एनआयसीयु फुल फॉर्म NICU Full Form In Marathi

NICU Full Form In Marathi – NICU जरी आपल्याला माहिती नसेल तरी देखील ICU नक्कीच माहिती असेल? आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की नक्की NICU आणि ICU यामध्ये काम संबंध आहे? आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण NICU म्हणजे काय, ICU म्हणजे काय, NICU चा फुल फॉर्म, NICU मधील उपकरणे, NICU ची गरज केव्हा पडते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

NICU Full Form In Marathi

एनआयसीयु फुल फॉर्म NICU Full Form In Marathi

NICU Full Form in Marathi । NICU Long Form in Marathi

आपल्याला ICU नक्कीच माहिती असेल कारण जेवहा कधी एखाद्या रुग्णाची अवस्था खूप बिकट होती त्याचे आरोग्य इतके जास्त खालावते की त्याला बाहेरील वातावरणाचा त्रास होतो तेव्हा त्याला या ICU विभागात ठेवले जाते. त्याचाच एक विशेष विभाग म्हणजे NICU होय.

NICU शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Neonatal Intensive Care Unit (निओनट्ल इंटेनसिव्ह केअर युनिट) असा होतो. NICU शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा अर्भकांसाठी अतिदक्षता विभाग असा होतो. यालाच नवजात शिशुंसाठी असलेला अतिदक्षता विभाग म्हणून ओळखले जाते. NICU ला नवजात बालकांसाठी असलेला गहन चिकित्सा विभाग म्हणून देखील ओळखले जाते.

NICU म्हणजे काय? – What is NICU in Marathi?

ICU म्हणजे अतिदक्षता विभाग होय. तर NICU म्हणजे नवजात अर्भकांसाठी असलेला अतिदक्षता विभाग होय. जेव्हा एखादा रुग्ण जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असतो म्हणजे कदाचित त्याला जर मेडिकल उपकरणांचा आधार भेटला नाही तर त्याचा मृत्यू होऊ शकतो अशा वेळी त्या रुग्णाला ICU मध्ये ठेवले जाते.

जेव्हा एखादे नवजात अर्भक बाहेरील वातावरण सहन करू शकत नाही आणि त्याच्या आजारात अधिकच वाढ होते तेव्हा त्या नाजूक नवजात अर्भकाला NICU मध्ये ठेवले जाते. हे NICU म्हणजे नवजात अर्भकांसाठी बनविलेले एक आयसीयू असते. अनेकदा आपण असे ऐकतो की बाळ काही काळ काचेच्या ठेवलेले होते तर काचेच्या आत ठेवलेले बाळ म्हणजे त्याला NICU च्या पहिल्या स्टेजवर बाहेरील वातावरणाशी सरळ संपर्क न येता ठेवले जाते.

बालकाची स्थिती नाजूक आहे म्हणून नव्हे तर बालक हे नवीन असल्याने त्याला बाहेरील वातावरणाच्या सोबत जुळवून घेणे काही प्रमाणात कठीण होत असल्याने नवजात बालकाला काही काळ त्या काचेच्या आत म्हणजे NICU मध्ये ठेवले जाते.

ICU शब्द ऐकला की आपल्या मनात भीती भरते कारण या ICU मध्ये एखाद्याला ठेवले म्हणजे त्या व्यक्तीच्या जगण्याच्या शक्यता आधीच कमी झालेल्या असतात मात्र मेडिकल उपकरणे आणि त्या परमेश्वररूपी डॉक्टरांच्या हातांची कमालच त्या व्यक्तीला आता वाचवू शकत असते. NICU मध्ये देखील त्या नवजात बाळाचा जन्म आणि मृत्यूशी संघर्ष सुरू असतो.

ICU प्रमाणे NICU देखील संपूर्ण काचेच्या आत बंदिस्त असा विभाग असतो. त्यामध्ये कोणत्याही नातेवाईकाला आत मध्ये जात येत नाही. फक्त डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकारी या NICU मध्ये जाऊ शकतात. नातेवाईक आणि आप्तेष्ठ फक्त डॉक्टरांनी परवानगी दिली तरच पेशंट सोबत भेटू शकतात अन्यथा आपल्याला पेशंट फक्त काचेतून बघता येते.

NICU मधील मेडिकल उपकरणे

NICU हे नवीन तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज असते. पेशंट ला बाहेरील वातावरण पासून अगदी वेगळे मात्र जिवंत ठेवण्यासाठी या सर्व उपकरणांची मदत होत असते.

