पी.डी.एफ फुल फॉर्म PDF Full Form In Marathi

PDF Full Form In Marathi आपण प्रत्येकाने केव्हा ना केव्हा पी.डी.एफ स्वरूपातील फाईल डाऊनलोड केली असेल ; परंतु तुम्हाला हे माहीत आहे का ? पी.डी.एफ हे एक संक्षिप्त रूप आहे ? आणि तुम्हाला पी.डी.एफ शब्दाचा फुल्ल फॉर्म माहीत आहे का ? आजच्या लेखामध्ये आपण पी.डी.एफ च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि पी.डी.एफ स्वरूपातील फाईल विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पी.डी.एफ च्या फुल्ल फॉर्म विषयी आणि पी.डी.एफ विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

PDF Full Form In Marathi

पी.डी.एफ फुल फॉर्म PDF Full Form In Marathi

पी.डी.एफ फुल्ल फॉर्म (PDF full form)

पी.डी.एफ चा फुल्ल फॉर्म “पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट” असा होतो. पी.डी.एफ हे एक फॉरमॅट आहे आणि याची निर्मिती १९९२ मध्ये एडोब कंपनीच्या सह संस्थापकाच्या म्हणजे डॉक्टर जॉन वॉर्नोक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.

काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी सर्व महत्वाची डॉक्युमेंट्स ही पेपर वरती स्वरूपात जतन केली जात होती, परंतु जेव्हापासून पी.डी.एफ फॉरमॅट आले आहे ,तेव्हापासून महत्वाचे डॉक्युमेंट्स हे पी.डी.एफ स्वरूपात जतन केले जात आहे. तसेच आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल कोणालाही सहजरीत्या शेअर करू शकतो.

तसेच काही वर्षांपूर्वी आपल्याला जर पुस्तक वाचायचे असेल ,तर आपण पुस्तक हार्डकॉपी मध्ये विकत घेऊन वाचत होतो ; परंतु जेव्हापासून पी.डी.एफ फॉरमॅट आले आहे ,तेव्हापासून आपण आपल्याला हवे ते पुस्तक ऑनलाईन खरेदी करून पी.डी.एफ स्वरूपात वाचू शकतो.

आजकाल बऱ्यापैकी व्यवसायामध्ये फाईलचे शेरींग करताना पी.डी.एफ स्वरूपातील फाईलचा वापर केला जात आहे. आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल ची प्रिंट देखील मारू शकतो. तसेच आपण आपल्या पी.डी.एफ स्वरूपात असणाऱ्या फाईलला पासवर्ड लावू शकतो ,जेणेकरून आपली पी.डी.एफ स्वरूपातील फाईल कोणीही वाचू शकणार नाही आणि ती फाईल आपल्या व्यतिरिक्त कोणीही एडिट करू शकणार नाही.

पी.डी.एफ स्वरूपातील फाईल चे फायदे (Benefits of PDF format files in Marathi)

१) पी.डी.एफ स्वरूपातील फाईल ची साईझ खूप कमी असते ,त्यामुळे ती फाईल सेव्ह होताना आपल्या कॉम्प्युटर मधील खूप कमी स्पेस घेते.

२) पी.डी.एफ स्वरूपातील फाईल ची साईझ कमी असल्यामुळे ती फाईल आपण कमी इंटरनेट मध्ये दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकतो.

३) आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल चे रूपांतर डॉक्युमेंट स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो आणि त्या डॉक्युमेंट स्वरूपातील फाईल मध्ये आपण आपल्याला हवा तो बदल करू शकतो आणि बदल केल्यानंतर परत आपण डॉक्युमेंट स्वरूपातील फाईल चे रूपांतर पी.डी.एड स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो.

४) आपण सहजरीत्या कोणालाही पी.डी.एफ स्वरूपातील फाईल शेअर करू शकतो.

