एनजीओ फुल फॉर्म NGO Full Form In Marathi

NGO Full Form In Marathi अनेकदा आपण NGO हा शब्द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा वृत्तपत्रांमधून त्यांच्या कामाच्या माध्यमातून ऐकत असतो. NGO हा समाजाचा एक असा घटक असतो ज्याला समाजाला काहीतरी देणं लागतंय याची जाणीव असते आणि त्यांना हे समाजाच ऋण फेडण्यासाठी काम करायचे असते म्हणून ते NGO स्थापन करतात. आज आपण NGO म्हणजे काय, NGO चा फुल फॉर्म काय आहे, NGO चे प्रकार काय असतात, NGO ला निधी कुठून मिळतो, NGO काय कार्य करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

NGO Full Form In Marathi

एनजीओ फुल फॉर्म NGO Full Form In Marathi

NGO Full Form in Marathi । NGO Long Form in Marathi

NGO ही संकल्पना शासकीय कामकाज सोबत कुठल्याही प्रकारे संबंध न ठेवता लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी पुढे आलेल्या व्यक्तींचा एक समूह असतो.

NGO शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Non Governmental Organisation (नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन) हा आहे. NGO शब्दाचा मराठी भाषेत full form हा अशासकीय संस्था असा होतो.

NGO म्हणजे काय? – What is NGO in Marathi?

NGO म्हणजे अशासकीय संस्था हे तर आपल्या सर्वांना समजले असेलच मात्र याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात. NGO ही एक शासनाच्या कोणत्याही विभागाच्या अंतर्गत नसते आणि या गैर शासकीय संस्थेचे कार्य हे ना नफा ना तोटा या तत्वावर चालते.

देशात आणि संपूर्ण जगात ज्या समस्या आहेत त्यांच्यावर उपाययोजना आणि समाधान करण्याचे काम या NGO संस्थांमार्फत होत असते. NGO या संस्थांना नागरी संस्था म्हणून देखील ओळखले जाते.

NGO हा देखील व्यक्तींचा एक विशेष समूह असतो. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असू शकतो किंवा यामध्ये राष्ट्रीय स्तरावर देखील समूह असू शकतात. एकाच कारणासाठी अनेक लोक एकत्र येतात आणि त्या कारणासाठी हे सर्व लोक काम करत असतात. पुढे जाऊन त्यांचे कार्य अधिकृत व्हावे यासाठी NGO म्हणून त्यांना रजिस्टर करावे लागते.

NGO चे कार्य – Functions of NGO

NGO हा विविध लोकांचा समूह एकाच कार्यासाठी एकत्र आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक NGO चे कार्य हे वेगवेगळे असू शकते.

  • र्यावरण रक्षणासाठी विविध मोहिमा घेऊन संवर्धन करणे.
  •  गडकिल्ल्यांच्या आणि पर्यटन स्थळांवर असलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे.
  •  ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करणे.
  •  शिक्षण क्षेत्रात सेवा देणे.
  •  गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत असणे.
  •  गरजू लोकांच्या पोटाचा प्रश्न सोडविणे आणि त्यासाठी त्यांना रोजगार देणे.
  •  विधवा आणि असहाय्य महिलांना निवारा आणि रोजगार देणे.
  •  अनाथ मुले व वृद्ध व्यक्तींसाठी आश्रम उभारणे.
  •  आरोग्य संदर्भात गरजूंना मदत करणे.
  •  समाजातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष ठेवून असणे. त्यांच्या उध्दारासाठी प्रयत्नशील असणे.
  •  पर्यावरण आणि समाजातील इतर सर्व समस्यांवर उपाययोजना करणे. त्यासाठी समाजात जनजागृती करून कृतीला सुरुवात करणे.

NGO साठी निधी कसा मिळतो? – How does NGO get Funding?

NGO संस्थांना निधी मिळविणे कधी कधी कठीण असते. जर NGO म्हणून नोंदणी केलेली असेल तर NGO संस्थांना सरकार कडून काही प्रमाणात निधी दिला जातो. मात्र तो त्यांच्या कार्यासाठी पुरेसा नसतो.

