एमबीए फुल फॉर्म MBA Full form In Marathi

MBA Full form In Marathi : MBA ही पदवी मानाची पदवी मानली जाते. पदवी‍ भेटल्यानंतर खूप विद्यार्थ्यांना MBA ला प्रवेश घ्यायचा असतो. पण MBA म्हणजे काय, या लेखाच्या माध्यमातून  MBA बद्दल अधिक जाणून घेऊया जसे की MBA कोर्सची पात्रता, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि MBA अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या पद्धती.

MBA Full form In Marathi

एमबीए फुल फॉर्म MBA Full form In Marathi

MBA Full form in Marathi|MBA long form in Marathi

MBA चा मराठी मध्ये full form व्यवसाय प्रशासन विशेषज्ञ असा हाेताे.  MBA चा Full form english मध्ये  Master of Business Administrative असा हाेताे.

MBA म्हणजे काय?

MBA ही पदव्युत्तर पदवी आहे. MBA कोर्स त्या सर्व लोकांसाठी उपयुक्त ठरतो ज्यांना बिझनेस मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे आहे.

सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये एमबीए प्रोफेशनल्सना मागणी आहे. MBA कोर्स करण्यासाठी तुम्हाला आधी ग्रॅज्युएशन करावे लागेल, ग्रॅज्युएशन केल्याशिवाय तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. प्रवेशापूर्वी, तुमची प्रवेश परीक्षा असते. MBA अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे.

MBA अभ्यासक्रम देखील खूप लोकप्रिय आहे कारण तो विज्ञान, वाणिज्य कला इत्यादी सर्व विषयांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला आहे, म्हणजेच कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी MBA अभ्यासक्रम करू शकतो.

प्रवेश प्रक्रिया – MBA कोर्सला प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रीया आहे?

MBA कोर्सला प्रवेश घेण्याआधी तुम्ही याची माहीती करा की तुम्ही MBA साठी पात्र आहात का. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही MBA च्या प्रवेश परिक्षेचा फॉर्म भरा आणि परिक्षा दया.

ज्या वेळेस परिक्षेचा निकाल  जाहिर होतो, त्यावेळेस CAP राउंडला सुरूवात होते. तेव्हा तुमच्या जवळच्या MBA कॉलेजला जावून तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑपशन फॉर्म भराच्या वेळेस तुम्हाला कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे हे विचारले जाते तेयावेळेस आपल‌्याला पाहीजे ते काॅलेज निवडा

.जेव्हा फर्स्ट राउंड डिक्लेर होतो तेव्हा तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे ते महीती करून घ्या आणि जर तुम्हाला ते कॉलेज पाहीजे असेल तर सिट कन्फर्म करा.

MBA प्रवेश परीक्षा

विविध संस्थामध्ये प्रवेशासाठी पास असलेल्या MBA परीक्षा पास होणे आवश्यक असते.सगळ्या बीजनेस स्कूल मध्ये प्रवेश, प्रवेश परीक्षेद्वारे भेटताे. ही परीक्षा खालील प्रकारां पैकी एक असू शकते

 • राष्ट्रीय पातळी वरील चाचणी एपीक्स  मंडळाद्वारे किंवा इतर सहभागी महाविद्यालयांच्या वतीने शीर्ष राष्ट्रीय Business-स्कूलद्वारे घेतली जाते. उदा: CAT, MAT, CMAT or ATMA
 •  राज्यस्तरीय चाचणी संस्था किंवा त्या राज्यातील इतर सहभागी महाविद्यालया कडून राज्यस्तरीय बी-स्कूलद्वारे आयोजित केली जाते. उदा: MAH-CET,  KMAT, TANCET किंवा APICET.
 • काही बी-स्कूलद्वारे स्वतःच्या MBA प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. काही प्रकरणांमध्ये, या स्कोअरला इतर Business-स्कूलद्वारे देखील पात्रता निकष म्हणून घेतले जाते.    उदा: IIFT, XAT, NMAT, SNAP, IBSAT.
 • देशातील काही विद्यापीठातर्फे MBA च्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा महाविद्यालयाच्या वतीने घेतल्‌या जातात. उदा: KIITEE, HPU MAT.
 • तसेच पात्रता परीक्षा पास झाल्यास दुसऱ्या लेवल वर सामूहिक  मुलाखत घेतली जाते.

MBA कोर्स मध्ये स्पेशलायझेशन – MBA Specialisation

खाली आम्ही काही MBA चे स्पेशलायझेशन क्षेत्र दिले आहे त्यांची निवड करून आपण MBA पूर्ण करू शकतो.

