ओ.टी.टी फुल फॉर्म OTT Full Form In Marathi

OTT Full Form In Marathi पूर्वी आपल्याला जर एखादा चित्रपट पाहायचा असेल तर ,आपल्याला चित्रपट गृहात जाणून चित्रपट पहावा लागत होता ; परंतु या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या मोबाईल वर ओ.टी.टी प्लॅटफॉर्म च्या साहाय्याने आपल्याला हवा तो चित्रपट पाहू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण याच ओ.टी.टी प्लॅटफॉर्म विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण ओ.टी.टी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची माहिती देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे आपण ओ.टी.टी प्लॅटफॉर्म विषयी आणि ओ.टी.टी च्या फुल्ल फॉर्म विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

OTT Full Form In Marathi

ओ.टी.टी फुल फॉर्म OTT Full Form In Marathi

ओ.टी.टी फुल्ल फॉर्म (OTT full form)

ओ.टी.टी चा फुल्ल फॉर्म “ओव्हर द टॉप” असा होतो. हे एक माध्यम आहे ,ज्याच्या साहाय्याने आपण घरी बसून आपल्याला हव्या त्या वेळेत चित्रपट अथवा वेब सिरीज पाहू शकतो. जेव्हापासून मार्केट मध्ये वेब सिरीज येऊ लागल्या आहे , तेव्हापासून ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वरती चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.

२०२० वर्षामध्ये संपूर्ण जगाने कोरोना  महामारीचा सामना केला आहे. अशावेळी कोणालाही आपले घर सोडून बाहेर जाता येत न्हवते. त्याकाळात सर्वांची मानसिक स्थिती खराब झाली होती. अशावेळी कोरोना काळात लोक आपल्या घरी बसून ओ.टी.टी प्लॅटफॉर्म च्या मदतीने नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा चा आनंद लुटत होते.

हळू हळू कोरोनाची लाट कमी होऊ लागली ,सगळीकडे पहिल्यासारखे सर्व सुरळीत होऊ लागले होते ;परंतु कोरोना महामारी नंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात जाण्यापेक्षा घरी बसून ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहण्याला पसंती देऊ लागले.

वर्तमानात ओ.टी.टी प्लॅटफॉर्म ची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आजकाल तर काही निर्माता आणि दिग्दर्शक आपला चित्रपट चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यास प्राधान्य देत आहेत.

आपण ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चेनमासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून त्या प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असणाऱ्या सर्व चित्रपट अथवा वेब सिरीज पाहण्याचा लाभ घेऊ शकतो. काहीवेळा या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर काही प्रसिद्ध चित्रपट अथवा वेब सिरीज या निःशुल्क देखील असतात. ज्यामध्ये आपण मोफत त्या चित्रपट अथवा वेब सिरीज पाहण्याचा लाभ घेऊ शकतो.

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म च्या सेवा (Services of OTT platforms in Marathi)

१) सबस्क्रिप्शन व्हिडिओज ऑन डिमांड – ओ.टी.टी च्या या सेवेमध्ये आपल्याला ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर एखादी चित्रपट अथवा वेब सिरीज पाहायची असेल तर ,आपल्याला त्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. जर आपण एका ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन घेतले तर ,आपण एका महिन्यापर्यंत त्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहू शकतो आणि एका महिन्यानंतर आपल्याला पुन्हा एखादा त्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागते.

तसेच जर आपण एका ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर ,आपण वर्षभर त्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहू शकतो. सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहताना आपल्याला कोणतीही जाहिरात दिसत नाही.

२) ऍड व्हिडिओज ऑन डिमांड – ओ.टी.टी प्लॅटफॉर्म च्या या सेवेमध्ये आपण एका ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर विना सबस्क्रिप्शन घेता चित्रपट अथवा वेब सिरीज पाहू शकतो ; परंतु आपण जेव्हा चित्रपट अथवा वेब सिरीज पाहतो ,तेव्हा आपल्याला विशिष्ट वेळेनंतर जाहिराती पाहाव्या लागतात. 

