एनएबीएच फुल फॉर्म NABH Full Form In Marathi

NABH Full Form In Marathi भारतात आरोग्य आणि आरोग्याविषयी सुविधांना मान्यता देणारे किंवा त्यांचा दर्जा ठरविणारे एक संघटन आहे त्याला आपण NABH म्हणून ओळखतो. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण NABH म्हणजे काय, NABH चा फुल फॉर्म काय आहे, NABH आणि आंतरराष्ट्रीय संबंध, NABH चे उद्दिष्टये, आणि NABH विषयी इतर काही माहिती जाणून घेणार आहोत.

NABH Full Form In Marathi

एनएबीएच फुल फॉर्म NABH Full Form In Marathi

NABH Full Form in Marathi । NABH Long Form in Marathi

NABH शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा National Accreditation Board for Hospitals and Healthcare Providers (नॅशनल अक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर) असा आहे. NABH शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा हॉस्पिटल आणि हेल्थ केअर प्रदात्यासाठी राष्ट्रीय मान्यताप्राप्त मंडळ असा होतो.

NABH म्हणजे काय? – What is NABH?

NABH म्हणजे नॅशनल अक्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर होय. आरोग्याच्या संबंधीत ज्या काही संघटना किंवा हॉस्पिटल आहेत त्यांना स्थापनेसाठी आणि त्यांचा कार्यभार चालविण्यासाठी एक नियंत्रण करणारी संघटना म्हणजे NABH होय.

भारतीय संविधानाच्या अनुसार क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या गुणवत्ता परिषदेच्या अंतर्गत NABH एक संविधानिक मंडळ म्हणून कार्यरत असते.

2005 मध्ये NABH ची स्थापना करण्यात आली. भारतातील दवाखान्यांसाठी मान्यता देण्याचे कार्य NABH कडून होते. सर्वसामान्य जनतेला योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि आपल्याकडे आरोग्याच्या बाबतीत एक वेगळा मानदंड प्रस्थापित व्हावा यास्तयासाठी NABH संघटन हे कार्यरत असते.

NABH ही संस्था म्हणजे अशी संघटना आहे जी देशातील सर्वोच्च स्तरावर आरोग्य आणि आरोग्य सेवांवर सुधारणेसाठी लक्ष ठेवून असते. जगातील आरोग्यविषयक जे मानदंड आहेत त्यांचे पालन करण्याचे महत्वाचे कार्य हे NABH मार्फत केले जाते. हॉस्पिटल्स आणि आरोग्य संघटनांना मान्यता देण्यासाठी NABH कडे अर्ज करावा लागतो. NABH हे सर्व कार्य करत असताना आरोग्य सेवा गरजेच्या असणाऱ्या रुग्णांचा आणि सेवेच्या गुणवत्तेचा विचार करत असते.

NABH आणि आंतरराष्ट्रीय संबंध – NABH and International Connections

NABH ही संघटना देशातील आरोग्य आणि आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्थांच्या मान्यता आणि मानदंड ठरवत असते. भारतात आरोग्य विषयक अधिकाधिक सुधारणा व्हाव्यात यासाठी NABH बोर्डाची स्थापना करण्यात आली. भारतात जेवहा गुणवत्ता परिषदेची स्थापना झाली तेव्हाच एक मूलभूत भाग म्हणून NABH ची स्थापना करण्यात आली होती.

  • NABH ही संघटना QCI चा एक अविभाज्य घटक तर आहेच मात्र इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थ केअर (ISQua) चा ही सदस्य आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य विषयक मानक ठरविण्याचे कार्य हे ISQua करते. त्यामुळे भारताला देखील ISQua चे मानक पाळावे लागतात.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर ASQua म्हणजेच एशियन सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थ केअर मध्ये देखील भारत सदस्य आहे. म्हणजे NABH आणि ASQua या संघटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

NABH ची उद्दिष्टे – Missions of NABH

NABH ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे आरोग्य विषयक पुरवणी कार्य आहे. आंतरराष्ट्रीय मानकांच्या मानदंड अनुसार भारतात देखील एक चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्टय NABH चे आहे.

