IVF फुल फॉर्म IVF Full Form In Marathi

IVF Full Form In Marathi एखाद्या जोडप्याला संतान प्राप्ती होत नसेल, स्त्रीला गर्भधारणा होत नसेल तर त्यांच्या समोर सध्या IVF ही मेडिकल ट्रीटमेंट घेण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. आता हे IVF म्हणजे नक्की काय, IVF चा फुल फॉर्म काय आहे, IVF का करावी लागते, IVF प्रक्रिया कशी करतात, IUI आणि IVF मधील फरक काय आहे, IVF घेताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

IVF Full Form In Marathi

IVF फुल फॉर्म IVF Full Form In Marathi

IVF Full Form in Marathi । IVF Long Form in Marathi

गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांसाठी IVF हे तंत्रज्ञान जणू एक प्रकारे त्यांच्या संसाराला पुढे नेणारे एक मेडिकल क्षेत्रातील वरदान आहे. आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी माहिती असेल तर त्यालाच IVF म्हणले जाते.

IVF शब्दाचा इंग्रजी भाषेत full form हा In Vitro Fertilization (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) असा आहे. IVF शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा कृत्रिम गर्भधारणा असा होतो.

IVF म्हणजे काय? – What is IVF in Marathi?

गर्भधारणा होत नसेल तर त्यासाठी मेडिकल क्षेत्रातील एक क्रांती म्हणजे IVF Treatment होय. आपण याला सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हणून ओळखत असतो. अनेकदा आपण हा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया ऐकलेली असते मात्र यासाठी वापरली जाणारी वैज्ञानिक संज्ञा म्हणजे IVF होय.

आपण ही प्रक्रिया कशी घडते हे पुढे जाणून घेणार आहोतच मात्र थोडक्यात सांगायचे असेल तर IVF करावी लागते तेव्हा महिला या गर्भाला आपल्या शरीरात वाढविण्यासाठी सक्षम असतात मात्र स्त्री पुरुषांचे शुक्राणू समस्या असतात. तर हे अंडकोश महिलांच्या शरीरातून बाहेर काढून एका कृत्रिम काचेच्या नळीत फलित करून ते पुन्हा प्रस्थापित केले जातात.

IVF प्रक्रिया कशी होते? – How IVF Treatment Carried Out?

IVF ही प्रक्रिया वैज्ञानिक प्रक्रिया असून यासाठी महिलांना पाळीच्या 20 व्या दिवसापासून काही इंजेक्शन देण्यास सुरुवात केली जाते. जवळपास हे इंजेक्शन 20 ते 25 दिवस द्यावे लागतात.

यातून एकदा स्त्रीला मासिक पाळी आली की मग पुढे दोन दिवसांनंतर अंडी निर्मिती साठी इंजेक्शन दिले जातात. आता हे इंजेक्शन स्त्री शरीर अंडे बनविते किंवा नाही बनवत यावर देखील अवलंबून असतात. काही महिलांना हे इंजेक्शन द्यावे लागत नाही.

फोलिक्युलर स्टडी ही एक या प्रक्रियेत असलेली पायरी आहे. यासाठी सोनोग्राफी तंत्रज्ञान वापरले जाते. मासिक पाळी आल्यानंतर बरोबर 9 व्या दिवशी 18 मिमी आकाराच्या फोलिक्युल ला इंजेक्शन च्या सहाय्याने बाहेर काढले जाते.

आता पुरुषाच्या शरीरातून जनुके बाहेर काढून त्यांचा आणि स्त्री अंडकोश यांचा संपर्क करून त्याच्या मधून शरीराच्या बाहेर गर्भ निर्मिती केली जाते. हे सर्व काही मेडिकल क्षेत्रातील टेस्ट ट्यूब सारख्या नळीमध्ये घडते म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणून देखील ओळखतात.

नियंत्रित वातावरणात म्हणजे इंक्युबेटर मध्ये हे गर्भ काही काळ वाढवून नंतर त्याला महिलेच्या गर्भ पिशवी मध्ये सोडले जाते. बाळाची वाढ ही स्त्रीच्या शरीरातच होत असल्याने ही प्रक्रिया अनेक दाम्पत्य वापरतात.

IVF प्रक्रिया करण्यासाठी कारणे – When IVF Treatment is Required?

