एम.कॉम फुल फॉर्म M.Com Full Form In Marathi

M.Com Full Form In Marathi आपल्याकडे फायनान्स हा विषय संध्या खूप जास्त ट्रेंडिंग ला आहे आणि याच फायनान्स आणि इतर वाणिज्य क्षेत्रातील गोष्टींचा अभ्यास करणार कोर्स म्हणजे M.Com होय. आज आपण कॉमर्स क्षेत्रातील या मास्टर म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

M.Com Full Form In Marathi

एम.कॉम फुल फॉर्म M.Com Full Form In Marathi

M.Com म्हणजे काय, M.Com Full Form in Marathi, M.Com कोर्स आणि त्यातील विषय, M.Com कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी पात्रता निकष, M.Com केल्याचे फायदे आणि M.Com झाल्यानंतर करियरच्या संधी याविषयी आज आपण जाणून घेऊयात.

M.Com Full Form in Marathi – M.Com Long Form in Marathi

M.Com हा कोर्स असून सर्व विद्यापीठांकडून पदव्युत्तर शिक्षणात M.Com हा कोर्स चालविला जातो. M.Com या शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Master of Commerce असा आहे. M.Com शब्दाचा मराठी भाषेत full form हा मास्टर ऑफ कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेतील पदवीधर असा होतो.

M.Com म्हणजे काय? – What is M.Com in Marathi?

M.Com म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स आणि हा कोर्स पदव्युत्तर अभ्यासक्रमात येतो. M.Com अभ्यासक्रम हा सर्व विद्यापीठांकडून चालविला जातो. M.Com मध्ये आपल्याला अकाउंटिंग आणि बिझनेस विषयी सर्व काही अभ्यासता येते. जेव्हा एखादा B Com म्हणजेच कॉमर्स क्षेत्रात बॅचलर डिग्री घेतो त्यानंतर त्या विद्यार्थ्याला M.Com करता येते. BCom ही एक पदवी असून त्याच्या पुढे एखाद्याला शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी M.Com ही पदव्युत्तर पदवी शिक्षण आहे.

बी कॉम मध्ये जे शिक्षण अगदी वर वर होते मग त्यात अकाउंटिंग, बिजनेस अकाउंटिंग आणि व्यवहार याविषयी अगदी सखोल आणि सविस्तर अभ्यास हा एम कॉम कोर्स मध्ये करता येतो. एम कॉम हा 2 वर्षांचा कोर्स असतो. यामध्ये तुम्हाला बँकांमध्ये किंवा कोणत्याही कंपनीत अकाउंटिंग विभागाला जे ज्ञान गरजेचे असते ते सर्व मिळते.

M.Com कोर्स साठी पात्रता निकष – Eligibility Criteria for M.Com Course Admission

M.Com कोर्सला प्रवेश घेण्यासाठी ऍडमिशन प्रक्रियेआधी तुम्हाला काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. त्याविषयी खाली मुद्देसूद माहिती देतो आहे.

  • M.Com ल ऍडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याने कॉमर्स क्षेत्रातून पदवी शिक्षण घेतलेले असावे. यामध्ये काही विद्यालयांमध्ये सूट दिलेली असते. त्याविषयी शेवटी माहिती दिलेली आहे.
  • विद्यार्थ्याने BCom किंवा त्यासारख्या स्तराची दुसरी डिग्री पास करायला हवी.
  • पदवी अभ्यासक्रमात त्या विद्यार्थ्याला 50% हुन अधिक गुण असायला हवेत.
  • काही महाविद्यालयात एम कॉम साठी असणाऱ्या ऍडमिशन साठी देखील प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्या महाविद्यालयाच्या किंवा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा विद्यार्थ्याने देऊन त्यामध्ये पात्र व्हायला हवे.

M.Com हा कॉमर्स क्षेत्रातील कोर्स असला तरी देखील इतर क्षेत्रातील पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील या कोर्सला प्रवेश दिला जातो. यामध्ये पात्रता निकष हा पदवी असणे इतकाच आहे. मग ही पदवी तुमची विज्ञान शाखेतील असू शकते किंवा इंजिनिअरिंग झालेल्या म्हणजेच बी टेक झालेल्या विद्यार्थ्यांना देखील M.Com साठी प्रवेश दिला जातो.

M.Com कोर्स कसा करतात? – How to Admit for a M.Com Course?

तुम्हाला जर M.Com च करायचे असेल तर 10 वि नंतर तुमचा हा निर्णय झालेला असावा. कॉमर्स क्षेत्रात करियर करायचे तुमचे कधीही ठरू शकते मात्र आम्ही त्यासाठी असलेला एक मुख्य पाठ सांगतो आहोत.

