MSCIT Full Form In Marathi आता सर्व जगच जणू कॉम्प्युटर शिवाय जगू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही काळापूर्वी यासाग कॉम्प्युटर क्षेत्रात एक MSCIT हा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरची ओळख करून देणारा कोर्स समोर आला आणि खाजगी संस्थांपासून ते प्रशासकीय सेवेत सर्वांना MSCIT हा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले.
एमएससीआयटी फुल फॉर्म MSCIT Full Form In Marathi
आज आपण याच MSCIT कोर्स विषयी, MSCIT म्हणजे काय, MSCIT चा फुल फॉर्म काय आहे, MSCIT कोर्स मध्ये काय शिकविले जाते, MSCIT कोर्स साठी आवश्यक पात्रता, MSCIT कोर्सचा कालावधी, MSCIT कोर्सची फी, MSCIT नंतर नोकरी मिळण्याच्या संधी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
MSCIT Full Form in Marathi । MSCIT Long Form in Marathi
MSCIT हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम होता जो आजही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविला जातो आहे.
MSCIT शब्दाचा इंग्रजी भाषेत FULL FORM हा Maharashtra State Certificate in Technology (महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन टेक्नॉलॉजी) असा होतो. MSCIT ला तसा मराठी भाषेत Full Form नाही मात्र अर्थ सांगायचा झाला तर महाराष्ट्र शासनाचा हा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमाणपत्र कोर्स आहे.
MSCIT म्हणजे काय? – What is MSCIT in Marathi?
MSCIT हा शब्द आपल्याला इयत्ता दहावीच्या परीक्षा झाल्या की लगेच विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळत असतो. महाराष्ट्र शासनाकडून कॉम्प्युटर विषयी प्रशिक्षण देणारा MSCIT हा एक महत्वाचा कोर्स आहे. हा MSCIT कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाकडून एक प्रमाणपत्र देखील दिले जाते. हे प्रमाणपत्र आपल्या सर्वांना अनेक क्षेत्रात नोकरीसाठी उपयोगी पडत आहे.
MKCL म्हणजेच Maharashtra Knowledge Corporation Limited (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्या अंतर्गत हा MSCIT कोर्स राबविला जातो. 2001 साली महाराष्ट्र राज्य सरकारने या कोर्सला सुरुवात केली. या कोर्सचा मुख्य उद्देश्य हा सर्वांना संगणक क्षेत्रातील कमीत कमी मूलभूत माहिती करून देणे हाच होता. देश साक्षर तर होत होता मात्र देशातील प्रत्येक व्यक्तीला आयटी साक्षर बनविणे हेच ता कोर्सची ध्येय आहे.
MSCIT कोर्सचा फायदा असा आहे की तुम्हाला कॉम्प्युटर क्षेत्रात सहज यामुळे नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अनेकांना ऑफिसमध्ये एखादा डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून सुद्धा या MSCIT कोर्सच्या माध्यमातून जाता येते आहे.
MSCIT कोर्समध्ये काय शिकविले जाते? – Syllabus of MSCIT Course
MSCIT अभ्यासक्रमात खालील विषय शिकविले जातात,
- संगणकाची ओळख
- कॉम्प्युटरच्या हार्डवेअरचे सर्व भाग
- कॉम्प्युटर नेटवर्किंग विषयी माहिती
- इंटरनेट चा वापर
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सल आणि आऊटलूक सारखे टूल्स
- विंडोज विषयी माहिती (विंडोज 7 किंवा विंडोज 10)
- संगणक क्षेत्रातील जीवन कौशल्य
- प्रात्यक्षिक
- थेअरी
- ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण
MSCIT कोर्ससाठी आवश्यक पात्रता निकष – Eligibility Criteria for MSCIT Course
आयटी क्षेत्रात काम सुरू करण्यासाठी MSCIT हा एक चांगला कोर्स आहे. हा कोर्स प्रत्येक व्यक्तीला करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने यासाठी कोणत्याही प्रकारे पात्रता निकष लागू केलेले नाहीत.