IVF ट्रीटमेंट कधी घ्यावी लागते याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

  • स्त्री शरीरातील फलोफिअन ट्यूब मध्ये काही बिघाड असेल.
  • पुरुषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी असेल.
  • महिलांना ओव्ह्यूलेशन ही समस्या उद्भवत असेल.
  • प्रिमॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर
  • गर्भाशयाच्या समस्या
  • अनुवांशिक आजार
  • फलोफिअन ट्यूब शरीरातून काढून टाकावी लागली असेल.

IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे? – IUI vs IVF What is थे Difference?

IUI म्हणजे इंट्रा युटेराईन इनसेमीनेशन होय. ही प्रक्रिया काही प्रमाणात IVF सारखी आहे मात्र यात थोडेफार फरक आहेत ते आपण समजून घेऊयात.

IVF प्रक्रियेत आपण स्त्री चे अंडकोश हे बाहेर काढून त्याचे आणि पुरुषांच्या शुक्राणूंचे मिलन एका काचेच्या नळीत इंक्युबेटर अंतर्गत करत असतो. मात्र IUI मध्ये पुरुषांचे शुक्राणू स्त्री बीजापर्यंत पोहोचत नसतात त्यामुळे त्यांना काही इंजेक्शन आणि इतर मेडिकल ट्रीटमेंट देऊन कॅन्यूला द्वारे महिलेच्या शरीरात स्त्री बीजच्या जवळ नेऊन सोडले जातात.

यामध्ये गर्भधारणा ही पूर्णपणे महिलेच्या शरीरात होते फक्त आपण बीज मिलन हे बाहेरून पुरुष बीज सोडून करत असतो.

IUI हे तंत्रज्ञान जास्त खर्चीक नाहीये मात्र टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF ट्रीटमेंट साठी जास्त खर्च येतो.

IVF साठी काय काळजी घ्यावी? – How to Take Care in IVF Treatment?

  • IVF प्रक्रियेला तुमच्या मासिक पाळीच्या तारखा गरजेच्या असतात त्यामुळे त्या नोंदवून ठेवा.
  • स्त्री आणि पुरुष दोघांनी देखील ताण तणाव घेणे काही काळासाठी कमी केले पाहिजे.
  • महिलांनी तरी कमीत कमी काही काळ ऍक्युपंक्चर करून घ्यायला हवे. त्याचा फायदा त्यांना गर्भधारणा करताना होतो.
  • अन्नातून ऊर्जा मिळेल असे अन्न घ्या. सकस अन्न सेवन करा. आहारात जास्त अचानक बदल करू नका.
  • नियमीत पाण्याचे सेवन करा.
  • अल्कोहोल सेवन, धूम्रपान टाळा.
  • कॅफेन म्हणजेच कॉफी, चहा यांचे प्रमाण कमीच करा किंवा बंद करा.
  • आनंदी रहा आणि सतत आपल्या डॉक्टर सोबत संपर्क ठेवून रहा.

FAQ

IVF म्हणजे काय? IVF चा फुल फॉर्म काय आहे?

IVF म्हणजे In Vitro Fertilization होय. यालाच आपण मराठी मध्ये कृत्रिम गर्भधारणा म्हणतो. आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्रात हे तंत्र किंवा प्रक्रिया टेस्ट ट्यूब बेबी नावाने प्रसिद्ध आहेत.

IUI म्हणजे काय? IUI चा फुल फॉर्म काय आहे?

IUI म्हणजे Intrauterine Insemination होय. यालाच मराठी मध्ये कृत्रिम बीजारोपण म्हणून ओळखले जाते.

ICSI म्हणजे काय? ICSI काय असते?

ICSI म्हणजे Intracytoplasmic Sperm Injection होय. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे त्या दाम्पत्यासाठी ही एक मेडिकल प्रक्रिया आहे. ICSI ला इक्सि म्हणून संबोधले जाते.

सरोगेट मदर म्हणजे काय?

सरोगेट मदर प्रक्रियेत आईच्या शरीरात बीज मिलन होऊन गर्भ तयार करून तो एका दुसऱ्या स्त्रीच्या शरीरात वाढीसाठी सोडला जातो. गर्भ सांभाळणाऱ्या स्त्रीला सरोगेट मदर म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment