासाठी ट्रेनिंग देते. तसेच एन.आई.ए (NIA) ने पी.एफ.आई संघटनेवर जबरदस्ती धर्मांतर करण्याचा देखील आरोप लावला होता. ईडी च्या मते ,“पी.एफ.आई संघटनेच्या काही लोकांनी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी योजना आखली होती” ,तसेच ईडी च्या मते ,“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक गोष्टींवर पी.एफ.आई संघटनेची माणसे नजर ठेवून होती.”
निष्कर्ष (conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण पी.एफ.आई संघटनेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.एफ.आई चा फुल्ल फॉर्म ,पी.एफ.आई संघटने विषयी माहिती ,पी.एफ.आई संघटनेला फंडिंग मिळण्याचे साधन , ईडी आणि एन.आई.ए (NIA) द्वारे पी.एफ.आई संघटनेवर लावण्यात येणारे आरोप ,पी.एफ.आई संघटने विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.