एम.एल.सी फुल फॉर्म MLC Full Form In Marathi

MLC Full Form In Marathi आपला भारत देश हा लोकशाही असणारा देश आहे. आपल्या भारतामध्ये विविध स्तरावर दर पाच वर्षानंतर निवडणूक आयोजित केल्या जातात आणि त्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला लोकांद्वारे बहुमत दिले जाते ,त्या पक्षाचे सरकार स्थापन केले जाते. आपल्या भारतामध्ये विविध स्तरावर निवडणूक होत असतात. जसे की राज्यसभा निवडणूक, लोकसभा निवडणुक ,विधानसभा निवडणूक ,इत्यादी.

MLC Full Form In Marathi

एम.एल.सी फुल फॉर्म MLC Full Form In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण विधान परिषदेचा सदस्य असणाऱ्या एम.एल.सी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामधून आपण एम.एल.सी आणि एम.एल.ए मधील फरक देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एम.एल.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे याविषयी आणि एम.एल.सी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

एम.एल.सी फुल्ल फॉर्म (MLC full form)

काही लोकांना एम.एल.सी आणि एम.एल.ए मधील फरक लवकर समजून येत नाही. एम.एल.सी चा फुल्ल फॉर्म हा “मेंबर ऑफ लेजीसलेटिव काऊंसील” असा होतो ,तर एम.एल.ए चा फुल्ल फॉर्म हा “मेंबर ऑफ लेजीसलेटिव असेंबली” असा होतो. एम.एल.ए हे विधानसभेचे सदस्य असतात ,तर एम.एल.सी हे विधान परिषदेचे सदस्य असतात.

आपल्या भारत देशामध्ये केंद्रातील आणि राज्यातील दोन स्तरावर निवडणूक आयोजित केल्या जातात. केंद्र स्तरावर दोन निवडणूक असतात ,त्या दोन निवडणूका म्हणजे “राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुक”. तसेच राज्य स्तरावर देखील दोन निवडणुका आयोजित केल्या जातात. या दोन निवडणुका म्हणजे “विधानसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक”.

एम.एल.सी आणि एम.एल.ए मधील फरक (Difference between MLC and MLA in Marathi)

एम.एल.सी हे विधान परिषदेचे सदस्य असतात आणि एम.एल.ए हे विधानसभेचे सदस्य असतात. विधानसभेची निवडणूक दर पाच वर्षाला होते. तसेच लोकांद्वारे ज्या नेत्याला बहुमताने विजयी केले जाते ,त्या नेत्याची निवड एम.एल.ए म्हणून केली जाते. विधानसभेमध्ये १८ वर्षा पुढील मतदार मतदान करू शकतात ; परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी वकील, शिक्षक ,पदवीधर सारखे मतदार मतदान करू शकतात.

एम.एल.ए चा कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो ; परंतु ५ वर्षाच्या आत जर सध्याचे सरकार पडून दुसऱ्या पक्षाने आपले सरकार स्थापन केले तर ,त्या एम.एल.ए ला राजीनामा द्यावा लागतो. तसेच एम.एल.सी यांचा कार्यकाळ हा ६ वर्षाचा असतो. एम.एल.ए बनण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय २५ पेक्षा जास्त असले पाहिजे.

२५ पेक्षा कमी वय असणारा उमेदवार विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाही. तसेच एम.एल.सी बनण्यासाठी उमेदवाराचे वय ३० पेक्षा जास्त असले पाहिजे. ज्या उमेदवारांचे वय ३० पेक्षा कमी असते ,ते उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात.

FAQ

एम.एल.सी चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एम.एल.सी चा फुल्ल फॉर्म हा “मेंबर ऑफ लेजीसलेटिव काऊंसील” असा होतो.

एम.एल.सी चा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?

एम.एल.सी चा कार्यकाळ हा ६ वर्षांचा असतो. तसेच वकील ,शिक्षक ,पदवीधर यांसारखे मतदार एम.एल.सी ची निवड करतात.

एम.एल.ए चा फुल्ल फॉर्म काय होतो ?

एम.एल.ए चा फुल्ल फॉर्म हा “मेंबर ऑफ लेजीसलेटिव असेंबली” असा होतो.

एम.एल.सी आणि एम.एल.ए मध्ये काय फरक असतो ?

एम.एल.ए हे विधानसभेचे सदस्य असतात ,तर एम.एल.सी हे विधान परिषदेचे सदस्य असतात. एम.एल.ए ची निवड मतदार संघातील १८ पेक्षा जास्त वय असणारे मतदार करतात ,तर एम.एल.सी ची निवड शिक्षण ,वकील, पदवीधर सारखे मतदार करतात. एम.एल.ए चा कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो आणि वर्तमान सरकार पडले तर, एम.एल.ए ना राजीनामा देखील द्यावा लागतो. तसेच एम.एल.सी यांचा कार्यकाळ हा ६ वर्षांचा असतो.

किती वय असणारा उमेदवार एम.एल.सी बनण्यासाठी पात्र ठरतो.

ज्या इच्छुक उमेदवारांचे वय ३० पेक्षा जास्त असते ,असे इच्छुक उमेदवार एम.एल.सी बनण्यासाठी पात्र ठरतात.

किती वय असणारा उमेदवार एम.एल.ए बनण्यासाठी पात्र ठरतो.

ज्या इच्छुक उमेदवारांचे वय २५ पेक्षा जास्त असते ,असे इच्छुक उमेदवार एम.एल.ए बनण्यासाठी पात्र ठरतात.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण विधान परिषदेचे सदस्य असणारे “मेंबर ऑफ लेजीसलेटिव काऊंसील” म्हणजे “एम.एल.सी” विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एम.एल.सी चा फुल्ल फॉर्म काय आहे ?, एम.एल.ए चा फुल्ल फॉर्म काय आहे ?, एम.एल.सी आणि एम.एल.ए मधील फरक ,एम.एल.सी विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

संदर्भ (References)

१)https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6

२)https://medium.com/@gkquestionbazar/mlc-full-form-in-hindi-%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88-e2deaf345976

३)https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/national-after-all-what-is-the-difference-between-mla-and-mlc-who-is-more-powerful-in-both-let-know-everything-23362163.html

४)https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/india/what-is-the-difference-between-mla-and-mlc-how-they-are-selected-know-everything-here/amp_articleshow/90380115.cms

५)https://hindi.news18.com/amp/news/jobs/mla-vs-mlc-what-is-the-difference-between-mla-and-mlc-who-has-more-power-know-their-working-style-7195209.html

Leave a Comment