PCS Full Form In Marathi आपल्या भारत देशामध्ये सरकारी नोकरी मिळवणे हे खूप विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते विद्यार्थी दिवसरात्र मेहनत घेतात आणि त्यातील काही विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण देखील करतात. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका सरकारी नोकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षे विषयी माहिती पाहणार आहोत ,तसेच आजच्या लेखामधून आपण पी.सी.एस च्या फुल्ल फॉर्म विषयी देखील माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पी.सी.एस परीक्षे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
पी.सी.एस फुल फॉर्म PCS Full Form In Marathi
पी.सी.एस परीक्षेचा फुल्ल फॉर्म (PCS exam in Marathi)
पी.सी.एस चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “Provincial Civil Service” असा होतो ,तसेच पी.सी.एस चा मराठी भाषेतील अर्थ हा “प्रांतीय सिव्हिल सेवा” असा होतो. लोकसेवा आयोगाद्वारे पी.सी.एस ची परीक्षा ही दरवर्षी विविध राज्यांमध्ये आयोजित केली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी केली जाते.
पी.सी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for PCS exam in Marathi)
पी.सी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे :
१) सर्वप्रथम पी.सी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.
२) पी.सी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असला पाहिजे. जर उमेदवार पदवी उत्तीर्ण नसेल तर ,तो पी.सी.एस च्या परीक्षेसाठी पात्र ठरत नाही.
३) पी.सी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय हे साधारण २१ ते ४० वर्ष इतके असले पाहिजे. २१ वयाच्या खालील उमेदवार ,तसेच ४० वर्षा वरील उमेदवार पी.सी.एस च्या परीक्षेसाठी पात्र ठरत नाही ; परंतु काही जातीमधील उमेदवारांना वयातील अटींमध्ये सुट दिली जाते.
पी.सी.एस परीक्षेसाठी असणारी निवड प्रक्रिया (Selection process for PCS exam in Marathi)
पी.सी.एस परीक्षेची निवड प्रक्रिया ही तीन राऊंड मध्ये केली जाते आणि या तिन्ही राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी केली जाते.
पी.सी.एस परीक्षेची निवड प्रक्रिया ही खालीलप्रमाणे असते :
१) प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam) – पी.सी.एस परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराने लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी प्राथमिक परीक्षा पास करणे अनिवार्य असते. लोकसेवा आयोगाद्वारे पी.सी.एस ची प्राथमिक परीक्षा ही दरवर्षी आयोजित केली जाते. तसेच प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी होते. जे उमेदवार प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नाहीत आणि ज्यांचे स्वप्न अधिकारी बनने हे असते ,अशा उमेदवारांनी न डगमगता चांगला अभ्यास करून पुढच्या वर्षीची प्राथमिक परीक्षा दिली पाहिजे.
२) मुख्य परीक्षा (Mains exam)- जे उमेदवार पी.सी.एस ची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करतात ,अशा उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाते. पी.सी.एस ची परीक्षा पास करून अधिकारी बनण्यासाठी उमेदवाराला मुख्य परीक्षा पास करणे गजरेचे असते. मुख्य परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांमध्ये मुख्य परीक्षेचा निकाल लागतो, तसेच त्या निकालामध्ये जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत ,त्यांची निवड मुलाखत राऊंड साठी होते.
३) मुलाखत (Interview)- जे उमेदवार लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात ,अशा उमेदवारांची निवड मुलाखत राऊंड साठी केली जाते. मुलाखत राऊंड मध्ये उमेदवारांच्या विविध कौशल्यांची तपासणी केली जाते. मुलाखत राऊंड द्वारे उमेदवार अधिकारी बनण्यासाठी खरच पात्र आहे का ? ,याची तपासणी केली जाते. मुलाखत राऊंड मध्ये उमेदवाराचे कौशल्य तपासण्यासाठी उमेदवाराला विविध प्रश्न विचारले जातात.
जे उमेदवार प्राथमिक परीक्षा ,मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड या तिन्ही राऊंड मध्ये उत्तीर्ण होतात ,अशा उमेदवारांची निवड लोकसेवा आयोगाद्वारे विविध पदांसाठी केली जाते. लोकसेवा आयोगाद्वारे प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत राऊंड हे तिन्ही राऊंड उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना ट्रेनिंग साठी पाठवले जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या उत्तीर्ण उमेदवारांची निवड राज्यामध्ये विविध ठिकाणी विविध पदांसाठी केली जाते.
FAQ
पी.सी.एस चा फुल्ल फॉर्म काय होतो ?
पी.सी.एस चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म “Provincial Civil Service” असा होतो.
पी सी.एस चा मराठी भाषेतील अर्थ काय होतो ?
पी.सी.एस चा मराठी भाषेतील अर्थ “प्रांतीय सिव्हिल सेवा” असा होतो.
पी.सी.एस परीक्षेसाठी पात्रता निकष काय असते ?
पी.सी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच उमेदवाराने कोणत्याही शाखेतून आपले पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असेल पाहिजे आणि पी.सी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय हे २१ ते ४० वर्ष इतके असेल पाहिजे. काही जातींच्या उमेदवारांना या वय अटींमध्ये सूट दिली जाते.
पी.सी.एस ची परीक्षा कोणा द्वारे आयोजित केली जाते ?
पी.सी.एस ची परीक्षा ही राज्यातील लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी आयोजित केली जाते.
पी.सी.एस परीक्षेची निवड प्रक्रिया काय आहे ?
ज्या उमेदवारांनी पी.सी.एस परीक्षेचा फॉर्म भरला आहे ,अशा उमेदवारांची प्रथम प्राथमिक परीक्षा घेतली जाते. या प्राथमिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते व या मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड ही मुलाखत राऊंड साठी केली जाते. या तिन्ही राऊंड मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड ही लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी केली जाते.
मी कला शाखेतून माझे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे ,तर मी पी.सी.एस ची परीक्षा देऊ शकतो का ?
हो ,तुम्ही पी.सी.एस ची परीक्षा देऊ शकता. पी.सी.एस ची परीक्षा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेला उमेदवार देऊ शकतो.
निष्कर्ष (Conclusion)
आजच्या लेखामध्ये आपण लोकसेवा आयोगाद्वारे विविध राज्यांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पी.सी.एस परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.सी.एस परीक्षेचा फुल्ल फॉर्म ,पी.सी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष ,पी.सी.एस परीक्षेची निवड प्रक्रिया आणि पी.सी.एस परीक्षे विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.