MSBTE Full Form In Marathi डिप्लोमा किंवा एखाद्या व्यावसायिक शिक्षणात तुम्ही असाल तर MSBTE हा शब्द अनेकदा तुम्ही ऐकलेला असेल. व्यावसायिक शिक्षणातील भरपूर निर्णय हे MSBTE अंतर्गत घेतले जातात तर आज आपण MSBTE म्हणजे काय, MSBTE चा फुल फॉर्म काय आहे, MSBTE चे क्षेत्रीय ऑफिस कुठे आहेत, MSBTE चा इतिहास, MSBTE अंतर्गत येणारी काही महाविद्यालय आणि MSBTE विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
एमएसबीटीई फुल फॉर्म MSBTE Full Form in Marathi
MSBTE Full Form in Marathi । MSBTE Long Form in Marathi
MSBTE ही महाराष्ट्र राज्य सरकार कडून चालविण्यात येणारी आणि आता स्वायत्त शिक्षण मंडळ म्हणून कार्य करणारी एक संस्था आहे.
MSBTE शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Maharashtra State Board of Technical Education (महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एड्युकेशन) असा आहे. MSBTE चा मराठी भाषेत Full Form हा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ हा आहे.
MSBTE म्हणजे काय? – What is MSBTE in Marathi?
MSBTE हे महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत येणारे एक तंत्र शिक्षण संदर्भात कार्य करणारी संस्था आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या डिप्लोमा कोर्स विषयी सर्व अधिकार या MSBTE कडे असतात. MSBTE म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एड्युकेशन होय.
MSBTE ही संस्था महाराष्ट्र राज्यात चालविल्या जाणाऱ्या डिप्लोमा कोर्सेस संबंधित कार्य करते. डिप्लोमा कोर्स क्षेत्रात बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानानुसार शैक्षणिक बदल करणे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देण्याची काम MSBTE करते. डिप्लोमा केलेल्या मुलांना स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाच्या सोबत कसे राहता येईल यासाठी MSBTE सदैव कार्यरत असते.
MSBTE ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. MSBTE हे AUTONOMOUS म्हणजेच स्वायत्त शिक्षण मंडळ आहे. MSBTE चे जुने नाव बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामिनेशन होते आणि या नावाप्रमाणे त्यांचे कार्य देखील आहे. तंत्र शिक्षण क्षेत्रात उन्हाळी आणि हिवाळी परीक्षा घेण्याचे काम हा MSBTE बोर्ड करत असतो.
MSBTE चा इतिहास – History of MSBTE
1963 साली तंत्र शिक्षणासाठी एक वेगळी संस्था असावी असा निर्णय झाला आणि त्यातून पुढे मग MSBTE ची स्थापना करण्यात आली. मात्र ही तंत्र शिक्षणाची सुरुवात आहे असे म्हणता येणार नाही कारण ब्रिटिश राजवटीच्या काळात देखील महाराष्ट्रात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे, कसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे, वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट,मुंबई आणि नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मधून तांत्रिक शिक्षण दिले जात होते. आजही हे कॉलेजेस नावाजलेली आहेत कारण त्यांना तितका मोठा इतिहास प्राप्त आहे.
ब्रिटिश राजवट संपली आणि स्वातंत्र्योत्तर काळात 1948 मध्ये भारतात DTE म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एड्युकेशन ची स्थापना करण्यात आली. मात्र या DTE अंतर्गत फक्त इंजिनिअरिंग सारखे कोर्सेस येत होते.
बदलत्या काळात महाराष्ट्रात आणि देशात व्यावसायिकरन होत गेले आणि महाराष्ट्र राज्यात अनेक डिप्लोमा कोर्सेस सुरू करण्यात आले. हे सर्व डिप्लोमा कोर्सेस DTE अंतर्गत टाकून त्या संस्थेवरील ताण वाढविण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य सरकारने बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामिनेशन ची स्थापना केली.
आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामिनेशन आम्हाला का सांगत आहेत? तर पुढे जाऊन याच बोर्ड ऑफ टेक्निकल एक्सामिनेशन चे नाव 1999 मध्ये बदलून महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एड्युकेशन करण्यात आले. 1999 साली ही संस्था स्वायत्त म्हणून कार्यभार करण्यास सुरू झाली.
MSBTE – डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया
डिप्लोमा हा अभ्यासक्रम करण्यासाठी तुम्हाला 10 वि नंतर लगेच प्रवेश मिळतो. दहावी शिक्षण झाल्यानंतर आपल्याला डिप्लोमा प्रथम वर्षाला प्रवेश घेता येतो, तर ITI सारखे कोर्सेस किंवा 12 वि शिक्षण झाले असेल तर डिप्लोमा दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो.
डिप्लोमा हा 3 वर्षांचा कोर्स असून डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री म्हणजेच इंजिनिअरिंग च्या सरळ दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक अशी प्रवेश प्रक्रिया डिप्लोमा कोर्सेस साठी राबविली जाते. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आपण जाणून घेऊयात.
- वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून द्यावा. जवळील महाविद्यालयात उभारलेल्या सुविधा केंद्रावर जाऊन हा फॉर्म कन्फर्म करून घ्यावा.
- ऑनलाइन फॉर्म भरताना त्यात कॉलेज, अभ्यासक्रम यांना पसंतीक्रमांक देणे.
- ऑनलाइन फॉर्म भरून झाला की तुम्हाला कोणते अभ्यासक्रम मिळाले आहेत किंवा कोणते कॉलेज मिळाले आहे याकडे लक्ष ठेवणे.
- ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ते कॉलेज तुम्हाला मिळाले तर त्या कॉलेजला जाऊन प्रवेश निश्चित करून घेणे.
MSBTE डिप्लोमा कोर्सचे फायदे
- इयत्ता दहावी नंतर लगेच आपल्याला आवडत्या क्षेत्रात जाण्याच्या संधी.
- 12 वि पूर्ण झाली आहे मात्र त्यात ग्रुप भरत नसेल म्हणजे PCM ला 50% पेक्षा कमी गुण असतील मात्र इंजिनिअरिंग करायची आहे तर प्रवेश मिळत नाही. तेव्हा हे विद्यार्थी सरळ डिप्लोमा च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात.
- कोणत्याही प्रकारे प्रवेश परीक्षा द्यावी लागत नाही.
- डिप्लोमा नंतर सरळ इंजिनिअरिंग च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जातो.
- 3 वर्षांचा कोर्स पूर्ण झाला की तुम्हाला लगेच खाजगी आणि सराकरी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
- ज्यांना पदवी पण घ्यायची आहे त्यांच्यासाठी 3 वर्ष पदविका आणि 3 वर्षे पदवी म्हणजे 6 वर्षात पदवी शिक्षण पूर्ण होते.
- अनेक कंपन्या आता इंजिनिअरिंग पेक्षा डिप्लोमा झालेल्या युवकांना जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत.
FAQ
MSBTE ची स्थापना कधी करण्यात आली?
ऑगस्ट 1963 मध्ये MSBTE म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एड्युकेशन ची स्थापना करण्यात आली होती.
MSBTE चे मुख्यालय कोठे आहे?
MSBTE चे मुख्यालय खेरवाडी, बांद्रा ईस्ट, मुंबई येथे आहे.
MSBTE चे ऑफिशियल संकेतस्थळ कोणते आहे?
msbte.org.in हे MSBTE चे संकेतस्थळ आहे.
MSBTE चे क्षेत्रीय कार्यालय कोणत्या विभागात आहेत?
MSBTE चे क्षेत्रीय कार्यालये ही मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये आहेत.
MSBTE चे सध्याचे डायरेक्टर कोण आहेत?
डॉ विनोद मोहितकर हे MSBTE चे सध्याचे डायरेक्टर आहेत.