आपण खालील स्वरूपातील फाईल चे रूपांतर पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो  (We can convert the following format file into PDF format file in Marathi)

१) आपण डॉक्युमेंट स्वरूपातील फाईल चे रूपांतर पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो. जे कोणी लेखक असतात ,ते सर्वप्रथम आपले पुस्तक ई स्वरूपात म्हणजे डॉक्युमेंट स्वरूपात लिहितात. जेव्हा त्यांचे पुस्तक डॉक्युमेंट मध्ये लिहून पूर्ण होते ; तेव्हा ते पुस्तक डॉक्युमेंट मध्ये एडिट करतात. डॉक्युमेंट मध्ये संपूर्ण पुस्तक लिहून झाल्यानंतर ते त्या डॉक्युमेंट फाईल चे रूपांतर पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करतात आणि ते त्या

पी.डी.एफ स्वरूपातील फाईल चे शेरिंग पब्लिशर कडे करतात आणि पब्लिशर त्या पी.डी.एफ स्वरूपात असणाऱ्या पुस्तकाचे रूपांतर हार्ड कॉपी मध्ये करतात आणि त्या हार्ड कॉपी तील पुस्तकाचे मार्केटिंग करून ते पुस्तक मार्केट मध्ये उपलब्ध केले जाते.

२) आपल्याला जर आपल्या मोबाईल मधील फोटोज् चे रूपांतर पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करायचे असेल तर ,आपण सहजरीत्या पी.एन.जी चे रूपांतर पी.डी.एफ फाईल मध्ये करू शकतो.

३) आपण जर कंपनी साठी प्रेझेंटेशन बनवत असू तर ,त्या पीपीटी स्वरूपातील फाईल चे रूपांतर आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो.

४) आपण टेक्स्ट स्वरूपातील फाईल चे रूपांतर सहजरीत्या पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो.

५) आपण जर कंपनीमध्ये एक्सेल च्या प्रोजेक्ट वर काम करत असू तर, आपण डेटा हा एक्सेल स्वरूपात सेव्ह करतो आणि आपण त्या एक्सेल स्वरूपातील फाईल चे रूपांतर पी.डी.एफ स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो.

FAQ

पी.डी.एफ चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

पी.डी.एफ चा फुल्ल फॉर्म “पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट” असा होतो.

पी.डी.एफ ची निर्मिती कोणाद्वारे करण्यात ई होती ?

१९९२ मध्ये पी.डी.एफ ची निर्मिती एडोब कंपनीच्या सह संस्थापकाच्या म्हणजे डॉक्टर जॉन वॉर्नोक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती.

आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल चे रूपांतर कोणकोणत्या फाईल मध्ये करू शकतो ?

आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल चे रूपांतर टेक्स्ट स्वरूपातील फाईल मध्ये ,पीपीटी स्वरूपातील फाईल मध्ये ,पीएनजी स्वरूपातील फाईल मध्ये ,डॉक्युमेंट स्वरूपातील फाईल मध्ये , एक्सेल स्वरूपातील फाईल मध्ये ,टेक्स्ट स्वरूपातील फाईल मध्ये करू शकतो.

पी.डी.एफ चे फायदे कोणकोणते आहेत ?

पी.डी.एफ स्वरूपातील फाईल ची साईझ खूप कमी असते, त्यामुळे आपल्याला ती कॉम्प्युटर मध्ये कमी स्पेस मध्ये सेव्ह करता येते. तसेच पी.डी.एफ स्वरूपातील फाईल आपण कमी इंटरनेट मध्ये सहजरीत्या दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकतो.

आईएसओ द्वारे पी.डी.एफ स्वरूपातील फाईल ला कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आले होते ?

१ जुलै २००८ मध्ये आईएसओ द्वारे पी.डी.एफ स्वरूपातील फाईलला ISO 32000-1:2008 च्या रुपात प्रकाशित करण्यात आली होती.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण पी.डी.एफ स्वरूपातील फाईल विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.डी.एफ च्या फुल्ल फॉर्म विषयी ,पी.डी.एफ चे फायदे ,पी.डी.एफ विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१) https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/PDF?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

२) https://byjus.com/full-form/pdf-full-form/

३) https://www.adobe.com/acrobat/about-adobe-pdf.html

४) https://www-vedantu-com.translate.goog/full-form/pdf-full-form? _x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa

५) https://docs.fileformat.com/hi/pdf/

Leave a Comment