व्हेंटिलेटर –

आपण अनेकदा कोरोना काळात रुग्णांना व्हेंटिलेटर गरजेचे आहे आणि व्हेंटिलेटर भेटत नाहीये यासारख्या गोष्टी ऐकल्या असतील. जेव्हा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा एखादा पेशंट कोमा सारख्या परिस्थितीत जातात तेव्हा त्या रुग्णांना बाहेरून ऑक्सिजन पुरवठा करणे गरजेचे असते आणि हे महत्वाचे काम व्हेंटिलेटर करते.

फिडिंग ट्यूब –

इतर रुग्णांप्रमाणे ICU मधील रुग्ण हे कधी कधी हालचाल सुद्धा करू शकत नाहीत आणि त्यामुळेच या ICU मधील रुग्णांसाठी अन्न पुरवठा करण्यासाठी ही ट्यूब वापरलेली असते. फिडिंग ट्युबचे वैशिष्ट्य म्हणजे यातून तुम्ही द्रवरूप अन्न त्या पेशंटला देतात. ही फिडिंग ट्यूब नाकातून किंवा तोंडातून आत टाकलेली असते.

हार्ट मॉनिटर –

आपण अनेक चित्रपटात बघितले असेल की एक स्क्रीनवर आपल्याला हार्टबीट लाईन बघायला मिळतात. याच लाईन आणि त्यामधून येणारा बीप चा आवाज हा डॉक्टरांना पेशंटची स्थिती जाणून घ्यायला मदत करत असतो. हार्ट बिट्स कशा सुरू आहेत आणि त्या थांबल्या तर या उपकरणाने डॉक्टरांना समजते.

पल्स ऑक्सिमिटर –

कोरोना काळात आपल्या सर्वांच्या घरात हे उपकरण छोट्या आकारात उपलब्ध झालेले असेल. किंवा आपण कमीत कमी आशा सेविकांना हे उपकरण घेऊन बघितले असेल. आपल्या बोटाच्या वर हे उपकरण लावून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्याचे काम हे पल्स ऑक्सिमिटर करते. NICU मध्ये हे उपकरण देखील असते मात्र त्याचा डिस्प्ले हा एखाद्या स्क्रीनवर असतो.

डायलिसिस –

लहान बालकांना याची गरज पडत नाही मात्र ICU मध्ये हे उपकरण असते.

NICU ची गरज केव्हा पडते?

  •  नवजात अर्भक जर काही प्रतिसाद देत नसेल तर त्याला NICU मध्ये दाखल केले जाते.
  • नवजात अर्भक नाजूक स्थिती मध्ये असेल तर त्याला NICU मध्ये दाखल करावे लागते.
  •  बालकाचे वजन प्रमाणापेक्षा कमी असेल तर देखील त्याला NICU मध्ये भरती करतात.
  •  बालकाचा जन्म होताना काही आघात झाला किंवा रक्त जास्त गेले असेल तर त्याला NICU मध्ये आईसोबत ठेवले जाते.
  •  नवजात शिशु जन्म झाल्यानंतर लगेच बाहेर न काढता त्याला काही काळ वातावरनासोबत जुळवून घेता यावे यासाठी NICU मध्ये ठेवले जाते. उपकरण लावलेले नसतात मात्र काचेच्या आवरणात हे अर्भक ठेवले जाते.

FAQ

ICU चे विशेष विभाग कोणते आहेत?

ICU मध्ये NICU, PICU, CCU, MICU हे काही विशेष विभाग आहेत. आजार आणि रुग्णांचे प्रकार यानुसार कोणत्या प्रकारचा ICU योग्य आहे ते ठरविले जाते.

ICU मधील पेशंट साठी किती खर्च येतो?

पेशंट जर आयसीयू मध्ये ठेवलेले असेल तर त्याला कोणते उपकरण वापरले जाते आहे त्यानुसार दिवसाला 20 हजार रुपये ते 50 हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो.

NICU चा Full Form काय आहे?

NICU शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Neonatal Intensive Care Unit असा आहे. यालाच मराठी भाषेत अर्भक अति दक्षता विभाग म्हणून ओळखतात.

NICU मध्ये कोणती उपकरणे असतात?

सामान्य ICU प्रमाणे सर्व उपकरणे म्हणजेच पल्स ऑक्सिमिटर, हार्ट मॉनिटर, छोटे व्हेंटिलेटर आणि ईसीजी मशीन NICU मध्ये देखील असतात.

Leave a Comment