NGO निधी गोळा करण्यासाठी त्यांच्याकडे सदस्य म्हणून नोंदणी करणाऱ्या व्यक्तीकडून सदस्यत्व फी जमा करतात. याशिवाय अनेक व्यक्ती NGO च्या कार्यसाठी देणगी देखील देत असतात. NGO ही एक संस्था असते आणि त्यामुळे बचत गटाप्रमाणे NGO कडून काही वस्तू निर्मिती करून आणि त्यांची विक्री करून देखील पैसे गोळा केले जातात.

NGO कार्य कसे करतात? – How does NGO work?

NGO मध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्याद सदस्य असू शकतात. वर माहिती दिल्या प्रमाणे NGO या संस्था लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असतात आणि त्यामधून त्यांना कोणताही नफा मिळेल याची आशा नसते. NGO म्हणून एखाद्या संस्थेने रजिस्टर करून कार्य केले पाहिजे असा आपल्याकडे कोणताही नियम नाही. आपण NGO म्हणून आपल्या संस्थेला रजिस्टर न करता सुद्धा समाजासाठी चांगले कार्य करू शकतात.

NGO म्हणून नोंदणी केल्याचा एकच फायदा असतो की आपल्याला जो निधी स्वतः जाऊन जमवावा लागतो त्याऐवजी सरकार कडून देखील संस्थांना निधी दिला जातो. निधी हा एक मुद्दा बाजूला ठेवला तर तुमचे कार्य तुम्ही नोंदणी न करता देखील करू शकतात.

NGO चे प्रकार – Types of NGO

NGO चे नोंदणी वरून 2 प्रकार पडतात.

1. रजिस्टर केलेले NGO – रजिस्टर केलेले NGO हे शासकीय कामकाजात रजिस्टर केलेले असतात आणि त्यामुळे सरकार कडून देखील या NGO ना काहीप्रमाणात निधी दिला जातो.
2. रजिस्टर न केलेले NGO – या NGO ची कुठेही नोंद नसते. सरकार किंवा इतर संस्था यांचा या NGO सोबत कुठल्याही प्रकारे संबंध नसतो.

जागतिक बँकेने निधी देण्यासाठी NGO चे मुख्य 2 गट पाडलेले आहेत. त्यानुसार या गटांमध्ये निधी दिला जातो.

1. ऑपरेशनल एनजीओ – हे NGO मुख्य कामाच्या ठिकाणी जाऊन कार्य करत असतात.
2. अडव्हॉकेसी एनजीओ – हे NGO फक्त एखाद्या गोष्टीवर आपले मत मांडण्याचे किंवा एखाद्या समस्येवर उपायांची जनजागृती करण्याचे कार्य करत असतात.

कार्यानुसार आणि सरकारच्या समर्थनानुसार NGO चे खालील काही प्रकार पडतात.

1. GONGO – GONGO चा फुल फॉर्म हा Government Organized Non Governmental Organisation असा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा NGO कार्यरत असतो. त्यांचे काम हे एखाद्या दबल्या जाणाऱ्या देशाची वकिली करणे हे असते.
2. ENGO – ENGO चा फुल फॉर्म हा Environmental Non Governmental Organisation असा होतो. पर्यावरण क्षेत्रात सर्व कार्य करणाऱ्या NGO या ENGO प्रकारात मोडतात.

FAQ

NGO म्हणजे काय?

NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन होय. मराठीमध्ये NGO म्हणजे अशासकीय संस्था होय.

NGO निधी कुठून गोळा करतात?

NGO हे सरकार कडून, सदस्यत्व फी म्हणून, वस्तूंची विक्री करून आणि देणगी मधून निधी गोळा करत असतात.

NGO हे नफा तत्वावर सुरू करता येतात का?

NGO हे ना नफा ना तोटा तत्वावर सुरू असतात असे बोलले जाते मात्र अनेक NGO या नफा तत्वावर सुरू असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैर नाही.

NGO सुरू करण्यासाठी किती सदस्य असावे लागतात?

NGO ची सुरुवात करण्यासाठी कमीत कमी 7 सदस्य असणे गरजेचे असते.

Leave a Comment