ओबीसी फुल फॉर्म OBC Full Form In Marathi

OBC Full Form in Marathi मागील काही काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून OBC हा शब्द अनेकदा आपल्या कानांवर पडला असेल. OBC आरक्षण हा अनेकांनी उचलून धरलेला मुद्दा असून यामुळे अनेक निवडणुका देखील लांबणीवर पडलेल्या आहेत. भारत देशात सर्व धर्माचे लोक अगदी गुण्य गोविंदाने जरी एकत्र रहात असतील तरी देखील आपल्याकडे जातींचे राजकारण आणि जातीचे विभाजन हे झालेले आहे.

OBC Full Form In Marathi

ओबीसी फुल फॉर्म OBC Full Form In Marathi

अनेकदा आपल्याला सवलतीसाठी जात हा मुद्दा मध्ये येतो आणि त्यापैकीच एक कॅटेगरी म्हणजे OBC होय. आज आपण OBC Full Form in मराठी, OBC म्हणजे नक्की काय, OBC समाजात कोणाचा समावेश होतो, OBC आरक्षणाचे फायदे आणि OBC शब्दाचे इतर काही Full Form असतील तर त्याविषयी जाणून घेणार आहोत.

OBC Full Form in Marathi ।। OBC Long Form in Marathi

OBC हा भारतातील एक समाज किंवा प्रवर्ग आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये तुम्हाला तुमच्या जाती ऐवजी तुमचा प्रवर्ग कोणता आहे यावरून सवलती आणि आरक्षण हे मिळते. OBC शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा Other Backward Class असा होतो. OBC शब्दाचा मराठी भाषेत अर्थ किंवा Full Form हा इतर मागास वर्ग असा आहे.

OBC म्हणजे काय? What is OBC in Marathi?

भारतात आपण धर्माच्या नंतर जातींसाठी काही प्रवर्ग बनविलेले आहेत त्यातील एक प्रवर्ग म्हणजे ओबीसी होय. OBC म्हणजेच मराठी भाषेत इतर मागास वर्ग होय. प्रवर्ग बनवत असताना त्यामध्ये अनेक जातींचा समावेश हा करण्यात आला आणि यामुळे सरकारला एखादी योजना किंवा सवलत प्रत्येक जातीला न नमुद करता सरळ एका प्रवर्गाला देता आल्या.

OBC हा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्टया थोडासा मागास असल्याने या प्रवर्गाला इतर मागास वर्ग असे नाव देण्यात आले आहे. अनेकदा आपण SC ST सारख्या प्रवर्गांविषयी ऐकतो मात्र ते जास्त मागास असतात त्यामुळे त्यांच्यासाठी सवलती या वेगळ्या असतात आणि OBC प्रवर्गासाठी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात फक्त सवलती आणि जागा असतात.

राज्यघटनेच्या कलम 16 मधील 4 आणि 340 या अभिलेखात OBC समाजाविषयी माहिती आणि त्यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात असणाऱ्या सवलती विषयी माहिती दिलेली आहे. OBC समाजाला अनेक ठिकाणी जवळपास 27% आरक्षण हे देण्यात आलेले आहे. सध्या त्यांच्या आरक्षणावर प्रश्न उभे झाले असल्याने आपल्याला OBC समाजाकडून आरक्षणासाठी आंदोलन बघायला मिळत आहेत.

OBC प्रवर्गाचा इतिहास

मंडल या आयोगाच्या अंतर्गत 1979 मध्ये शिफारशीने जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांचा समावेश OBC समाजात करण्यात आला होता. यामध्ये बघायला गेलं तर 1979 आधी देखील OBC समाज होता मात्र OBC अंतर्गत फक्त काही जाती समाविष्ठ केलेल्या होत्या. 1979 नंतर समाजातील जे घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांचा देखील समावेश या OBC प्रवर्गात करण्यात आला.

पुढे जाऊन OBC समाज आणि आरक्षण यासाठी मंडल आयोगाने कार्य केले. मंडल आयोगाच्या 1990 मधील शिफारशीनुसार OBC समाजातील व्यक्तींना नोकरी मध्ये देखील आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी व्ही पी सिंग यांचे सरकार कार्यरत होते.

OBC समाजासाठी आरक्षण

महाराष्ट्रात असलेल्या एकूण 52% आरक्षणापैकी 32 टक्के आरक्षण हे OBC प्रवर्गासाठी होते. काही काळापूर्वी या आरक्षणात बदल होऊन OBC समाजाला 19% आरक्षण हे देण्यात आले आहे. भारतात OBC समाजाला एकूण 27% आरक्षण हे शिक्षण आणि नोकरी क्षेत्रात आहे. याशिवाय तुम्ही OBC समाजातून असाल तर तुम्हाला वयाच्या अटी मध्ये देखील सूट मिळते.

OBC समाजाला शिक्षणात अनेकदा स्कॉलरशिप दिल्या जातात. त्यातून त्या मुलांच्या शिक्षणाला हातभार लावला जातो. नोकरी मधील OBC समाजाचे आरक्षण आणि राजकारणातील OBC समाजाचे आरक्षण हा वादाचा मुद्दा आहे. यावरून सध्या राजकारण तापलेले असून OBC आरक्षण कायद्याच्या कसोटी मध्ये मराठा आरक्षणासारखे संपुष्टात येईल की टिकेल हे मात्र काळच सांगू शकेल.

OBC समाजातील जाती

अनेकदा आपण OBC आहोत असे बोलून जातो मात्र आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने OBC आहोत की आपली जात OBC समाजातील आहे हे मात्र आपल्याला माहिती नसते. महाराष्ट्रात एकूण 360 जाती तर भारत देशात एकूण 3744 जाती या OBC समाजात किंवा प्रवर्गात मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार जोडलेल्या आहेत. सरकार यादी जर कमी जातींची जाहीर करत असलं तरी देखील उपजाती किंवा पोटजाती अनेक आहेत.

मुस्लिम समाजातील देखील जवळपास 37 पोटजाती या OBC प्रवर्गाचा भाग आहेत. OBC प्रवर्गात महाराष्ट्र असलेल्या काही जातींची नावे खाली सांगतो आहे. सर्व जाती सांगणे कठीण आहे मात्र त्यातील काही महत्वाच्या जाती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

बंजारा, माळी, शिंपी, कुणबी, साळी, कोष्टी, कोळी, लोहार, सोनार, तेली, वाणी, भावसार, नाभिक, गुरव, गवळी, परिट, आगरी, विणकर, मोमीन, घडशी, जंगम, पांचाळ, फुलारी, सुतार, रंगारी, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, इत्यादी…

OBC शब्दाचे इतर काही Full Form

  • Oriental Bank of Commerce (ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स)
  • Outer Backward Caste (बाह्य मागास जात) – हा देखील एक प्रवर्ग असून जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हा प्रवर्ग आहे. यामध्ये आरक्षण नसते मात्र काही ठिकाणी सवलती मिळू शकतात.

आज आपण OBC प्रवर्गांविषयी जवळपास सर्व माहिती बघितली. OBC आरक्षण हा सध्या राजकारणाचा मुद्दा बनलेला असून OBC समाजाच्या अडचणी या समोर येत नाहीत. OBC full form in Marathi या लेखाच्या माध्यमातून आपण या प्रवर्गाविषयी सर्व माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

FAQs (Frequently Asked Questions)

OBC शब्दाचा FULL FORM काय आहे?

OBC शब्दाचा FULL FORM हा Other Backward Class असा आहे. मराठी मध्ये याचा अर्थ हा इतर मागास वर्ग असा होतो.

OBC समाजाला किंवा प्रवर्गाला एकूण किती टक्के आरक्षण आहे?

OBC समाजाला केंद्रात आणि राज्यात वेगवेगळे आरक्षण आहे. OBC समाजाला केंद्रात 27% आरक्षण आहे. तर राज्यात 19% आरक्षण हे OBC समाजासाठी आहे.

OBC आरक्षण हे नोकरीसाठी लागू आहे का?

OBC आरक्षण हे सरकारी नोकरीसाठी आणि काही ठिकाणी खाजगी नोकरीसाठी देखील लागू असते. 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार व्ही पी सिंग सरकारने OBC समाजासाठी नोकरीत आरक्षण द्यायला सुरुवात केली होती.

OBC प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून जाण्यासाठी काय अटी आहेत?

OBC प्रवर्गात समाविष्ट होण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा जास्त नसावे ही एकमेव अट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी OBC मध्ये आहे. यासोबत नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे असते.

Leave a Comment