एम.टी.एस फुल फॉर्म MTS Full Form In Marathi

MTS Full Form In Marathi आजच्या लेखामध्ये आपण एम.टी.एस परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण एम.टी.एस चा फुल्ल फॉर्म, एम.टी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, एम.टी.एस परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा मासिक पगार, एम.टी.एस परीक्षेविषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे,इत्यादी विषयांची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एम.टी.एस परीक्षेचा फुल्ल फॉर्म आणि एम.टी.एस परीक्षेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

MTS Full Form In Marathi

एम.टी.एस फुल फॉर्म MTS Full Form In Marathi

एम.टी.एस फुल्ल फॉर्म (MTS full form)

एम.टी.एस चा फुल्ल फॉर्म हा “मल्टी टास्किंग स्टाफ” असा होतो. “मल्टी टास्किंग स्टाफ” म्हणजे एम.टी.एस ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते ,तसेच एम.टी.एस ची परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी भाषे सोबत १३ अन्य भाषांमध्ये घेतली जाते. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणे कठीण जाते ,ते एम.टी.एस ची परीक्षा हिंदी माध्यमातून देखील देऊ शकतात.

एम.टी.एस ही एक परीक्षा आहे जे की एस.एस.सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते आणि एम.टी.एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड एस.एस.सी द्वारे गैर राजपत्रित ,सरकारी कार्यालयांमध्ये ,गैर मंत्रालयामधील क्लास सी पदांसाठी केली जाते. एस.एस.सी संघटन हे  एम.टी.एस परीक्षे सोबत एस.एस.सी सी.जी.एल

एस.एस.सी एम.टी.एस कॉन्स्टेबल, एस.एस.सी जेई यांसारख्या परीक्षा देखील आयोजित करते.

आपल्या समाजामधील काही लोकांचा असा समज आहे की ,जे १० वी पर्यंत शिकले आहे आणि काही कारणामुळे ते पुढे शिकू शिकले नाही ,अशा लोकांना सरकारी नोकरी मिळू शकत नाही ; परंतु १० वी उत्तीर्ण झालेले उमेदवार एस.एस.सी द्वारे आयोजित करण्यात येणारी एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण करून चांगल्या पदावर नोकरी करू शकतात.

एम.टी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for MTS exam in Marathi)

१) एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारत ,नेपाल ,भूतान या देशांचा नागरिक असला पाहिजे. या देशा व्यतिरिक्त इतर देशांचे नागरिक एम.टी.एस ची परीक्षा देऊ शकत नाहीत.

२) एम.टी.एस च्या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्ष ते २५ वर्ष इतकी असली पाहिजे. तसेच एम.टी.एस च्या काही पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये उमेदवारांची आयुसीमा ही १८ वर्षे ते २७ वर्ष इतकी असते.

३) एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असला पाहिजे. १० वी उत्तीर्ण नसलेले उमेदवार एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरतात.

एम.टी.एस परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्यांचा मासिक पगार ( Monthly Salary of MTS exam passed candidate in Marathi )

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांचा मासिक पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो आणि जसे जसे त्यांचा अनुभव वाढत जातो ,तसा तसा त्यांचा मासिक पगार देखील वाढत जातो. 

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांचा पगार हा साधारण १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये इतका असतो. काही केसेस मध्ये एम.टी.एस परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्या उमेदवारांचा मासिक पगार हा ५७,००० रुपये पेक्षा जास्त देखील असतो.

FAQ

एम.टी.एस चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एम.टी.एस चा फुल्ल फॉर्म “मल्टी – टास्किंग स्टाफ” असा आहे.

एम.टी.एस ची परीक्षा कोणाद्वारे आयोजित केली जाते ?

एम.टी.एस ची परीक्षा ही एस.एस.सी आयोगाद्वारे आयोजित केली जाते.

एम.टी.एस ची परीक्षा कोणकोणत्या भाषेतून घेतली जाते ?

एम.टी.एस ची परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी सोबत १३ अन्य भाषेतून आयोजित केली जाते.

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड कोणकोणत्या पदांसाठी केली जाते ?

एम.टी.एस च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड एस.एस.सी द्वारे विविध पदांसाठी केली जाते. या पदांमद्ये गैर राजपत्रित ,सरकारी कार्यालयामधील ,गैर मंत्रालयामधील क्लास सी पदांचा समावेश असतो.

एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष काय असतो ?

एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी सर्वप्रथम उमेदवार हा भारत ,नेपाल ,भूतान या देशांचा नागरिक असला पाहिजे. तसेच उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असला पाहिजे. याचसोबत एम.टी.एस ची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराची आयुसीमा ही १८ वर्ष ते २५ वर्षे इतकी असली पाहिजे. एम.टी.एस च्या काही पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी असणारी आयुसीमा ही १८ वर्ष ते २७ वर्ष इतकी असते.

एम.टी.एस च्या परीक्षेची फी किती असते ?

एम.टी.एस च्या परीक्षेची फी १०० रुपये इतकी असते.

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा मासिक पगार किती असतो ?

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पदावर कार्यरत होणाऱ्या उमेदवारांचा मासिक पगार हा विविध गोष्टींवर आधारित असतो ; परंतु एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मासिक पगार हा साधारण १८,००० रुपये ते ५६,९०० रुपये इतका असतो.

एम.टी.एस ची परीक्षा ही एका वर्षामध्ये किती वेळा आयोजित केली जाते ?

एम.टी.एस ची परीक्षा ही एका वर्षामध्ये एका वेळीच आयोजित केली जाते.

एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण करणे सोपे असते की अवघड असते ?

तुम्ही जर मनलावून एम.टी.एस च्या परीक्षेचा अभ्यास केला तर ,तुम्ही एम.टी.एस ची परीक्षा उत्तीर्ण करू शकता.

२०२४ मध्ये कोणत्या महिन्यामध्ये एम.टी.एस ची परीक्षा होणे अपेक्षित आहे ?

२०२४ मध्ये जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये एम.टी.एस ची परीक्षा होऊ शकते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण एस.एस.सी द्वारे घेण्यात येणाऱ्या एम.टी.एस परीक्षे लविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एम.टी.एस चा फुल्ल फॉर्म ,एम.टी.एस परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष,एम.टी.एस परीक्षा उत्तीर्ण करून पदावर कार्यरत असणाऱ्यांचा मासिक पगार, एम.टी.एस परीक्षेविषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे,इत्यादी विषयांची सविस्तर माहिती पाहिली. 

संदर्भ (References)

१)https://www.google.com/amp/s/testbook.com/blog/hi/ssc-mts-kya-hai/amp/

२)https://leverageedu.com/blog/hi/mts-full-form-in-hindi/

३)https://hindiprep.in/ssc-mts/

४)https://prepp.in/ssc-mts-exam/exam-pattern

५)https://hi.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97

Leave a Comment