एनसीव्हीटी फुल फॉर्म NCVT Full Form In Marathi

NCVT Full Form In Marathi व्यावसायिक प्रशिक्षण देणारी NCVT ही एक सर्वात मोठी संस्था आहे. व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी संपूर्ण भारतात केंद्र स्तरावर काम करणारी ही एक संस्था आहे. आपल्याला ITI माहिती असेल मात्र या ITI शिक्षण संस्था NCVT आणि SCVT अंतर्गत सुरू असतात याविषयी शक्यतो माहिती नसते. NCVT म्हणजे काय, NCVT चा फुल फॉर्म काय आहे, NCVT आणि SCVT यामध्ये काय फरक आहे, NCVT MIS काय आहे सारख्या सर्व संकल्पना समजून घेणार आहोत.

NCVT Full Form In Marathi

एनसीव्हीटी फुल फॉर्म NCVT Full Form In Marathi

NCVT Full Form in Marathi | NCVT Long Form in Marathi

व्यावसायिक अभ्यासक्रम क्षेत्रात ITI विषयी आपल्याला माहिती असेल. इंजिनिअरिंग पेक्षा काही काळापासून या शिक्षणाला जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. ITI संबंधित असलेल्या NCVT या संस्थेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

NCVT शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा National Council of Vocational Training (नॅशनल कौन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग) असा होतो. NCVT चा मराठी भाषेत Full Form हा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद असा होतो.

NCVT म्हणजे काय? What is NCVT in Marathi?

NCVT ही केंद्र सरकारने स्थापन केलेली एक परिषद आहे. NCVT म्हणजे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग होय. NCVT ही परिषद ITI सारख्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाची मानके आणि धोरणे निर्धारित करतात.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि त्यासंबंधित जी कार्ये आहेत त्याविषयी भारत सरकारला सल्ला देण्याचे महत्वाचे कार्य NCVT मार्फत केले जाते. संपूर्ण भारतात ट्रेड टेस्ट आणि ट्रेड विषयी प्रमाणपत्र देण्याचे काम NCVT मार्फत केले जाते.

NCVT चा इतिहास – History of NCVT

भारतात केंद्र सरकार द्वारे NCVT या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1956 मध्ये NCTVT म्हणजेच The National Council of Training in Vocational Trades या नावाने या संस्थेची स्थापना झाली. पुढे जाऊन या संस्थेला NCVT या छोट्या नावाने ओळख मिळाली.

आपण 1956 ला जरी NCVT चा उदय म्हणत असलो तरी देखील 1951 पासून याला सुरुवात झालेली आहे. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एड्युकेशन अंतर्गत एका समितीची तेव्हा स्थापना करून जे कार्य आज NCVT करते ते सर्व त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपल्याकडे रोजगार आणि कामगार मंत्रालयात एखाद्याला नोकरी करायची असेल तर त्याच्याकडे याच NCVT कडून मिळणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

NCVT आणि SCVT मध्ये काय फरक आहे?

NCVT आणि SCVT यामध्ये तसा काही फारसा फरक नाहीये. केंद्र स्तरावरील सर्व आयटीआय कॉलेजला एक उच्च स्तरीय गव्हरनिंग बॉडी म्हणजे NCVT तर राज्य स्तरावरील सर्व ITI कॉलेजला सांभाळणारी गव्हरनिंग बॉडी म्हणजे SCVT होय.

केंद्र सरकारने SCVT बनविण्याचा अधिकार राज्यांना दिला असल्याने यामध्ये तशी जास्त तफावत नाहीये. तुम्हाला मिळणारे प्रमाणपत्र हे NCVT चे आहे की SCVT चे याचा आणि तुमच्या नोकरीचा काही संबंध नसतो. दोन्ही प्रमानपत्रांना एकाच दर्जाचे ग्राह्य धरले जाते.

NCVT MIS म्हणजे काय?

NCVT MIS हा शब्द सध्या अनेकांना ऐकलेला असेल. तर NCVT MIS म्हणजे NCVT Management Information System (मॅनेजमेंट इंफॉर्मशन सिस्टम) होय.