 • फाइनेंस मैनेजमेंट
 •  मिडिया मैनेजमेंट
 • रुरल मैनेजमेंट
 • हॉस्पिटैलिटी मैनेजमेंट
 • ह्युमन रिसोर्स मैनेजमेंट
 • हेल्थकेअर मैनेजमेंट
 • मार्केटिंग मैनेजमेंट
 • स्पोर्ट्स मैनेजमेंट
 • इवेंट मैनेजमेंट
 •  डिजिटल मार्केटिंग
 • ट्रेवल एंड टूरिज्म
 •  लॉजिस्टिक एंड सप्लाई चैन मैनेजमेंट, इत्यादि..

MBA कोर्स करायला किती खर्च लागतो – MBA Course Fees

MBA कोर्स पूर्ण करायला तुम्हाला ३ लाख ते १० लाख खर्च लागू शकतो. तुम्ही कोणता कॉलेज निवडले आणि किती वेळात तुम्ही हा कोर्स पूर्ण करता त्यावर तुमचा लागणार खर्च अवलंबून आहे .तुम्ही पार्ट टाइम MBA कराल तर तुम्हाला कमी खर्च लागेल आणि तुम्ही जर फुल टाइम MBA करता तर तुम्हाला जास्त खर्च लागेल.

MBA कोर्सचे प्रकार -Types Of MBA Course

खाली  तुम्हाला MBA च्या काही विशिष्ट प्रकारची तुम्हाला माहिती देत आहोत. तुम्ही या कोर्सची माहिती घेऊन हा कोर्स पूर्ण करता येइल

 • एग्जीक्यूटिव MBA- या प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला संबंधित कार्यक्षेत्राचा अनुभव आणि कोणत्यापण शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या कडे असणे बंधनकारक आहे.
 • वर्षाचा MBA- या प्रकारच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमच्या कडे संभंधित कार्यक्षेत्राचा ५ ते १० वर्षाचा अनुभव आणि कोणत्यापण शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या कडे असणे बंधनकारक आहे.
 • डिस्टेंस शिक्षप्रणाली  MBA- पदवी शिक्षण मध्ये किमान ५० % टक्के गुण आणि ३ वर्षाचा संबंधित कार्यक्षेत्रात अनुभव.
 • ऑनलाईन MBA – कोणत्याही शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
 • पार्ट टाइम MBA – या प्रकारात तुम्हाला प्रत्यक्ष विद्यालयात नियमित हजर राहण्याची गरज नाही. हा कोर्स करण्यासाठी तुम्हला पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण गरजेचे आहे.

MBA केल्यानंतर नोकरी कशा प्रकारची  असते:

MBA करताना तुम्ही कोणता विषय निवडला होता यावर तुमची कंपनीतील काम ठरते. जसे

Human Resources (HR) (ह्यूमन रिसोर्सेस): HR या विभागामध्ये उमेदवाराला कर्मचाऱ्यांची भरती, कर्मचाऱ्यांचे पगार, कर्मचारी कपात, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या, सवलती, व भत्ते या विषयांशी संबधीत कामे पार पाडावी लागतात.

Banking: बँकेमध्ये जर तुम्हाला माठे पद पाहीजे असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बराेबर आहेत . या क्षेत्रामध्ये बँकेच्या व्यवहाराशी संबधीत सर्व कामे पार पाडावी लागतात.

Finance: या विभागामध्ये नोकरीच्या  अनेक संधी उपलब्ध आहेत. आपणास कोणत्याही माेठ्या कंपनीमध्ये फायनान्स विभागामध्ये चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळते व सोबत वेतन सुद्धा चांगला मिळतो.

Marketing: या विभागामध्ये  नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये एक Marketing Department नक्की असते. कंपनीच्या Product ची जाहिरात करण्यासाठी या विभागाची निर्मिती करण्यात आलेली असते.

FAQ

MBA चा मराठी मध्ये फुल फॉर्म काय आहे ?

MBA चा मराठी मध्ये फुल फॉर्म व्यवसाय प्रशासन विशेषज्ञ असा हाेताे

MBA चा फुल फॉर्म काय आहे ?

Master of Business Administration

MBA किती वर्षाचा कोर्स आहे ?

MBA 2 वर्षाचा कोर्स आहे

MBA कधी करता येते?

MBA Graduation नंतर करता येते.

Leave a Comment