  • इयत्ता दहावी नंतर 11 वि ला प्रवेश घेताना वाणिज्य शाखेत घ्यावा आणि 12 वि देखील वाणिज्य शाखेतून करावी.
  • त्यानंतर बी कॉम साठी प्रवेश घ्यावा. तीन वर्षाचा बी कॉमचा कोर्स करावा.
  • बी कॉम झाल्यानंतर तुम्हाला एम कॉम साठी तयारी करायची आहे. यासाठी अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रवेश परीक्षा घेतात. त्या प्रवेश परीक्षा द्याव्यात.
  • प्रवेश परिक्षामध्ये चांगले मार्क मिळाले तर मेरिट लिस्ट अनुसार तुम्हाला हव्या असलेल्या कॉलेजमध्ये एम कॉम कोर्सला प्रवेश मिळू शकेल.

M.Com कोर्सचा फायदे – Benefits of M.Com Course in Marathi

  • M.Com हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. याचा फायदा तुम्हाला पुढील शिक्षण घेण्यासाठी होतो. पुढे भविष्यात तुम्हाला रिसर्च आणि इतर कॉमर्स क्षेत्रातील पुढील शिक्षणाच्या संधी असतात.
  • M.Com नंतर तुम्ही कॉमर्स क्षेत्रात एकदम मोठ्या लेव्हलला पोहोचतात. म्हणजे अकाउंटिंग मधील सर्व बारकावे तुम्हाला माहिती असतात.
  • UGC द्वारे घेण्यात येणाऱ्या NET आणि SET सारख्या परीक्षा देऊन त्या विद्यार्थ्याला प्राध्यापक बनता येते.
  • JREF सारख्या परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला रिसर्च क्षेत्रात जाता येते.
  • M.Com झाल्यानंतर विद्यार्थी Ph.D. साठी जाऊ शकतो.
  • M. Phil. ही पदवी अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्याला M.Com नंतर करता येतो.
  • M.Com हे पदव्युत्तर शिक्षण असल्याने यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षणाची अट असते ते सर्व क्षेत्र खुले होतात.
  • कॉर्पोरेट क्षेत्रात आणि परदेशात M.Com नंतर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.

याशिवाय तुम्हाला अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्या व ऑफिस मध्ये, बँकांमध्ये अकाउंटिंग विभागात काम करण्याची संधी आहे. याशिवाय CA, CS सारखे काही पोस्ट तुम्हाला अभ्यास करून मिळवता येतात.

M.Com मध्ये काय शिकविले जाते? – M.Com Course Learnings

कॉमर्स क्षेत्रातील सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर अगदी सखोल आणि रिसर्च लेव्हलचा अभ्यास हा M.Com या कोर्स मध्ये केला जातो. यामध्ये मार्केटिंग, फायनान्शियल सर्व्हिस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जनरल मॅनेजमेंट, बिजनेस कन्सल्टंट, अकाउंटिंग, टॅक्स फायलिंग सारख्या विषयांवर अधिकाधिक भर दिला जातो.

M.Com नंतर नोकरीच्या संधी – Jobs after M.Com Degree

M.Com नंतर जर तुम्हाला पुढे शिक्षण घ्यायचे नसेल आणि जॉब करायचा असेल तर अनेक नोकरीच्या संधी आहेत. मात्र यातील काही मुख्य आणि जास्त पगार देणाऱ्या नोकरीच्या संधी तुम्हाला सांगतो आहे.

  • ऑडिटर्स
  • प्राध्यापक (लेक्चरर)
  • चार्टर्ड अकाउंटंट (CA साठी परीक्षा पास करावी लागते)
  • फायनान्स मॅनेजर
  • ह्युमन रिसोर्स मॅनेजर
  • इन्व्हेस्टमेंट अनालिस्ट
  • स्टॉक ब्रोकर्स
  • चीफ फायनान्शियल ऑफिसर
  • मार्केटिंग मॅनेजर

FAQ

MBA आणि M.Com यापैकी कोणता कोर्स चांगला आहे?

MBA झाल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या देशात आणि परदेशात अनेक संधी उपलब्ध आहेत मात्र जर तुम्हाला रिसर्च आणि पुढील शिक्षणासाठी काहीतरी करायचे असेल तर तुम्हाला M.Com हाच कोर्स चांगला असेल.

M.Com म्हणजे काय?

M.Com म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स होय. हा वाणिज्य शाखेतील 2 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असून यानंतर तुम्हाला रिसर्च आणि पुढील शिक्षणाच्या संधी उपलब्ध असतात.

M.Com कोर्सला आजही तितकी व्हॅल्यू आहे का?

M.Com कोर्स पूर्ण केल्यानंतर देशात आणि विदेशात अनेक करियरच्या संधी आहेत. तुम्ही रिसर्च आणि पुढील शिक्षण सोडता आंतरराष्ट्रीय बँका, आंतरराष्ट्रीय इन्श्युरन्स आणि कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत.

M.Com झाल्यानंतर भारतात किती पॅकेज मिळू शकते?

M.Com झाल्यानंतर फ्रेशरला साधारणतः 4 लाखांच्या जवळपास पॅकेज प्रति वर्ष मिळते. मात्र एका रिपोर्ट अनुसार M.Com पूर्ण केल्यानंतर 5.1 लाख रुपये प्रतिवर्षं ही सरासरी सॅलरी भारतात दिली जाते.

Leave a Comment