हे एक MIS पोर्टल आहे. यावर विद्यार्थ्यांना NCVT कडून मिळणाऱ्या सर्व प्रमाणपत्र कोर्सेस विषयी माहिती देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे पोर्टल बनविण्यात आले असून यावर कोर्सेस संदर्भात सर्व माहिती उपलब्द करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

NCVT MIS पोर्टल वर विद्यार्थ्यांसाठी कोणते आयटीआय कॉलेज उपलब्ध आहेत, कोणते इंजिनिअरिंग ट्रेड शिकवतात, कोणते नॉन इंजिनिअरिंग ट्रेड शिकवतात याविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

विद्यार्थ्यांसाठी इथे एक डाटाबेस उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना या पोर्टल वर आधी ENROLL करावे लागते आणि त्यानंतर मग त्यांना पुढे प्रवेश मिळवता येतो.

NCVT ऑफिशियल वेबसाईट

केंद्र सरकार कडून त्यांच्या NCVT या परिषदेसाठी माहिती पुरविणारे एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ncvtmis.gov.in या ऑफिशियल संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या पोर्टलवर भेट देऊ शकतात.

NCVT अंतर्गत प्रमाणपत्र कोर्स NCVT अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये कोर्स आणि प्रमाणपत्र दिले जातात. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

NCVT आयटीआय कोर्सेस

  • फिटर
  •  साईट इंजिनिअरिंग
  •  इलेक्ट्रिकल
  •  वायरमन
  •  ड्राफटमन सिव्हिल व मेकॅनिकल
  •  वेल्डर
  •  ऑटोमोबाईल
  •  टर्नर
  •  डीझल मेकॅनिक
  •  ऍकसेस कंट्रोल इंस्टालेशन
  •  सीसीटीव्ही इंस्टालेशन ऑटोमेशन
  •  NIBA बिल्डिंग ऑटोमेशन कोर्स
  •  फायर डिटेक्शन अलार्म सिस्टम
  •  सीसीटीव्ही सर्व्हिलन्स सिस्टम
  •  गॅस सप्रेशन सिस्टम
  •  NCAP – इंडस्ट्रीयल ऑटोमेशन प्रोफेशनल
  •  PGDLA – पोस्ट ग्रॅड्युएशन डिप्लोमा इन ऑटोमेशन
  •  NACAPE – सर्टीफाईड ऑटोमेशन इलेक्ट्रिकल सिस्टम मेकॅनिकल कोर्सेस
  •  कॉम्प्युटर बेसिस हार्डवेअर अँड मेंटेनन्स
  •  सर्व्हर इन्ट्रोडक्शन
  •  सीसीएनए (CCNA)
  •  नेटवर्क इसेनशीएल
  •  विंडोस सर्व्हर 2008 ते 2012
  •  एक्सचेंज सर्व्हर 2010
    आर्किटेक्चर आणि सिव्हिल कोर्सेस
  •  CREO पॅरामेट्रिक
  •  सॉलिड वर्क्स
  •  कॅशिआ (CATIA)
  •  NX CAM
  •  NX NASTRAN
  •  ANSYS
  •  हायपरमेश (Hypermesh)
  •  PPM कोर्स ऑटोकॅड
  •  रेव्हिट आर्किटेक्चर
  •  PERL लँग्वेज
  •  STAAD Pro
  •  ऑटोकॅड सिव्हिल 3D
  •  मॅक्स फॉर इंजिनिअर / आर्किटेक्टस
  •  प्रो स्टील नेटवर्क अँड हार्डवेअर
  •  कॉम्प्युटर बेसिक हार्डवेअर अँड मेंटेनन्स
  •  सर्व्हर इन्ट्रोडक्शन

FAQ

NCVT कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालते?

NCVT हे भारत केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत चालते.

NCVT चे ऑफिशियल संकेतस्थळ कोणते आहे?

ncvtmis.gov.in हे भारत सरकारच्या NCVT MIS पोर्टलचे ऑफिशियल संकेतस्थळ आहे.

NCVT सोबत संपर्क करण्यासाठी पत्ता काय आहे?

NCVT ऑफिस, करोल बाग (मुख्य कार्यालय)
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय,
कौशल भवन, बी 2 पुसा रोड, करोल बाग मेट्रो स्टेशन जवळ,
पिलर क्रमांक 95, नवी दिल्ली, दिल्ली पिन- 110001
संपर्क क्रमांक- 01204405610

NCVT आणि ITI यांचा संबंध काय आहे?

ITI ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था NCVT अंतर्गत चालते. म्हणजेच आपण आयटीआय केल्यानंतर जे ट्रेड प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येते ते NCVT कडून दिले जाते.

Leave a Comment