सरकारणे यावर थोडंस बंधन मात्र नक्की आणलेल आहे. इयत्ता आठवी पासून पुढे शिक्षण घेणारे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात कारण त्यांना हे सर्व समजेल अशी सरकारची धारणा आहे. त्यानंतर तुमचे वय कितीही कसेल तरी तुम्ही MSCIT कोर्ससाठी पात्र आहात. MSCIT कोर्सला इतर कोणत्याही प्रकारे नियम व अटी लागू नाहीत.
MSCIT कोर्स कालावधी – Time Duration of MSCIT Course
कोर्सचा कालावधी हा 3 ते 4 महिने आहे मात्र तुम्हाला जिथे कोर्सला प्रवेश मिळाला आहे त्यानुसार या कालावधीत बदल देखील होऊ शकतो. कोर्सचा कालावधी हा तुम्हाला शिकवितात किती वेळ आणि तुम्ही ERA वर काम किती वेळ करतात यावर अवलंबून आहे. ERA वर जर तुम्हाला जास्त वेळ देता आला म्हणजेच तुमचे संगणक जर जास्त वेळ वापरता आले तर तुमचा हा कोर्स 3 महिन्यात शक्यतो पूर्ण होतो.
MSCIT कोर्सची फी – Fees for MSCIT Course
तुम्ही MSCIT कोर्स कुठे करतात यावर तुमच्या MSCIT कोर्सची फी अवलंबून आहे. MSCIT कोर्सची फी ही 4500 रुपये पासून पुढे असते. अनेकदा जर तुम्ही एखाद्या मोठ्या MSCIT सेंटर मध्ये जिथे जास्त सुविधा उपलब्ध आहेत अशा ठिकाणी प्रवेश घेतला तर तुम्हाला ही फी 6000 रुपये किंवा त्याहून थोडी अधिक सुद्धा द्यावी लागू शकते.
MSCIT कोर्स नंतर नोकरीच्या संधी – Jobs after MSCIT Course
सध्या घरी बसून अनेक व्यक्ती खूप सारा पैसे कमवत आहेत आणि त्यांच्या या घर बसल्या पैसे कमविण्याच्या पाठीमागे MSCIT सारख्या कोर्सचा हातभार नक्की आहे. संगणकाची एक सुरुवातीची ओळख हा कोर्स करून देत असतो. कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून MSCIT कोर्सचा बेसिस वर तुम्हाला एखाद्या संस्थेत जॉब नक्की मिळू शकेल.
याशिवाय डेटा एनालिटिकस, डेटा ऑपरेटर, इंटरफेस इंजिनिअर सारखे काही अजून थोडेफार कोर्सेस करून जॉब तुम्हाला मिळू शकतात.
FAQ
MSCIT हा कोर्स कशा संबंधित आहे?
महाराष्ट्र शासनाद्वारे राबविला जाणारा MSCIT हा कोर्स सर्वांना संगणकाची मूलभूत माहिती आणि साक्षरता व्हावी यासाठी बनविण्यात आलेला आहे. 2001 पासून हा कोर्स MKCL द्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविला जातो.
MSCIT चा फुल फॉर्म काय आहे?
MSCIT हा एक संगणक क्षेत्रातील कोर्स असून याचा फुल फॉर्म हा Maharshtra State Certificate in Technology असा आहे.
MSCIT कोर्स कोणाला करता येतो?
इयत्ता आठवीच्या पुढील कोणत्याही व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला हा MSCIT कोर्स करता येतो. त्यासाठी जवळच्या MKCL सेंटर सोबत तुम्हाला संपर्क करावा लागतो.
MSCIT कोर्सची फी किती असते?
MSCIT या कोर्सची साधारणतः फी ही 4500 रुपये ते 6000 रुपये इतकी असते. यामध्ये MSCIT सेंटर अनुसार बदल होऊ शकतात.
MSCIT चा पेपर हा किती मार्कांचा असतो?
MSCIT अंतर्गत ERA द्वारे तुम्हाला एकूण 50 गुण दिले जातात आणि त्यानंतर शेवटचा पेपर हा 50 गुणांचा असतो. म्हणजे तुमच्या MSCIT निकालावर 100 पैकी गुण आलेले असतात.