LKG फुल फॉर्म LKG Full Form In Marathi

LKG Full Form In Marathi लहान मुलांना शाळेत कुठे टाकायचे तर LKG ला टाकू, LKG झाली की UKG करेल असे आपण सहज बोलून जात असतो मात्र LKG विषयी खूप कमी लोकांना माहिती असते. आज या लेखाच्या माध्यमातून आपण LKG म्हणजे काय, LKG चा फुल फॉर्म काय आहे, LKG विषयी काही इतिहास आणि यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी LKG विषयी जाणून घेणार आहोत.

LKG Full Form In Marathi

LKG फुल फॉर्म LKG Full Form In Marathi

LKG Full Form in Marathi । LKG Long Form in Marathi

LKG शब्दाचा इंग्रजी भाषेत Full Form हा Lower Kindergarten (लोवर किंडरगार्टन) असा होतो. हा शब्द किंडरगार्डन नसून किंडरगार्टन आहे.

LKG शव्दाचा मराठी भाषेत Full Form किंवा अर्थ हा छोटी बालवाडी असा होतो. याला काही भागात अंगणवाडी म्हणून देखील ओळखतात. आता ही बालवाडी आणि अंगणवाडी यांचा संबंध LKG सोबत नसतो हा तुमचा प्रश्न असेल मात्र LKG वरूनच बालवाडी ही आपल्याकडे आलेली संकल्पना आहे.

LKG म्हणजे काय? What is LKG in Marathi?

लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात ही बालवाडी मधून होत असायची मात्र आता त्यांना देखील LKG आणि UKG या दोन स्तरांमधून पालक पाठवत आहेत. लहान मुलं त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ही LKG पासून करत असतात. वय वर्षे 3 आणि 4 ची मुले ही LKG मध्ये शिक्षण घेत असतात.

LKG हा असा शिक्षण वर्ग असतो ज्यामध्ये लहान मुलांना बोलायला आणि चालायला शिकविले जाते. त्यासोबत या मुलांना पाटीवर पेन्सिल ने लिहायला देखील शिकवतात. हे सर्व शिक्षण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असते. मुलांना LKG मध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी खेळ आणि त्यासोबत मनोरजंनात्मक शिक्षण दिले जाते.

LKG मध्ये लहान मुले येतात त्यांना खेळ आधी शिकवतात. त्यानंतर त्यांच्याकडुन गाण्याच्या चालीत एका तालासुरात काही कविता म्हणवून घेतल्या जातात. अनेकदा या लहान मुलांना नाचण्याची संधी दिली जाते. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना प्रात्यक्षिक देत शिक्षण दिले जाते. मुलांना पाटी पेन्सिल वापरून चित्र काढण्यास शिकविले जाते. काही प्रमाणात अक्षर ओळख करून देण्यास देखील या LKG वर्गात सुरुवात केलेली असते.

LKG UKG प्रवेश – Admission in LKG UKG

काही ठिकाणी LKG आणि UKG ला एकत्रितपणे नर्सरी म्हणून देखील ओळखतात. 3 किंवा 4 वर्षे वयाच्या मुलांना LKG मध्ये प्रवेश दिला जातो. यामध्ये मुलांना एक वर्ष शिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्यांना मग UKG म्हणजेच उप्पर किंडरगार्टन साठी प्रवेश दिला जातो.

LKG आणि UKG ला एकत्रितपणे प्री प्रायमरी स्कुलिंग म्हणून ओळखतात. LKG आणि UKG सारखे प्री प्रायमरी शिक्षण देण्यामागे उद्देश हाच असतो की त्या मुलाला इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असताना काही अडचणी येऊ नयेत.

याशिवाय त्याच्या मध्ये शिक्षणाची लवकरात लवकर गोडी निर्माण व्हावी हा देखील एक उद्देश प्री प्रायमरी स्कुलिंग मागे असतो. UKG झाल्यानंतर विद्यार्थ्याला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेता येतो. UKG देखील LKG प्रमाणे एक वर्षाची असते.

LKG मध्ये काय शिकवितात – What is Taught in LKG?

LKG वर्गामध्ये मुले ही विद्यार्थी बनण्याच्या पहिल्या पायरीवर असतात. त्यामुळे इथे त्याला काही जास्त शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यामध्ये शिक्षण आणि शाळा याविषयी आवड निर्माण करणे हेच मुख्य हेतू असतात.

LKG मध्ये त्या मुलाला उठणे बसने, बोलणे, शब्द उच्चार हे शिकविले जातात. त्या विद्यार्थ्यांना खेळ आणि मनोरंजन देखील शिकवितात. गाण्यांच्या चालीमध्ये कविता, एखाद्या गाण्यावर नृत्य, चित्रकला यासारखे आवडीचे विषय विद्यार्थ्यांना शिकविले जातात.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि टापटीपपणा हे गुण यावेत यासाठी LKG वर्गात प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना अक्षर ओळख जरी इथे शिकविली जात नसली तरी देखील अंक ओळख आणि अंक लिहिणे LKG मध्ये शिकवितात.

LKG चा इतिहास – History of LKG

फ्रेडरिक फ्रॉबेल यांना KG म्हणजेच किंडरगार्टन या शब्दाचे श्रेय जाते. किंडरगार्टन म्हणजे बालवाडी होय. 1837 मध्ये त्यांनि ब्लास्टनबर्ग येथे एक लहान मुलांसाठी प्ले अँड ऍक्टिव्हिटी स्कुल सुरू केली होती. तिलाच त्यांनी किंडरगार्टन म्हणले होते.

ही शाळा त्यांनी लहान मुलांना घरातून शाळेत पाठविताना एक मधला दुवा म्हणून सुरू केली होती. यालाच पुढे संपूर्ण जगाने आणि मुख्यतः आपल्या भारत देशाने अवलंबिले आहे.

LKG : दाक्षिणात्य चित्रपट

LKG म्हणजेच लालगुडी करुपीआह गांधी हा एक तामिळ चित्रपट असून याची निर्मिती ही इशरी के गणेश यांनी केलेली आहे. एक छोट्या खेड्यातील नेता कशा प्रकारे राज्याचा मुख्यमंत्री बनतो हे या चित्रपटाच्या माध्यमातून दर्शविले आहे. आरजे बालाजी यांनी यामध्ये मुख्य भूमिका केलेली आहे. तामिळ भाषेत हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित करण्यात आला होता.

FAQ

LKG म्हणजे काय?

LKG म्हणजे लोवर किंडरगार्टन होय. यालाच आपल्याकडे महाराष्ट्रात मराठी भाषेत छोटी बालवाडी म्हणतात.

UKG म्हणजे काय?

UKG म्हणजे अप्पर किंडरगार्टन होय. हा प्री प्रायमरी स्कुलिंग मधील LKG नंतर येणारा दुसरा टप्पा आहे

LKG मध्ये किती वर्षाच्या मुलाला पाठविता येते?

LKG किंवा नर्सरी मध्ये 3 वर्ष पूर्ण असलेल्या मुलांना पाठविता येते. काही पालक 4 वर्षानंतर मुलाला LKG मध्ये पाठवितात.

LKG चित्रपटाचा Full Form काय आहे?

LKG या दाक्षिणात्य चित्रपटाचा Full Form हा Lalgudi Karuppiah Gandhi असा आहे.

Leave a Comment