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहण्याचे काही फायदे (Some Benefits of Watching movies and web series on OTT platforms in Marathi)

१) ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहण्यासाठी आपल्याला चित्रपट गृहात जाण्याची आवश्यकता लागत नाही. आपण आपल्याला हव्या त्या वेळेत आपल्या मोबाईल वर चित्रपट अथवा वेब सिरीज पाहू शकतो. ओ.टी.टी प्लॅटफॉर्म मुळे चित्रपट गृहात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.

२) ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर आपण काही चित्रपट किंवा वेब सिरीज मोफत देखील पाहू शकतो.

३) जे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतात ,ते काही दिवसानंतर ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर देखील प्रदर्शित होतात. आपल्याला काही कारणामुळे चित्रपट गृहात जाऊन एखादा चित्रपट पाहता आला नसेल तर आपण तो चित्रपट जेव्हा ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होईल तेव्हा तो ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर पाहू शकतो.

४) काही ओ.टी.टी प्लॅटफॉर्म आपल्या स्वतःचे चित्रपट अथवा वेब सिरीज काढतात आणि ते आपल्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करतात.

५) काही ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन ची फी खूप कमी असते. जेणेकरून आपण कमी फी भरून त्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट पाहण्याचा लाभ घेऊ शकतो.

६) जर आपण एखादा चित्रपट पाहत आहोत  आणि तो चित्रपट आपण अर्धाच पाहिला आहे व आपल्याला दुसरे काम लागले त्यामुळे आपण त्यावेळी तो चित्रपट पूर्ण पाहू शकलो नाही. तर आपण पुन्हा कधीही आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपला अर्धवट राहिलेला चित्रपट  पाहू शकतो.

काही ओ.टी.टी प्लॅटफॉर्म ची नावे (Some names of OTT platforms in Marathi)

१) हॉटस्टार

२) जीओ सिनेमा

३) नेटफ्लिक्स

४) अमेझॉन प्राईम व्हिडिओ

FAQ

ओ.टी.टी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

ओ.टी.टी चा फुल्ल फॉर्म “ओवर द टॉप” असा होतो.

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर आपण काय काय पाहू शकतो ?

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर आपण चित्रपट ,वेब सिरीज ,डॉक्युमेंट्री, इत्यादी गोष्टी पाहू शकतो.

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन साधारण किती रुपये इतके असते ?

वेगवेगळ्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन हे वेगवेगळे असते ; परंतु साधारण सर्व ओ.टी.टी प्लॅटफॉर्म चे मासिक सबस्क्रिप्शन हे ३०० रुपये ते ६०० रुपये च्या दरम्यान असते.

सर्वात जास्त कोणत्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर लोक चित्रपट पाहतात.

वर्तमानात मार्केट मध्ये खूप ओ.टी.टी प्लॅटफॉर्म आहेत आणि त्या सर्व ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर नियमित चांगले चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत असतात ; परंतु लोकांद्वारे सर्वात जास्त पाहिले जाणारे ओ.टी.टी प्लॅटफॉर्म म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडिओ , अल्ट बालाजी , हॉटस्टार , जिओ सिनेमा, इत्यादी.

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट पाहण्याचे कोणकोणते फायदे आहेत ?

ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर चित्रपट पाहिल्यामुळे आपला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यासाठी लागणारा वेळ वाचतो. तसेच हॉटस्टार आणि जिओ सिनेमा सारख्या ओ.टी.टी प्लॅटफॉर्म वर आपण चित्रपटा सोबत क्रिकेट आणि फुटबॉल च्या सामन्यांचा देखील लाभ उचलू शकतो.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण ओ.टी.टी प्लॅटफॉर्म विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण ओ.टी.टी चा फुल्ल फॉर्म काय आहे ? याविषयीची देखील संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A6-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE

२)https://rajsevak.com/what-is-ott-kya-hai-hindi/

३)https://www-vplayed-com.translate.goog/blog/what-is-ott-over-the-top-explained/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc

४)https://www.google.com/amp/s/ndtv.in/web-series/ott-a-to-z-of-over-the-top-platforms-how-they-earn-free-ott-platforms-top-ott-platforms-3295575/amp/1

५)https://www-adjust-com.translate.goog/glossary/ott-over-the-top/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=wa#:~:text=Netflix%2C%20Amazon%20Prime%2C%20HBO%20Max,platforms%20in%20the%20communication%20space.

Leave a Comment