एमएसआरटीसी फुल फॉर्म MSRTC Full Form In Marathi

MSRTC Full Form In Marathi : MSRTC  ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या नावाने महाराष्ट्रात माहीती आहे.या लेखाच्या माध्यमातून  MSRTC बद्दल अधिक जाणून घेऊया जसे की MSRTC म्हणजे काय , MSRTC चा फुल फोर्म  काय, MSRTC  स्थापना,  MSRTC इतिहास सेवा इत्यादी.

MSRTC Full Form In Marathi

एमएसआरटीसी फुल फॉर्म MSRTC Full Form In Marathi

MSRTC Full form in Marathi | MSRTC long form in Marathi

MSRTC चा मराठी मध्ये full form महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हा आहे.. MSRTC English मध्ये full form  Maharashtra State Road Transport Corporation असा हाेताे.

MSRTC ची स्थापना आणि तिहास

महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात झाली. त्यापुढे  आठ ते दहा वर्षामध्ये या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज जाणवू लागली. भारतात ब्रिटिशांची राजवट १९४७ मध्ये संपुष्टात आली.

१९४८ मध्ये स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) अधिकार या कंपनीला दिला.

१ जून १९४८ यादिवशी बीएसआरटीसीची पहिली बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर प्रवास केला .त्या बसचे पहिले चालक पुणे येथील तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे हे हाेते.

पुढे महाराष्ट्र राज्याची स्थापना राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा काम सुरू झाले.

MSRTC चा सेवा आणि विस्तार

“गाव तेथे एसटी”, “रस्ता तेथे एसटी” या ब्रीदवाक्यानुसार एसटीची सेवा खेड्यापासून शहरापर्यंत सुरू झाली आहे. एसटीचे विभागीय कामकाज महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून होते. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सेवा एसटी महामंडळाकडून पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा राज्यांत ठीकाणी विस्तार झाला आहे.

MSRTC चे आधुनिकीकरण

 एसटीने काळानुसार सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या पासून ते निमआराम गाड्यांसोबतच बस ने नव्या काळात आधुनिक सेवा पण सुरू केल्या आहेत. एसटीने डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने  बससेवा सुरू करून आजून एक पाऊल पुढे टाकले. एसटीने शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा चालवीत आहे.

महाराष्ट्रातील प्रामुख्याने महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा स्वतःच्या संकेतस्थळावरून देऊन व मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देउन एसटीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी एसटीने अनेक मार्गांवर मोफत WIFI सेवा  उपलब‌्ध करून दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे आवडते कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७पासून महामंडळाने ‘शिवशाही’ या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बस आणल्या आहेत.

MSRTC च्या महामंडळाची रचना

 संचालन

एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि १७ संचालक नेमणूक करता येता. त्यापैकी महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री अध्यक्ष हा असतो तर उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक असताे, तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर करण्यात आली आहे.

प्रशासकीय कार्यालये

मध्यवर्ती कार्यालय :

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग,  मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८

मध्यवर्ती कार्यशाळा :

१  मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.

२  मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.

३  मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.

विभागीय कार्यालय :

१ मुंबई

२ पुणे

३ नाशिक

4 औरंगाबाद

५ अमरावती

६ नागपूर

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.

MSRTC ची कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन

एकूण २२ कर्मचारी संघटना एसटी महामंडळात अस्तित्वात आहेत.  श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता देण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार  करण्याचा अधिकार या  संघटनेला प्राप्त झाला आहे.

MSRTC च्या सामाजीक बाबी

महाराष्ट्र राज्यातील एसटीची सेवा सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी  एक सामाजिक सेवा आहे. अनेक गाव आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. एसटी म्हणजे आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन. आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी मदत करावे.

MSRTC च्या याेजना

१)  त्रैमासिक पास योजना

दैनंदिन एकाच मार्गावर नोकरी,व्यवसाय व अन्य कारणांमुळे प्रवास करणारा प्रवासीसाठी महामंडळाने त्रैमासिक पास योजना सुरु केलेली आहे़

काही वैशिष्टे-

  • पास धारकास ५०% प्रवास भाडे सवलत देण्यात येते़
  • नागरीकांना २ पासपोर्ट आकाराचे फोटो व रुपये ५/- देऊन ओळखपत्र घेता येते.

२) मासिक पास योजना

या योजने अंतर्गत २० दिवसांचे परतीचे प्रवासदर आकारून  एक महिना ३० दिवसांचे  परतीचा पास करता याताे.योजनेच्या अंटी,शर्तीया त्रैमासिक पास योजनेप्रमाणेच अंसुन या योजनेअंतर्गत प्रवाशांना सुमारे ३३. ३३% प्रवास भाडे सवलतीचा लाभ होतो़

३)  वार्षिक सवलत कार्ड योजनासेवेकडे अधिक प्रवासी आवृत्र्ष्ट व्हावे म्हणून वार्षिक सवलत कार्ड योजनासुरु करण्यात आली आहे़

वैशिष्टे-

200 रुपये किमतीचे एक वार्षिक सवलत कार्ड मिळते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही आगारात  हि रक्कम जमा करून कार्ड घेता येते. यावर प्रवाशाविषयी माहिती असते आणि फोटो देखील असतो.

प्रवासात वाहकाला हे कार्ड दाखविल्यावर साध्या व निमआराम  प्रवास भाडयात प्रवाशाला १०% सुट देण्यात येते़ मात्र प्रवास १८ कि़ मी़ पेक्षा अधिक अंसणे आवश्यक आहे़ या कार्डाची वैधता १ वर्ष कालावधीकरीता आहे़.

FAQ

MSRTC चा मराठी मध्ये full form काय आहे़?

MSRTC चा मराठी मध्ये full form हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असा आहे़.

MSRTC English मध्ये full form काय आहे़?

MSRTC English मध्ये full form हा Maharashtra State Road Transport Corporation असा हाेताे.

Msrtc ची कि़ती कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत ?

२२ कर्मचारी संघटना एसटी महामंडळात अस्तित्वात आहेत

Leave a Comment