फक्त मानके आणि मानदंड यांच्यामध्ये अडकून न राहता रुग्णांची सेवा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या सुविधांची गुणवत्ता नियंत्रित ठेवण्यासाठी NABH कडून अनेक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये हिताचे आणि मान्यता देणारे कार्यक्रम मुख्यतः चालविले जातात.

  • आरोग्यविषयक सेवा आणि सुविधांच्या उपायांची सुरुवात करणे
  • नर्सिंग क्षेत्रात अधिकधिक सुधारणा घडविण्यासाठी कार्यरत असणे.
  • प्रयोगशाळांना प्रमानित करणे
  • सर्व आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या ठिकाणी सुधारणा करणे आणि त्यानुसार मानके ठरविणे
  • समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी सामाजिक स्तरावर व्याख्याने, जाहिराती आणि कार्यशाळा आयोजित करणे.

NABH ची आवश्यकता – Need of NABH

आजच्या  परिस्थितीत आरोग्य सेवा हा व्यवसाय बनत चालला आहे. त्यामुळे या व्यवसायाला एक सेवेचे आणि चांगल्या दर्जाच्या गुणवत्तेचे स्वरूप देण्यासाठी NABH ची आवश्यकता नक्की आहे.

प्रत्येक रुग्णाला मिळणारी सेवा ही उच्च दर्जाची आणि भारतात ठरवून दिलेल्या मानकांच्या वरच असावी यासाठी NABH सदैव कार्यरत असते. NABH अंतर्गत हॉस्पिटल्सला मान्यता देण्याचे सर्वात महत्वाचे काम केले जाते आणि यामुळे बोगस, सेवांच्या बाबतीत दिरंगाई किंवा हलगर्जी करणारे हॉस्पिटल उभे राहत नाही.

NABH मान्यताप्राप्त आरोग्य संस्था – NABH Accredited Healthcare Providers

भारतात एकूण 350 दवाखान्यांना NABH कडून मान्यता मिळालेली आहे. ही आकडेवारी काही काळ जुनी असल्याने यामध्ये बदल होऊ शकतो. 521 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आज NABH मान्यता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

यामध्ये अनेक ब्लड बँका, ब्लड स्टोरेज सेंटर, एमआयएस, डेंटल हेल्थकेअर, अलोपॅथी क्लिनिक, आय क्लिनिक, पंचकर्मा क्लिनिक आणि वेलनेस सेंटर सहभागी आहेत.

NABH हॉस्पिटल मान्यता प्रक्रिया – NABH Accreditation Procedure for Hospitals

हॉस्पिटल ला आपल्याला NABH मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी NABH च्या संकेतस्थळावर जाऊन तिथून अँप्लिकेशन्स फॉर्म भरावा. यासाठी तुम्हाला काही अटींची आदगी पूर्तता करावी लागेल.

50 बेडस पेक्षा जास्त बेडस व्यवस्था असेल तर असे हॉस्पिटल HCO म्हणजेच हेल्थकेअर ऑर्गनायझेशन म्हणून आणि 50 पेक्षा कमी बेड असतील तर SHCO म्हणून रजिस्टर करता येतात. NABH मान्यता घेत असताना त्यांच्या सर्व अटी मान्य करणे आणि पुढे देखील NABH मानकांप्रमाणे सेवा देणे बंधनकारक असते.

FAQ

NABH चे उद्दिष्ट्य काय आहे?

रुग्णांना सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविणे हे NABH चे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे.

हॉस्पिटल्स ला NABH ची गरज का असते?

हॉस्पिटलमध्ये मध्ये उत्तम दर्जाच्या आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या सेवा देण्यासाठी वचनबद्धता आहे हे या NABH मानांकना मधून कळते. त्यामुळे याचा फायदा रुग्णांचा विश्वास जिंकण्यासाठी हॉस्पिटल्सला होतो.

भारतात NABH मान्यता प्राप्त किती हॉस्पिटल्स आहेत?

भारतात 350 हुन अधिक हॉस्पिटल्सला NABH ची मान्यता प्राप्त झालेली आहे.

भारतातील NABH मान्यताप्राप्त सर्वोत्तम हॉस्पिटल कोणते आहे?

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे हॉस्पिटल भारतातील NABH मान्यताप्राप्त सर्वोत्तम हॉस्पिटल आहे.

Leave a Comment