(MPSC Full Form In Marathi) : स्पर्धेच्या या युगात स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक उमेदवार हे MPSC परीक्षेची तयारी करत असतात. राज्यातील अनेक सरकारी नोकरी असलेल्या पदांसाठी MPSC परीक्षा घेत असते. अनेक विद्यार्थी आपल्या लहानपणापासून म्हणजे शक्यतो इयत्ता दहावी नंतर आपले ध्येय निश्चित करून मग सरकारी नोकरी साठी MPSC परीक्षा देण्याचे ठरवतात. मात्र त्यांना आणि आपल्यापैकी अनेकांना MPSC काय आहे, MPSC चा Full Form काय आहे, MPSC परीक्षा कोणत्या पदांसाठी घेते, MPSC परीक्षेचे स्वरूप काय आहे याविषयी माहिती नसते.
एमपीएससी फुल फॉर्म MPSC Full Form In Marathi
आज आपण वरील सर्व आणि त्यासोबत MPSC सोबत निगडित इतर अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
MPSC म्हणजे काय? (What Is MPSC In Marathi)
आपण UPSC Full Form in Marathi या लेखात केंद्र स्तरावर घेतल्या जाणाऱ्या UPSC परिक्षेविषयी माहिती घेतली. UPSC प्रमाणेच पण राज्य स्तरावर MPSC परीक्षा घेत असते. अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात MPSC हा आयोग आहे.
राज्य सरकारी नोकरी अंतर्गत येणाऱ्या पदांसाठी भरती प्रक्रिया MPSC अंतर्गत चालते. गट अ पासून ते गट क पर्यंत सर्व पदांची भरती ही MPSC अंतर्गत होते. MPSC ही संस्था राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. राज्यातील उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी ही काही महत्वाची सरकारी पदे आणि त्यासोबत गट 1, गट 2 आणि गट 3 ची सर्व सरकारी कर्मचारी पदे MPSC कडून भरली जातात.
MPSC full form in Marathi । MPSC Long Form in Marathi
MPSC ही एक परीक्षा आहे असे आपण म्हणतो मात्र MPSC एक परीक्षा नसून हा आयोग आहे ज्याच्या अंतर्गत सरकारी नोकरीसाठी परीक्षा घेतल्या जातात.
MPSC चा इंग्रजी भाषेत Full Form हा Maharashtra Public Service Commission असा होतो. मराठी भाषेत या आयोगाला “महाराष्ट्र लोक सेवा आयोग’ असे म्हणतात.
MPSC साठी लागणारी पात्रता :-
MPSC परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला काही पात्रता अटींची पूर्तता करावी लागते. अनेकांना प्रश्न असतो की आपण MPSC परीक्षा देऊ शकतो का? तर तुम्ही जर या अटींची पूर्तता करत असाल तर तुम्हाला MPSC परीक्षा देता येतात.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.
- शासनाने मान्य केलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवी पूर्ण झालेली असावी.
- MPSC मध्ये देखील वयोमर्यादा आहे. उमेदवाराचे कमीत कमी वय हे 19 वर्षे असायला हवे. जाती अनुसार वयाची अट शिथिल होते. खुल्या प्रवर्गासाठी हे वय 38 वर्ष तर राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी हे वय 43 वर्षे आहे.
- तो उमेदवार हा भारताच्या नागरिकासोबत महाराष्ट्राचा मूळ रहिवासी देखील असावा. त्यासाठी उमेदवाराकडे DOMICILE CERTIFICATE असणे गरजेचे आहे.
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवार मुलाखतीला गेल्यावर त्याचे मराठी ज्ञान तपासले जाते.
MPSC कोणत्या परीक्षा घेते?
MPSC फक्त राज्य सेवा ही एकमेव परीक्षा घेत नाही. MPSC अंतर्गत अनेक विभागांच्या परीक्षा घेतल्या जातात मात्र आपल्याला कंबाईन आणि राज्य सेवा या दोन परीक्षाच माहीत आहेत. खाली MPSC अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या इतर काही परिक्षांविषयी माहिती देतो आहे.
- महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा – Maharashtra State Service Examination
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – Maharashtra Forest Service Examination
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – Maharashtra Agriculture Service Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा – Maharashtra Engineering Service group A Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा – Maharashtra Engineering Service group B Examination
- सहाय्यक परीक्षा – Assistant Examination
- लिपिक टंकलेखक परीक्षा – Clerk Typist Examination
- राज्य कर निरीक्षक परीक्षा – State Tax Inspector Examination
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा – Police Sub Inspector Examination
MPSC परीक्षेचे स्वरूप :-
MPSC अंतर्गत होत असलेल्या परीक्षा या 2 किंवा 3 टप्प्यात होतात. काही परीक्षांमध्ये मुलाखत नसतात तर काही परीक्षांमध्ये शेवटचा टप्पा हा शारीरिक चाचणी असतो.
1.पूर्व परीक्षा (Prelims)
MPSC ची पूर्वपरीक्षा ही 2 पेपर मध्ये विभागलेली आहे. प्रत्येक पेपर हा 200 मार्कांचा असतो. एकूण 400 गुणांची पूर्व परीक्षा असते. प्रत्येक पेपरला 2 तासांचा कालावधी दिलेला असतो. MPSC तर्फे या पेपरला इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांचे पर्याय दिलेले असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण कापले जातात.
2.मुख्य परीक्षा (Mains Exam)
ज्यांची पूर्व परीक्षा पास होते त्यांना MPSC दुसऱ्या टप्प्यात म्हणजे मुख्य परीक्षेला बसता येते. मुख्य परीक्षेत एकूण 6 पेपर असतात. यापैकी पाहिले दोन पेपर हे 100 गुणांचे असतात. पुढील 4 पेपर हे प्रत्येकी 150 गुणांचे असतात.
- पेपर 1: निबंध लेखन
- पेपर 2: व्याकरण
- पेपर 3: इतिहास आणि भूगोल
- पेपर 4: भारतीय संविधान आणि राजनीती
- पेपर 5: मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास
- पेपर 6: अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान
3.मुलाखत (Interview)
मुलाखत ही एकूण 100 गुणांची असते. मुलाखतीत त्या पात्र उमेदवाराचे कागदपत्र तपासले जातात. यामध्ये त्यांची वागणूक, त्याचे ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.
4.शारीरिक आणि मेडिकल चाचणी (Physical and Medical)
पोलीस खात्यातील पदांसाठी तुम्हाला शारीरिक चाचणी द्यावी लागेल. याशिवाय मेडिकल टेस्ट देखील सर्व पदांसाठी द्यावी लागते. मेडिकल फिटनेस चा संबध हा नोकरीवर रुजू झाल्यानंतर येतो त्यामुळे निवड प्रक्रियेत मेडिकल टेस्ट होते असे म्हणता येत नाही.
MPSC द्वारे होणारी पदभरती :-
MPSC अंतर्गत अनेक पदांवर भरती होते मात्र यातील काही महत्वाची पदे खाली देतो आहे.
गट अ पदे
- डेप्युटी कलेक्टर
- डी वाय एस पी (डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस)
- ए सी पी (असिस्टंट कमिशनर ऑफिसर)
- असिस्टंट सेल्स टॅक्स कमिशनर
- डेप्युटी रजिस्ट्रार को ऑपरेटिव्ह सोसायटी
- डेप्युटी चीफ एक्सिक्युटिव्ह ऑफिसर
- सुप्रीटेंडन्ट स्टेट एक्साईझ डिपार्टमेंट
- ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बी डी ओ)
- तहसीलदार
गट ब पदे
- चीफ ऑफिसर (नगर पालिका, नगर परिषद)
- मंत्रालय सेक्शन ऑफिसर
- नायब तहसीलदार
- असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर (ए आर टि ओ)
- तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्डस्
आपण MPSC विषयी जवळपास संपूर्ण म्हणजेच MPSC full form in marathi, MPSC काय असते, MPSC मधून कोणत्या पदांच्या भरती होतात, MPSC अंतर्गत होणाऱ्या परीक्षांसाठी पात्रता काय लागते याविषयी माहिती बघितली.
FAQ’s On एमपीएससी फुल फॉर्म MPSC Full Form In Marathi
MPSC साठी वयोमर्यादा किती आहे?
एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आहे, कमाल वय साधारणपणे 33 वर्षे आहे. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वय शिथिल आहे (कमाल 35 वर्षे.)
MPSC अवघड आहे का?
दरवर्षी एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये घेतली जाते. ही सूचना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येते. UPSC च्या विपरीत अनेक तथ्यात्मक प्रश्न विचारले जात असल्यामुळे ही परीक्षा एक कठीण परीक्षा आहे. मराठी नसलेल्या आणि इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांसाठी ही परीक्षा कठीण आहे.
MPSC अधिकाऱ्याचा पगार किती आहे?
पगार: 9,300-34,800 + ग्रेड पे 4,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते. MPSC अभियांत्रिकी सेवांमध्ये फक्त 2 MPSC वर्ग 1 अधिकारी पदे आहेत. एमपीएससी अभियांत्रिकी परीक्षेसाठी वेतनासह एमपीएससी नोकऱ्यांची ही यादी आहे. पगार: 15,600-39,100 + ग्रेड पे 5,400 + महागाई भत्ता आणि इतर भत्ते.
MPSC मध्ये सर्वोच्च पद कोणते आहे?
एमपीएससी परीक्षेतील सर्वोच्च पद हे उपजिल्हाधिकारी आहे.